Nagpur news Are you suffering from mosquitoes Then plant these trees at home and repel mosquitoes 
लाइफस्टाइल

तुम्ही मच्छरांमुळे त्रस्त झाले आहात? मग घरी ही झाडे लावा आणि डासांना पळवा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : डास (मच्छर) अनेक रोगांचे वाहक आहे. तसेच वर्षागणिक लाखो माणसांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरत आहेत. आजच्याघडीला माणसाच्या जिवाला सर्वांत जास्त आणि अगदी सहज धोका उत्पन्न करू शकेल असा जगातील एकमेव कीटक म्हणजे डास झाला आहे. प्रत्येक घरात डासांची मोठी समस्या झाली आहे. ज्यांच्या घरात डास नाही असं घर क्वचितच सापडेल. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारखे जीवघेणे आजार बळावण्याचे प्रमाणही वाढले आहे.

डासांच्या समस्यांनी अनेक कुटुंब हैराण झालेली असतात. डास पळवण्यासाठी अनेक घरांत मच्छर अगरबत्ती, डास घालवण्यासाठीचे लिक्विड वापरले जाते. परंतु, या केमिकलयुक्त उपायांमुळे शरीराचे मोठे नुकसान होते. नकळतपणे श्वासामार्फत शरीरात जाणारा मच्छर अगरबत्तीचा केमिकलयुक्त धूर किंवा लिक्विड शरीराला कालांतराने मोठी हानी पोहोचवत असतो. त्यामुळे डास घालवण्यासाठी अशा केमिकलयुक्त पर्यायापेक्षा घरगुती आणि सुरक्षित उपायांचा वापर फायदेशीर ठरतो.

डास घालविण्यासाठी घरात अनेक केमिकल्सचा वापर करतो. परंतु, त्यामुळे आरोग्य आणि पर्यावरण दोन्हीचे नुकसान होते. नैसर्गिक पद्धतीने आपण डासांपासून मुक्ती मिळवू शकतो. काही खास मॉस्किटो रिप्लियन्ट प्लांट्स घरी लावल्याने डासांपासून सुटका मिळू शकते. चला तर जाणून घेऊया या झाडांबद्दल...

रोजमेरीचे झाड

रोजमेरी नैसर्गिक मॉस्किटो रिप्लियन्ट आहे. रोजमेरीचे झाड चार ते पाच फुटापर्यंत वाढते. उन्हाळ्यात हे झाड वाढते. कारण, या झाडाला गर्मीचीच गरज असते. म्हणून रोजमेरीला कुंडीतच लावावे आणि हिवाळ्यात घरात ठेवावे. उन्हाळ्यात रोजमेरीची कुंडी बगीचात ठेवावी. रोजमेरी मॉस्किटो रिप्लियन्टचे चार थेंब एक चतुर्थांश ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून लावावे. मात्र, त्याला थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवावे.

कॅटनिपचे झाड

कॅटनिप ही वनस्पती पुदिन्याच्या झाडासारखी दिसते. या वनस्पतीलाही मॉस्किटो रिप्लीयन्टचा दर्जा दिला गेला आहे. ही एक बारमाही वनस्पती असून ऊन आणि सावलीत वाढते. याची फुले पांढरे आणि लवेंडर रंगाची असतात. डासांना दूर ठेवण्यासाठी याला घराच्या मागील छतावर लावावे. मांजरांना या वनस्पतीचा सुवास आवडतो. म्हणून वनस्पतीची काळजी घेऊन तिला कुंपणात ठेवावे. या वनस्पतीची पाने चोळून रस चेहऱ्यावरही लावता येतो.

झेंडूचे झाड

झेंडूच्या फुलांमध्ये सुवास असतो जो माणूस, माशी आणि डासांना आवडत नाही. ही वनस्पती सहा इंच उंचीपासून तीन फुटापर्यंत वाढते. झेंडूची फुल अब्जियोंजवळच उगवले जातात कारण ते एफिड्स आणि इतर किड्यांना दूर ठेवतो. झेंडूची फुल पिवळ्या रंगापासून तर डार्क ऑरेंज आणि लाल रंगाचीही असतात. हे झाड सूर्य प्रकाशात वाढते म्हणून सावलीत त्यांची वाढ खुंटते. डासांना दूर ठेवण्यासाठी झेंडूचे झाड लावावे.

तुळशीचे झाड

तुळस ही औषधी वनस्पती आहे. जी दाबता आपला सुवास पसरते. डासांना दूर ठेवण्यासाठी कुंडीत तुळस लावावी आणि घराच्या मागच्या भागात ठेवावी. तुळशीची पाने चोळून ती त्वचेवर पण लावू शकता. तुम्ही कोणत्या प्रकारची तुळस लावू शकता. मात्र, दालचिनी तुळस, लिंबू तुळस आणि पेरू तुळस जास्त सुगंधामुळे अधिक फायदेशीर ठरते.

लवेंडरचे झाड

लवेंडर डासांना दूर ठेवण्यासाठी चांगली वनस्पती आहे. लवेंडर सहज उगवणारी वनस्पती आहे. ही वनस्पती चार फूट उंचीवर उगवते आणि वाढीसाठी वनस्पतीला सूर्यप्रकाशाची गरज असते. केमिकल फ्री मॉस्किटो सोल्यूशन बनविण्यासाठी लवेंडर ऑईल सरळ पाण्यात मिसळून स्कीनवर लावता येते. डासांना नियंत्रित ठेवण्यासाठी ही वनस्पती बसण्याच्या ठिकाणी लावावी. डासांना दूर ठेवण्यासाठी लवेंडर ऑईल मान, मनगट आणि गुडघ्यांवर पण लावू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT