Nail Biting Effects esakal
लाइफस्टाइल

Nail Biting Effects :  नखं खाण्याची सवय महागात पडेल,आत्ताच बंद करा नाहीतर आरोग्याच्या तक्रारींचा येईल महापूर

जेव्हा माणूस तणावात किंवा एखाद्या गुढ विचारात असतो तेव्हा तो नखे चावतो

सकाळ डिजिटल टीम

Nail Biting Effects : काही टेन्शन असेल, एखादा इंटरव्ह्युव होणार असेल तर अशावेळी लोक बैचेन असतात. कारण, त्यांच्या मनात भिती, शंका-कुशंका यांनी घर केलेलं असतं. पण, अशावेळी ते एक कृती नेहमी करत असतात. ती म्हणजे नखं खाणे किंवा चावणे होय.

मनोसोपचार तज्ज्ञांच्या मते, जेव्हा माणूस तणावात किंवा एखाद्या गुढ विचारात असतो तेव्हा तो नखे चावतो. खरं तर, याची व्यक्तीला सवय लागते. मग अगदी थोडं जरी टेंन्शन आलं किंवा विचारात मग्न असलं तर नखं खायची सवय लागून जाते. पण ही सवय अशा लोकांच्या आरोग्यावर परिणाम करणारी ठरू शकते. (Nail Biting Side Effects )

कारण, सतत नखे चावणे तुम्हाला आजारी पाडू शकते. आपण प्रत्येक गोष्ट आपल्या हातांनी करतो. तेव्हा नखांमध्ये घाण साचते. त्या घाणीत बॅक्टेरिया निर्माण होतात. जे नखे चावल्याने नखांवाटे तोंडात जातात. त्यामुळे सतत नखे कापणे आणि हात धुण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

लहान मुलं तर हाताची बोटे चोखत असतात. त्यांचे हात आणि नखांमध्ये घाण साचते. ती पोटात जासे त्यामुळे मुलांना जुलाब, पोट दुखी असे आजार होतात.  

नखं खाल्ल्याने काय होते?

सतत नखे चावत राहिल्याने शरीर अनेक रोगांचे घर बनू शकते. यामुळे, त्वचेला संसर्ग होण्याची शक्यता असते. ज्यामुळे तुमचे शरीर अनेक धोकादायक बॅक्टेरियांच्या संपर्कात येते.

नखे चावल्याने नखांचे आकार कायमचेच खराब होऊ शकतात. परंतु या व्यसनामुळे स्वच्छतेशी संबंधित समस्या तुम्हाला हानी पोहोचवू शकतात. इतकंच नाही तर तुमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांसाठी ही एक मोठी समस्या असल्याचे सिद्ध होते.

यामुळे तुमचे दात तर खराब होतातच पण हिरड्यांवरही वाईट परिणाम होतो. यामुळे तुमच्या हिरड्यांना संसर्ग तर होतोच पण ते कमकुवतही होतात.

असे केल्याने नखांच्या आजूबाजूची त्वचा कोरडी पडते आणि ती निघू लागते. हे ना स्वच्छ दिसते ना आरोग्यासाठी चांगले असते.

नखे चावण्याचा थेट परिणाम पचनसंस्थेवरही होतो. ज्यामध्ये अनेक बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतात आणि पोटात जंत होण्याची समस्याही उद्भवते. लहान मुलांना याचा जास्त त्रास होतो.

ही सवय सोडवावी कशी?

कितीही तणाव आणि चिंता असली तरी त्याचे व्यवस्थापन करायला शिकले पाहिजे. तणाव दूर करण्यासाठी इतरही अनेक उपाय आहेत, ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही.

या वाईट सवयीपासून मुक्त होण्यासाठी आपण आपल्या नखांवर काहीतरी कडू किंवा तिखट पदार्थ लावू शकता. किंवा आपल्या खिशात हात ठेवण्यास सुरुवात करू शकता.

तुम्ही तुमचे तोंड व्यस्त ठेवून या सवयीपासून मुक्त होऊ शकता. यासाठी तुम्ही च्युइंगम किंवा माउथ फ्रेशनर इत्यादी घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT