Fashion Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Fashion Day 2024 : पावसाळ्यात स्टायलिश अन् कूल दिसायचय? मग, फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Monika Lonkar –Kumbhar

Fashion Day 2024 : जगभरात दरवर्षी ९ जुलै हा दिवस फॅशन दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. फॅशन ही केवळ कपड्यांपुरतीच मर्यादित नसून ती स्टाईल आणि प्रतिभेवर लक्ष केंद्रित करते. ही फॅशन लोकांना त्यांची कला आणि फॅशन सेन्स पुढे आणण्यासाठी आणि त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहित करते. पावसाळा आणि फॅशन हे खरं तर अवघड काम आहे.

त्यामुळे, या दिवसांमध्ये स्टायलिंग करणे हे जरा रिस्की काम आहे. कारण, या ऋतूमध्ये वातावरणात भरपूर आर्द्रता असल्यामुळे शरीराला प्रचंड घाम येतो. तसेच, त्वचा नेहमीच चिकट राहते. त्यामुळे, या दिवसांमध्ये कपड्यांची योग्य निवड करणे गरजेचे आहे. अन्यथा दिवसभर या दमट वातावरणामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

पावसाळ्यात तुम्ही अशा कपड्यांची निवड करायला हवी की, ज्या कपड्यांवर तुम्ही भिजलात तरी ते सहज कोरडे होतील. यामुळे, तुमचा लूक ही बिघडणार नाही. या ऋतूमध्य कपड्यांची निवड करताना रंग देखील लक्षात घ्या. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवसांमध्ये नेव्ही ब्लू, पांढरा आणि काळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर कमी करा. आज आम्ही तुम्हाला खास फॅशन दिनानिमित्त पावसाळ्यात स्टायलिंग करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

नवीन काहीतरी ट्राय करा

या दिवसांमध्ये प्रवास करताना जीन्स, जॉगर्स आणि कार्गो हे पॅंटचे पर्याय तुम्ही निवडू शकता. परंतु, जर तुम्ही पावसाळ्यातील सहलीला जात असाल तर हे पर्याय निवडू नका. त्याऐवजी थीफोर्थ, स्कर्ट किंवा शॉर्ट्सचा पर्याय निवडा. या कपड्यांमध्ये तुमचा लूक ही स्टायलिश दिसेल आणि कपडे खराब ही होणार नाहीत.

एथनिक आहे बेस्ट

पावसाळ्यातील दिवसांमध्ये मॉर्डन कपड्यांसोबतच तुमही एथनिक कपडे देखील ट्राय करू शकता. जसे की, फ्लोअर लेंन्थ अनारकली, सलवार सूट आणि पलाझोच्या ऐवजी अ‍ॅकल लेंन्थ लेगिंग्सवर शॉर्ट कुर्त्या देखील ट्राय करू शकता. या दिवसांमध्ये स्कार्फचा वापर प्रामुख्याने करा.

योग्य फूटवेअरची करा निवड

पावसाळ्यात तुमच्य पायांसाठी योग्य फूटवेअरची निवड करणे फार महत्वाचे आहे. कारण, या दिवसांमध्ये चुकीची पादत्राणे निवडल्याने तुमचा संपूर्ण लूक खराब होऊ शकतो. पावसाळ्यात स्टिलेटोस किंवा किटन हिल्सचे फूटवेअर घालू नका.

तसेच लेदर आणि मखमलीपासून बनवलेले शूज किंवा फ्लॅट्स घालणे टाळा. पावसाळ्यात वातावरणानुसार, पायांचे संरक्षण करण्यासाठी आणि तुमचा लूक स्टायलिश ठेवण्यासाठी रबरी शूज, क्रॉक्स आणि रंगीत फ्लिप-फ्लॉप हे सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. यासोबतच तुम्ही पीवीसी बूट देखील ट्राय करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT