Mother's Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Mother's Day 2024 : यंदाच्या जागतिक मातृदिनी आईला द्या आकर्षक भेटवस्तू, जाणून घ्या 'हे' भन्नाट ऑप्शन्स

Mother's Day 2024 : यंदा जगभरात १२ मे (रविवारी) जागतिक मातृदिन साजरा केला जाणार आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Mother's Day 2024 : जगभरात दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी ‘मदर्स डे’ अर्थात जागतिक मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी या दिवसाची तारीख बदलत राहते. यंदा हा जागतिक मातृदिन १२ मे रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. आईला समर्पित असणारा हा दिवस तिच्यावरील प्रेमासाठी, तिने मुलांसाठी आणि कुटुंबासाठी केलेल्या त्यागासाठी साजरा केला जातो.

मदर्स डे च्या निमित्ताने आईप्रती असलेले प्रेम, काळजी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक जण आईला गिफ्ट देतात. गिफ्ट देणे हा केवळ आईचे आभार मानण्याचा एक सोपा मार्ग आहे.

जर तुम्ही देखील ‘मदर्स डे’ च्या निमित्ताने आईसाठी सुंदर भेटवस्तू घेण्याचा विचार करत असाल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला 'मदर्स डे' निमित्त आईला देण्यासाठी आकर्षक आणि काही हटके गिफ्ट्सचे ऑप्शन्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या गिफ्ट्सबद्दल.

सेल्फ केअर किट

मदर्स डे निमित्त आईला भेट म्हणून देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आजकाल मार्केटमध्ये विविध प्रकारचे सेल्फ केअर किट्स उपलब्ध आहेत. या सेल्फ केअर किटमध्ये पेडिक्युअर किट, मॅनिक्युअर किट, फेशिअल किट, स्किन केअर किट, हेअर केअर किट किंवा मग मसाज किट इत्यादींचा समावेश होतो. तुमच्या बजेटनुसार तुम्ही यापैकी कोणतेही एखादे सेल्फ केअर किट आईला भेट म्हणून देऊ शकता. (Self Care kit )

मेकअप किंवा ज्वेलरी बॉक्स

आई ही अशी व्यक्ती आहे, की जी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या गरजांची काळजी घेते आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते. परंतु, अनेकदा ती स्वत:ला लागणाऱ्या वस्तू घेण्यास विसरते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आईसाठी मेकअप किंवा ज्वेलरी बॉक्स खरेदी करू शकता. हा एक सुंदर पर्याय आहे. या बॉक्समध्ये आईला तिची ज्वेलरी किंवा मेकअपशी संबंधित असणाऱ्या वस्तू ठेवता येतील. (makeup Or jewellery Box)

हॅंडमेड पेंटिंग

आपल्या मुलांजवळ असणारी प्रत्येक वस्तू आई व्यवस्थित सांभाळते. त्या वस्तूंची नीट काळजी घेते. तिच्याकडे स्वत:चे फोटो कमी असतील. परंतु, मुलांचे फोटो भरपूर असतात. अशावेळी तुम्ही मदर्स डे च्या निमित्ताने खास आईचा एखादा फोटो वापरून त्यापासून एखादे सुंदर हॅंडमेड पेंटिग बनवून घेऊ शकता. स्वत:चा असा सुंदर फोटो पाहून आईच्या डोळ्यांमध्ये नक्कीच आनंदआश्रू येतील. (Handmade painting)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT