Arunachal Pradesh Travel esakal
लाइफस्टाइल

Arunachal Pradesh Travel : रोजच्या गजबजाटापासून दूर जाऊन निवांत क्षण घालवायचेत? मग, अरूणाचल प्रदेशातील 'या' ठिकाणांना द्या भेट

Arunachal Pradesh Travel : रोजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या अतिरिक्त ताणामुळे अनेक जण वैतागून जातात. या बोरिंग रूटिनमधून थोडा वेळ स्वत:साठी काढावा, असे प्रत्येकाला वाटते.

Monika Lonkar –Kumbhar

Arunachal Pradesh Travel : रोजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या अतिरिक्त ताणामुळे अनेक जण वैतागून जातात. या बोरिंग रूटिनमधून थोडा वेळ स्वत:साठी काढावा, असे प्रत्येकाला वाटते. यासाठी तुम्ही फिरायला जाणे हा बेस्ट पर्याय आहे.

फिरायला गेल्यामुळे तेवढाच रोजच्या कामातून जरा ब्रेक मिळतो, यामुळे, तुमचा मूड देखील फ्रेश होतो. जर तुम्ही देखील फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, त्यासाठी अरूणाचल प्रदेश हा उत्तम पर्याय आहे.  

आता उन्हाळ्याला देखील सुरूवात झाली आहे. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसोबत तुम्ही अरूणाचल प्रदेशला जाऊ शकता. येथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवायला मिळेल. आज आम्ही तुम्हाला अरूणाचल प्रदेशमध्ये फिरण्यासाठी बेस्ट असलेल्या काही ठिकाणांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात. (Arunachal Pradesh Travel)

नामदाफा राष्ट्रीय उद्यान

अरूणाचल प्रदेशातील पर्यटकांचे हे सर्वात आवडते ठिकाण आहे. हे भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उदयान आणि जगातील सर्वाधिक जैवविविधता असलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे. हे ठिकाण अरूणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यातील म्यानमारच्या सीमेजवळ स्थित आहे.

या राष्ट्रीय उद्यानामध्ये तुम्हाला वाघ, हत्ती, गेंडा, बिबट्या इत्यादी विविध प्राणी पहायला मिळतील. यासोबतच मिश्मी टॅकिन आणि हूलॉक गिब्बन सारख्या दुर्मिळ प्रजाती देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. यासोबतच विविध प्रकारचे पक्षी तुम्हाला या उद्यानात पाहायला मिळतील. (Namdapha National Park)

मेचुका व्हॅली

अरूणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग जिल्ह्यात स्थित असलेली ही एक सुंदर दरी आहे. ही नयनरम्य व्हॅली तेथील हिरव्यागार टेकड्या, पाईन वृक्षाची घनदाट जंगले आणि गरम पाण्याचे झरे इत्यादींसाठी ओळखली जाते.

टागिन आणि हिलमिरी या आदिवासी जमातींसह इतर आदिवासी संस्कृतीचे हे घर देखील आहे. त्यामुळे, या व्हॅलीला भेट देण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक गर्दी करताना दिसतात. विशेष म्हणजे हिवाळ्यात जेव्हा बर्फाने हा प्रदेश झाकला जातो, तेव्हा हा परिसर आणखी सुंदर दिसतो. (Mechuka Valley)

तवांग मठ

हा भारतातील सर्वात मोठा मठ म्हणून ओळखला जातो. अरूणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात चीनच्या सीमेजवळ हा मठ स्थित आहे. जगातील सर्वात मोठ्या बौद्ध मठांपैकी एक म्हणून या मठाला ओळखले जाते.

विशेष म्हणजे १७ व्या शतकात तिबेटी लामा मेरेक लामा यांनी या मठाची स्थापना केली होती. या मठात विविध प्रकारची शिल्पे, चित्रे, हस्तलिखिते आणि बौद्ध कलाकृतींचा मोठा संग्रह पहायला मिळतो. जगभरातील असंख्य पर्यटक या ठिकाणी दरवर्षी भेट देत असतात. (Tawang Monastery)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT