आई मला भूक लागली... खायला दे.... आई... १० मिनिटं झाली ग सांगून खायला देना... आई बस येतेय शाळेची पटकन चल... आजकाल तुझं लक्षच नसतं माझ्याकडे... सारखा फोन बघतेस... अशी वाक्य मुलांकडून (Kids) तुम्हाला एेकावी लागत असलीतल तर... आयांनो (Mothers) ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे कारण मुलाचे महत्वाचे काम सोडून तुम्ही सतत मोबाइल (Mobile Addiction) बघत असाल तर तुमच्या मुलाच्या विकासावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. एका अभ्यानुसार, आया जर फोनचा वापर सारखा करत असेल तर ती आणि मुलगा यांच्यातील संवाद चार टकक्यांनी कमी होतो. तसेच मुलांच्या वाढीवरही त्याचे नकारात्मक परिणाम होतात.
तेल अवीव विद्यापीठाच्या सॅकलर फॅकल्टी ऑफ मेडिसिन ऑफ स्टॅनले स्टीयर स्कूल ऑफ हेल्थ प्रोफेशन्सच्या कम्युनिकेशन डिसऑर्डर विभागाच्या डॉ. कॅटी बोरोडकिन यांच्या नेतृत्वाखाली बाल विकास जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. केलेल्या संशोधनात ३३ इस्त्रायली आया आणि त्यांची २४ ते ३६ महिन्यांच्या दरम्यान वयोगट असलेली१६ लहान मुले सहभागी झाली होती. त्यांची तपासणी केली गेली.
तीन समुहात त्यांची विभागणी केली गेली. पहिल्या समुहाला फेसबुकचा वापर, दुसऱ्यांना मासिक वाचणे आणि तिसऱ्यांना फोन बाजूला ठेवून मुलांशी खेळायला सांगितले. याकाळात मुले आणि आयांमधला संवादाचे तीन पैलू पाहण्यात आले. भाषा, संवाद आणि मुलाच्या गरजेच्यावेळी आईची प्रतिक्रिया या गोष्टी पाहिल्या गेल्या. यावेळी आयांना या अभ्यासाविषयी माहिती नव्हती. म्हणून त्या मुलांशी नैसर्गिकपणे वागल्या. बोरोडकिनन यांच्या टिमने आया आणि मुलांमधील संवादाचे व्हिडिओही काढले. त्यांच्या परस्पर संवादाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी ते स्कॅन केले.
त्यात असे आढळले की, स्मार्टफोनमध्ये गुंतलेल्या आया मुलांशी चारपट कमी संवाद साधताना दिसल्या. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यातही त्यांनी फारसा इंटरेस्ट दाखवला नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी दिलेल्या निवडक प्रश्नांची उत्तरेही समाधानकारक नव्हती. मासिक वाचणाऱ्या आयांच्या प्रतिक्रियाही अशाच होत्या. तर, स्मार्टफोन सोडून मुलांसोबत खेळणाऱ्या आयांचे सर्व लक्ष मुलांकडेच होते. मुलांच्या प्रत्येक गरजेला ती लगेच प्रतिसाद देताना दिसली.
बोरोडकिनच्या मते, आमच्या सध्याच्या संशोधनात आम्ही फक्त आई आणि मुलाच्या नात्यावर भर दिला. पण, आमचे निष्कर्ष वडील (Father)आणि मुलांमधील संबंधावरही भर देणारे आहेत. कारण स्मार्टफोन वापरण्याची दोघांचीही सारखीच असते, त्यामुळे आम्ही अशा शक्यतांचा अंदाज लावतो. या अभ्यासाचे निष्कर्ष मात्र आई-वडील दोघांनाही लागू होतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.