white heads  Esakal
लाइफस्टाइल

Monsoon: पावसाळ्यात वाढलाय व्हाईट हेड्सचा त्रास, करा हे घरगुती उपाय; चेहरा दिसेल स्वच्छ नितळ

धूळ, बॅक्टेरिया आणि चेहऱ्यावरचे अतिरिक्त तेल हे प्रामुख्याने व्हाईट हेड्स येण्यासाठी कारणीभूत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्याच्या दिवसांत चेहऱ्याच्या काही भागात जसे की नाकाच्या शेंडयावर,ओठांच्या खाली अशा ठिकाणी व्हाईट हेड्सचे प्रमाण अधिक वाढलेले दिसते. यामुळे मग चेहरा खूपच खराब दिसू लागतो. अगदी कितीही मेकअप केला तरीही हे व्हाईट हेड्स चेहऱ्यावर अगदी स्पष्ट उठून दिसतात. त्यांना लपवून ठेवणं अशक्य होऊन जाते. म्हणूनच तर तुमच्या सौंदर्याला बाधा देणारे व्हाईट हेड्स काढून टाकायचे असतील, तर काही घरगुती उपाय करून बघा. चेहरा होईल एकदम स्वच्छ,सुंदर आणि उजळ होईल आता बघू या चेहऱ्यावर व्हाईट हेड्स का येतात?

अति कॉस्मेटिक्सचा वापर, वातावरणातील प्रदुषणामुळे चेहऱ्यावर बसणारी घाण, धूळ यांचे कण त्वचेतील तेलात मिसळले जातात आणि त्वचेवरील छिद्रांमध्ये किंवा हेअर फॉलिक्समध्ये अडकून बसतात. त्यामुळे त्वचेवरील रंध्रे किंवा पोअर्स बंद होतात. काही दिवसांनी त्या जागी पांढऱ्या रंगाचे फुगवटे दिसू लागतात. त्यालाच आपण व्हाईट हेड्स किंवा मग हिंदीमध्ये सफेद फुंसी म्हणतो.धूळ, बॅक्टेरिया आणि चेहऱ्यावरचे अतिरिक्त तेल हे प्रामुख्याने व्हाईट हेड्स येण्यासाठी कारणीभूत आहेत.

चेहऱ्यावरच्या व्हाईट हेड्स नखाने अजिबात काढू नका.

अनेक जणींची एक सवय असते. त्वचेवर व्हाईट हेड्स दिसू लागले की नखाने, एखाद्या टोकदार वस्तूने किंवा मग खडबडीत कपड्याने त्यावर जोरजाेरात चोळायचं आणि व्हाईट हेड्स काढून टाकायचे. पण यामुळे एका ठिकाणचं इन्फेक्शन अन्य ठिकाणीही पसरतं आणि त्यामुळे मग तो त्रास वाढत जातो. त्यामुळे असा प्रयत्न करू नका.चला तर मग आज आपण बघू या चेहऱ्यावरचे व्हाईट हेड्स काढून टाकण्याचे काही घरगुती उपाय कोणते आहे.त्याविषयीची सविस्तर माहिती..

मुलतानी माती आणि गुलाबपाणी हे मिश्रणदेखील व्हाईट हेड्स काढून टाकण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. यासाठी मुलतानी मातीचा लेप चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटांसाठी राहू द्यावा. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यावा.


सर्वप्रथम आधी चेहऱ्याला काही मिनिटे गरम पाण्याची वाफ द्या. यानंतर टी ट्री ऑईलचे एक- दोन थेंब, 1 चमचा मध आणि हरबरा डाळीचे पीठ एकत्र करा आणि त्या स्क्रबने चेहऱ्याला मसाज करा. काही वेळ स्क्रब चेहऱ्यावर तसाच ठेवा आणि नंतर चोळून चोळून थंड पाण्याने धुवून टाका.


आता तिसरा उपाय करण्यासाठी गव्हाचं पीठ, चिमुटभर हळद आणि कोरफडीचा गर वापरावा. यासाठी सगळ्यात आधी चेहऱ्याला काही मिनिटे वाफ द्या. त्यानंतर या तिन्ही गोष्टी एकत्र करून त्याचा स्क्रब तयार करा. हा स्क्रब ओल्या चेहऱ्यावर लावा आणि चेहऱ्यावर उलट दिशेने चोळा. 8 ते 10 मिनिटे मसाज केल्यानंतर चेहरा धुवून टाका.


कॉर्नस्टार्च आणि व्हिनेगर किंवा लिंबाचा रस यांचा वापर करूनही चेहऱ्यावरील व्हाईट हेड्स काढून टाकता येतात. यासाठी 1 चमचा कॉर्नस्टार्च आणि 1 चमचा व्हिनेगर एकत्र करा. व्हिनेगर नसल्यास लिंबाचा रस वापरू शकता. चेहरा धुवून घ्या. त्यानंतर ज्याठिकाणी व्हाईट हेड्स आहेत, त्या ठिकाणी हे मिश्रण लावा आणि हलक्या हाताने एक- दोन मिनिटे मसाज करा. त्यानंतर 6 ते 8 मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Assembly News: बारामतीत खळबळ! श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री सर्च ऑपरेशन, काय म्हणाले युगेंद्र पवार ?

थोडक्यात वाचला! फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह अन् अम्पायरचा चेहरा...; भारतीय संघ सराव करतोय त्या 'पर्थ' येथे घडला प्रकार

Latest Marathi News Updates : पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू

Ramesh Kadam: शरद पवार गटाच्या नेत्याच्या अपहरणाचा प्रयत्न, म्हणाले-बाबा सिद्दिकींप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव

'पाथेर पांचाली' मधील दुर्गा कालवश ; ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांच्या निधनाने बंगाली सिनेविश्वाला धक्का

SCROLL FOR NEXT