actress akshaya bhingarde sakal
लाइफस्टाइल

आईपण ‘एंजॉय’ करा

मला आईपणाची चाहूल लागली, त्यावेळी माझी कोणतीही मालिका सुरू नव्हती. मात्र, एका नवीन दैनिक मालिकेसाठी मला विचारण्यात आलं होतं. तेव्हा मी त्यांना सांगितलं, की ‘मी प्रेग्नंट आहे.

सकाळ वृत्तसेवा

- अक्षया भिंगार्डे

मला आईपणाची चाहूल लागली, त्यावेळी माझी कोणतीही मालिका सुरू नव्हती. मात्र, एका नवीन दैनिक मालिकेसाठी मला विचारण्यात आलं होतं. तेव्हा मी त्यांना सांगितलं, की ‘मी प्रेग्नंट आहे. तुम्हाला चालणार आहे का?’  कारण, सहा-सात महिन्यानंतर मला ब्रेक घ्यावा लागणार होता. विरेन सरांची ती मालिका होती, म्हणून मी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकत होते.

कारण, मी आधी त्यांच्याबरोबरच काम केलं होतं. त्यावेळी त्यांनी हे पात्र रोज दिसणार असल्यामुळे ब्रेक घेता येणार नाही, असं सांगितले. मात्र, यापुढे नक्कीच चांगलं एकत्र काम करूयात, असं आश्वासन त्यांनी देऊन ‘आता तू आईपण एन्जॉय कर,’ असा सल्ला दिला. 

प्रेग्नन्सीच्या काळात माझा खूप आराम सुरू होता. मी खूप जणांकडून ऐकलं होतं, की नऊ महिने मनसोक्त खाऊन-पिऊन घे. झोपा काढून घे. एकदा बाळ झालं की मनासारखी झोप घेता येणार नाही. मग मी चांगल्या वेब सिरीज बघणं, यूट्युबवर चांगले व्हिडिओज पाहत होते. ‘ गर्भसंस्कार’चे क्लासेस केले होते. त्यानुसार रोज मेडिटेशन करणं चालू होतं.

आई होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मी करिअरबाबत फारसा विचार केला नव्हता. मला कविता लाड या अभिनेत्रीचं उत्तम उदाहरण माहीत होतं. तिनं तिच्या दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका नऊ महिने केली आणि बाळ झाल्यानंतर दोन महिने ब्रेक घेऊन ती परत बाळाला घरी ठेवून शूटिंगला जाऊ लागली. 

बाळ झाल्यानंतर पहिलं वर्ष खूपच टेन्शनचं होतं,  कारण २०१९ नोव्हेंबरमध्ये मला सक्षम झाला आणि आम्ही नवीन घर विरारला घेतलं होतं. तेथे राहण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यानुसार विरारला शिफ्ट झालो. मात्र, दोन-तीन महिन्यांतच लॉकडाऊन लागलं.  मी राहत होते, तिकडे फार माणसं राहायला आली नव्हती. त्या गोष्टीचा मला फायदाही झाला. मी, माझा नवरा आणि बाळ सुरक्षित होतो.

मात्र, आम्ही विरारला आणि सगळं सासर ठाण्याला असल्यामुळे त्यांच्याशी आमचा संपर्क तुटला होता. आम्ही फक्त फोनवरच बोलू शकत होतो आणि व्हिडिओ कॉल वगैरे चालू होते. त्या काळामध्ये घरात काम करण्यासाठी माणसंही मिळत नव्हती,  त्यामुळे सगळीच कामं मला करायला लागत होती. त्याच्यातून मी आईपण शिकत गेले. घर कसं सांभाळायचं, मुलगा कसा सांभाळायचा, त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा हे सगळं मी शिकू लागले.

हे खूपच हेक्‍टिक होतं; पण नवरा माझ्याबरोबर होता. त्यावेळी त्यानं मला खूपच छान साथ दिली. सक्षमला अंघोळ घालण्यापासून ते तयारी करण्यापर्यंत तो सगळं पाहत होता. तोपर्यंत मी जेवण आणि नाश्ता करायचे. आई, सासू, नणंद आणि जाऊ या सगळ्यांच्या भूमिका माझा नवरा पार पाडत होता. तो रोज ऑफिसला गेला असता आणि बारा तास बाहेर राहिला असता, तर सक्षमची वाढ त्याला बघता  आली नसती. खरंतर कोरोनामुळे त्याला वडीलपण अनुभवता आलं.

करिअरमध्ये पुन्हा जॉईन होणं हा माझ्यासाठी खूप मोठा निर्णय होता. कोरोना काळात  थोडेसे प्रॉब्लेम आल्यानं काम करणं गरजेचं होतं. त्यासाठी मी सगळीकडे अप्लाय करत होते. मला त्याचदरम्यान कलर्स वाहिनीवर एका हिंदी मालिकेत भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मला मुलीच्या आईची भूमिका मिळाली. मात्र, माझी आई कोरोना झाल्यानंतर माझ्याकडे आली, नंतरची सर्व काळजी मला घ्यावी लागत होती.

तिला वेळ देणं, सक्षमला वेळ देणं आणि शूटिंगला जाणं हे सगळं करण्यासाठी माझी कसरत होत होती. त्या काळात माझ्या सासरच्यांनी खूप मदत केली. आम्ही सक्षमला ठाण्याला सासरी ठेवायचं ठरवलं. शनिवार, रविवार किंवा सुट्टी असेल, त्यावेळी मी सक्षमला भेटत असे. तो पूर्ण दीड वर्षाचा काळ फारच कठीण होता. माझा आणि माझ्या मुलाचा दुरावा कॅरेक्टरमध्ये वर्क झाला.

तिकडे सगळे सीन करताना त्याची मदत झाली; पण तारांबळ खूप झाली.अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करणं आणि ऑफिसमध्ये काम करणं, यात खूप फरक पडतो. ऑफिसमध्ये तुम्ही रजा, सुट्ट्या घेऊ शकता. हाफ डे घेऊ शकता; पण अभिनय क्षेत्रामध्ये या गोष्टी लागू होत नाहीत. कलाकार प्रत्यक्षपणे उपस्थित राहणं गरजेचं असतं.

त्याशिवाय तो सीन पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे मुलींना अभिनयात करिअर करताना घरच्यांचा पाठिंबा असणं खूप गरजेचं आहे. मला कुटुंबीयांकडून दोनशे टक्के पाठिंबा मिळाला. म्हणून मी करिअरला री-जॉईन करू शकले. 

आई झाल्यावर माझा करिअरकडे  बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आई झाल्यानंतर ‘नऊ ते नऊ वेळ तुम्हाला देते, त्यावेळेस तुम्ही माझ्याकडून भरपूर काम करून घ्या,’ असं सांगत होते; पण नऊ वाजले, की आई जागी व्हायची आणि मला मुलाकडे जाणं गरजेचं वाटतं असे. तो बारा तास माझ्यापासून लांब राहतोय, ही भावना आणि हे गिल्ट घेऊन लांब राहणं भयानक असतं.

तो गिल्ट तुम्हाला आणि समोरच्यालाही दिसतो. त्या काळामध्ये चित्रीकरणावरून घरी गेल्यावर मी इतकी रडायचे, की त्याची भरपाई होणं अशक्य आहे.  करिअर करत असताना आई झाल्यावर आपल्याला शंभर टक्के मुलासाठी देता येत नाहीत; पण घरच्यांचा पाठिंबा असल्यास पुन्हा करिअरमध्ये प्रवेश करताना अडचण येत नाही, हेही तितकंच खरं आहे.

करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स...

  • प्रत्येकाचं आईपण वेगळं असतं आणि छानच असतं. तुम्ही ते अनुभवा आणि खूप पॉझिटिव्ह राहा.

  • आई होणं ही भावना खरंच खूप सुखद आहे. ती तुम्ही आनंदाने एंजॉय करा.

  • आई होणं ही एक दैवी देणगी आहे आणि जी फक्त एक महिला म्हणून आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे त्याचा आनंद प्रत्येक महिलेने घ्यायला हवा. 

  • आई होण्याचा निर्णय करिअरसाठी बाजूला ठेवू नका. तुम्ही टॅलेंटेड असाल तर काही प्रश्नच नाही. तुम्ही विसाव्या वर्षी तेवढंच चमकाल आणि  चाळिसाव्या वर्षीही तेवढेच चमकाल.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Adani Group: अदानींना एकाच वेळी 3 मोठे झटके, 600 दशलक्ष डॉलरची योजना रद्द, केनिया करारही रद्द आणि...

Nashik Vidhan Sabha Election 2024 : वाढलेला टक्का, कोणाच्या छातीत कळ, कुणाला पाठबळ..? उमेदवारांमध्येच चर्चा

केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं... प्राजक्ता माळीची इन्स्टावर नवी पोस्ट, हसऱ्या चेहऱ्याने दिली आनंदाची बातमी

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव?

SCROLL FOR NEXT