Mothers day 2024 esakal
लाइफस्टाइल

Mothers Day 2024 : सगळ्यांसाठी सगळं करणाऱ्या आईसाठी एवढं तर करायलाच हवं? असा बनवा Mothers Day स्पेशल!

सकाळ डिजिटल टीम

Mothers Day 2024 :

जगभरात प्रत्येक नात्यावर प्रेम व्यक्त करणारा एक खास दिवस असतो. आईवर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो. कारण, आईबद्दल आपल्या मनात हळवा कप्पा असतो. वर्षातले सगळे दिवस आईचेच असतात तरीही आईसाठी एक स्पेशल दिवस असतो. तो म्हणजे मदर्स डे.   

मदर्स डे (Mothers day 2024 ) दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यावेळी 12 मे रोजी साजरा केला जाईल. हा दिवस मातांचे प्रेम, समर्पण, त्याग आणि समर्थनासाठी आभार मानण्याचा दिवस आहे. मदर्स डे साजरा करण्याची सुरुवात अमेरिकेच्या एना एम. जोविस यांनी केली. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो.

अनेक देशांमध्ये हा दिवस सुट्टीचाही असतो. युरोप आणि ब्रिटनमध्ये, अगदी एका रविवारी आईचा सन्मान करण्याची परंपरा आहे, ज्याला मदरिंग संडे म्हणतात. भारतातही हा ट्रेंड वाढला आहे. (Mothers Day 2024 )

सगळ्यांच सगळं करणारी आई आपण तिच्यासाठी काही वेगळं करूयात असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल. तर आज आम्ही तुम्हाला काही स्पेशल गोष्टी सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा आणि आईचा दिवस स्पेशल होईल.

आईला सुट्टी द्या

आईचा हा दिवस स्पेशल बनवण्यासाठी तिला एक दिवस सुट्टीवर पाठवा. आई सतत कामात असते. तिला स्वत:साठी वेळ मिळत नाही. तिला तिच्या हक्काचा दिवस मिळावा यासाठी तिच्या मैत्रिणींसोबत किंवा तिच्यासाठी सोलो ट्रिप प्लॅन करा.

आईसाठी मुव्ही प्लॅन करा

आजकाल अनेक वेबसिरीज, चित्रपट मालिकांमधून आईबद्दलचे महत्त्व सांगितले जाते. पण स्वत: ती तो चित्रपट कितीवेळा पाहते याचा विचार तुम्ही केलाय का? आजकालची आई व्हॉट्सअप चालवणारी आहे असे म्हटले जाते. पण मुलांची घराची जबाबदारी तिला मोकळेपणाने एक चित्रपट पहायला देत नाही. कारण, ती एकटी कधी जात नाही. त्यामुळे मदर्स डे दिवशी आईसाठी मुव्हीची तिकीटे काढून आणा.

आईसाठी डिनर प्लॅन करा

तुम्हाला घरातील प्रत्येकाला आवडतील ते पदार्थ बनवून घालणाऱ्या आईला काय आवडतं याचा तुम्ही विचार केलाय का? फार कमी लोक आहेत ज्यांना आपल्या आईला काय आवडत हे माहितीय. कारण, इतरवेळी तुम्ही घरातून बाहेर खायला गेला की तुम्ही घेऊन याल ते ती गपचूप खाते.

त्यामुळेच आईसाठी एक डिनर प्लान करा. तुमच्यासोबत एखाद्या हॉटेलमध्ये जाणं तिला आवडणार नाही, ती म्हणेल की उगीच कशाला खर्च करतोय, तरी तुम्ही ऐकू नका. तिला हक्काने जेवायला घाला. ती मनातून सुखावेल.

आईला भेटवस्तू द्या

आई सगळ्यांसाठी सगळं करते. घरी कोणी पहिल्यांदा आलं तर त्यांचा मानपान करते. पण आईला कोणी असं करत का हो? तुमची आई बऱ्याच दिवसांपासून एखादी साडी, एखादी वस्तू जी तिच्या कामाची असेल ती मागत असते. मात्र खर्च जास्त होईल म्हणून ती घेत नाही. अशावेळी तुम्हाला माहिती असलेली एखादी तिच्या उपयोगाची वस्तू तिला घेऊन द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT