Brain Eating Amoeba Sakal
लाइफस्टाइल

Brain Eating Amoeba: मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला ५ वर्षीय मुलीचा जीव, जाणून घ्या Naegleria Fowleri बद्दल सविस्तर

पुजा बोनकिले

Brain Eating Amoeba: केरळमधील मलप्पुरम येथील पाच वर्षीय मुलीचा कोझिकोडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात नेग्लेरिया फॉवलेरी म्हणजेच मेंदू खाणाऱ्या अमिबाने मृत्यू झाला आहे. या मुलीवर १३ मे पासून उपचार सुरू होता. तिला एका आठवड्यापेक्षा जास्त काळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही मुलीचा जीव वाचवू शकले नाही. नेग्लेरिया फॉवलेरी अमिबा, एक दुर्मिळ परंतु गंभीर मेंदू संसर्गामुळे होतो. हा संसर्ग कसा पसरतो याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.

कुठे आढळतो?

नेग्लेरिया पॉवलेरी हा विषाणू गोड्या पाण्यात आणि मातीमध्ये आढळणारा एक विषाणू आहे. हा विषाणू अस्वच्छ ठिकाणी सापण्याची जास्त शक्यता असते. हा विषाणू नाकातून शरीरात प्रवेश करतो. त्यानंतर तो मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदू खायला सुरूवात करतो. यामुळे मेंदूला सूज येते.यावर वेळेवर उपचार न केल्यास जीव गमावू शकता. प्राइमरी अमेबिक मेनिंगोएन्सेफलायटीस हा मेंदूच्या संसर्गाचा दुर्मिळ प्रकार आहे. हा नेग्लेरिया फॉवलेरीमुळे होतो. नेग्लेरिया फॉवलेरी अमिबाचा एक प्रकार आहे.

नेग्लेरिया फॉवलेरीची लक्षणे कोणती

या आजारात डोकेदुखी, ताप, मळमळ, उलट्या ही लक्षणे दिसतात. काही वेळा रूग्ण कोमातही जावू शकतो.यूएस सीडीच्या मते पीएएम असलेले रूग्ण लक्षणे दिसू लागल्यानंतर १ ते १८ दिवसांच्या आत मृत्यू पावतात.

उपचार

मेंदू खाणारा हा संसर्ग झपाट्याने वाढतो. पण या आजारावर कोणतेही प्रभावी उपचार मिळाले नाही. सध्या या आजाराला बळी पडलेल्या रूग्णांवर डॉक्टर ॲम्फोटेरिसिन बी, ॲझिथ्रोमाइसिन, फ्लुकोनाझोल, रिफाम्पिन, मिल्टेफोसिन आणि डेक्सामेथासोन या औषधांच्या मिश्रणाने उपचार केले जातात. देशभरात आतापर्यंत पीएएमची २० प्रकरणे नोंदवली गेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarpanch Remuneration: सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Ladki Bahin Yojna: 'या' तारखेला येणार लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता; मंत्री तटकरे यांची माहिती

Supreme Court : चाइल्ड पॉर्नोग्राफी डाऊनलोड करणे गुन्हा, मग कोणी व्हॉट्सॲपवर पाठवलं तर? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय काय सांगतो?

आबरा का डाबरा! Rohit Shrama ने सामना सुरू असताना केली बेल्सची अदलाबदल; Video Viral

Latest Maharashtra News Updates Live: लोकलमध्ये सापडली 20 लाखांची रोकड असलेली बॅग

SCROLL FOR NEXT