Monsoon Skin Care: Sakal
लाइफस्टाइल

Monsoon Skin Care: कीटक दंश झाल्यास घाबरू नका

Monsoon Skin Care: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या किटकांची आणि किड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. पावसाळ्यात कीटक चावल्यावर पुढील घरगुती उपायांचा वापर करू शकता.

सकाळ वृ्त्तसेवा

Monsoon Skin Care: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या किटकांची आणि किड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अगदी घरात असो किंवा बस, ट्रेन, ऑफिसमध्ये तुम्हाला एखादा कीटक चावू शकतो. तसेच तुमच्या वाळत घातलेल्या कपड्यांमध्ये देखील एखादा किडा किंवा कीटक दडून बसू शकतो, जो तुम्हाला कपडे घातल्यानंतर चावू शकतो. बऱ्याचदा पावसाळी सहलींत म्हणजेच धबधबे किंवा दऱ्याखोऱ्यांत ट्रेकिंग करतानाही एखादा कीटक चावण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यात असंख्य प्रजातींच्या किटकांचा वावर वाढलेला असतो.

अशात विविध कीटक चावल्याने तुम्हाला विविध त्रास होऊ शकतात. काही वेळेस त्वचेवर रॅशेस येऊ शकतात. काही कीटक चावल्याने त्वचेवर जळजळ होते, तर काही किडे चावल्याने सूज येऊन खाज येणे किंवा वेदना होणे असाही त्रास होऊ शकतो. एखादा किडा किंवा कीटक चावताच तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. ज्यामुळे तुम्हाला नक्की आराम मिळेल.

डंख काढण्याचे उपाय

अनेक किडे-कीटक त्वचेवर डंख मारून तो त्वचेत सोडतात. यामुळे जळजळ होते आणि इन्फेक्शन होऊ शकते. यासाठीच सर्वप्रथम डंख काढणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही एखादी चावी, कार्ड किंवा ब्रश तसेच सेलो टेपच्या मदतीने डंख काढू शकता. चावी किंवा कार्डसारखी वस्तू डंख मारलेल्या ठिकाणी घासल्याने डंख निघू शकतो. डंख निघाल्यानंतर त्वचा स्वच्छ साबणाने धुवावी. डंख निघाल्यास इन्फेक्शन किंवा विषारी द्रव पसरण्याचा धोका कमी होतो.

किडा चावल्यास 'हे' पदार्थ येतील उपयोगी

बर्फ

किडा किंवा कीटक चावल्यावर होणारा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या किचनमध्ये उपलब्ध असलेल्या अनेक गोष्टींचा वापर करू शकता. किडा चावल्यास त्या जागी बर्फ लावा. रक्त गार झाल्याने विष पसरण्याचा धोका टळतो. तसेच सूज येत नाही आणि जळजळ होत असल्यास ती कमी होण्यास मदत होते. कोरफड लावल्याने डंखाचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.

बेकिंग सोडा

जर किडा किंवा कीटक चावलेल्या ठिकाणी खाज येत असेल, तर तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी बेकिंग सोड्यामध्ये थोडं पाणी टाकून पातळ पेस्ट तयार करा. ही पेस्ट किडा चावलेल्या भागावर लावा.

कांदा

तसेच तुम्ही किडा चावलेल्या भागावर कांद्याच्या स्लाइसने स्क्रब करू शकता. कांद्यातील सल्फर कंपाउंडमुळे डंखातील विष पसरत नाही. यामुळे खाज आणि जळजळ कमी होते. तसेच कोळी चावल्यावरही तुम्ही हा उपाय करू शकता.

मध

किडा चावलेल्या ठिकाणी मध लावू शकता. मधामध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म असल्याने आराम मिळतो.

लिंबू

किडा चावल्यास त्या भागावर लिंबाने स्क्रब करा. लिंबातील अँटिबॅक्टेरियल आणि अँटिइंफ्लामेटरी गुणधर्मांमुळे डंखाचा प्रभाव कमी होतो. तसेच विष पसरण्याचा किंवा संसर्ग वाढण्याचा धोका कमी होतो.

तुळशीचं पान

तसंच मच्छर चावल्यामुळे तुम्हाला फोड येऊन खाज येत असेल, तर तुम्ही तुळशीचं पान हाताने चुरगळून ते प्रभावित भागावर लावू शकता.

अशा प्रकारे एखादा किडा किंवा कीटक चावल्यावर तुम्ही घरच्या घरी काही प्राथमिक उपाय करू शकता. अर्थात जर तुम्हाला काही गंभीर परिणाम दिसून येत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT