हिंदू धर्मात नागपंचमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकऱ्यांचा मित्र असलेला नागदेवतेला देवांच्या रूपात पूजलं जातं. तसेच एखादा नाग रस्त्यात आडवा गेला त्याला नमस्कार करून त्याच्या प्रती असलेली भक्ती दाखवली जाते. पूर्वीच्या काळात लोक सापांसोबत राहायचे. पण आत्ताच्या लोकांमध्ये सापाबद्दल एक भीती दिसते.
नागदेवते प्रती असलेली श्रद्धा दाखवण्यासाठी नागपंचमीचा दिवस महत्त्वाचा आहे. या दिवशी घरोघरी नागांच्या प्रतिमा पूजल्या जातात. महाराष्ट्रात नागदेवतेची मातीची मूर्ती असतात त्यांची घरोघरी पूजा केली जाते.
गावातील भगवान शंकरांच्या आणि नागदेवतांच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी होते. गावागावातल्या मंदिरात अभिषेक केला जातो पूजा केली जाते. आणि महाप्रसादाचे ही नियोजन असते. काही गावात तर या दिवशी जत्रा ही भरते.
श्रावण महिन्यात 9 ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरे होणार आहे. नागपंचमीच्या दिवशी भारतातील सर्वच नाग मंदिरात सुद्धा उत्साहाचे वातावरण असते. तुम्हालाही या मंदिरांना भेट देता आली तर चांगलेच आहे. भारतातील महत्त्वाची आणि रहस्यमयी नागदेवतेचे मंदिर कोणती आहेत हे जाणून घेऊया.
पातळ लोकात राहणाऱ्या आठ प्रमुख नागांमध्ये तक्षक नागाला सापांचा स्वामी मानलं जातं. हा प्रमुख नाग आहे त्यामुळे याची अनेक मंदिरे आहेत. भारतात उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज शहरात तक्षक नागाचे एक मंदिर आहे. ज्याला तक्षकेश्वर महादेव मंदिर असे म्हटले जाते. श्रावणातील नागपंचमी दिवशी या मंदिरात देवाचे दर्शन घेतल्याने कुंडलीतील कालसर्प दोष दूर होतात अशी मान्यता आहे.
भारतातील आठ दशकांहून अधिक जुने नागदेवतेचे हे मंदिर जम्मूमधील पटणीटाप येथे आहे. धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे या नाग मंदिरात नागपंचमी दिवशी पूजा केली की जीवनातील अनेक दुःख कष्ट दूर होतात. त्यामुळेच नागपंचमी दिवशी या मंदिरात गर्दीचा महापूर उसळलेला असतो.
अशी मान्यता आहे की, इच्छाधारी नागदेवतेने ब्रह्मचारी रूपात येथे तप केले होते. तप यशस्वी झाल्यानंतर या नागदेवतेचे रूपांतर शिवलिंगात झाले. त्यामुळेच इथे महिलांना प्रवेश बंदी आहे.
उज्जैनमध्ये महाकाल मंदिर मधील नागदेवतेचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. जे वर्षभर बंद असते आणि केवळ नागपंचमी दिवशीच उघडले जाते. मान्यतेनुसार येथे तक्षक नाग विराजमान आहे.
नागदेवतेचे हे पवित्र मंदिर उत्तराखंडमधील बागेश्वर येथे आहे. धौलीनाग मंदिर कालिया नागाशी संबंधित आहे. हिंदू मान्यतेनुसार धौली नाग हा कालिया नागाचा ज्येष्ठ पुत्र आहे. पूजा करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी लोक मोठ्या संख्येने या मंदिरात येतात. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की धौलीनागची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींपासून त्यांचे संरक्षण होते.
प्रयागराजमधील नाग वासुकीचे मंदिर, उत्तर प्रदेशचे संगम शहर म्हणून ओळखले जाते, हे गंगा नदीच्या काठावर दारागंज परिसरात वसलेले आहे. नागपंचमीच्या दिवशी या मंदिरात दर्शनासाठी आणि पूजेसाठी भाविकांची मोठी गर्दी होते. हिंदू मान्यतेनुसार नागवसुकी मंदिरात पूजा केल्याने व्यक्तीच्या कुंडलीत असलेला कालसर्प दोष दूर होतो.
नागपंचमीच्या दिवशी लोक या मंदिरात जाऊन नागदेवतेला दूध आणि गंगाजल अर्पण करतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुखाची कामना करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.