नमो ड्रोन दीदी  sakal
लाइफस्टाइल

नमो ड्रोन दीदी

प्रशांत पाटील

योजना

आपल्या देशात तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार होत आहे. यातच घरातील महिलांना तंत्रज्ञानाच्या साथीने विविध प्रकारची कामे करत आहेत. ग्रामीण भागातील महिलांना ड्रोन चालवण्याच्या माध्यमातून पैसे कमावण्याची एक संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे. या योजनेला ‘नमो ड्रोन दीदी योजना’ असे नाव दिलं आहे.

योजना नेमकी काय?

योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवणे, डेटा विश्लेषण आणि ड्रोनची निगा कशी राखायची याचे प्रशिक्षण देण्यात येते.

  • शेतीच्या विविध कामांसाठी ड्रोनचा कसा वापर करता येईल, याचा यात समावेश असतो.

  • पिकांचे निरीक्षण, कीटकनाशकांची फवारणी, बियांची पेरणी यांचा समावेश आहे.

  • योजनेत महिलांना १५ दिवस ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

  • ड्रोन दीदी म्हणून काम करणाऱ्या महिलेला १५ हजार रुपये पगार मिळतो.

  • १० ते १५ गावांचे एक क्लस्टर बनवून त्यातून ड्रोन दीदीची निवड होते आणि प्रशिक्षण दिले जाते.

  • महिलांचा पगार हा डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यावर जमा होतो.

निवड कशी होते?

केंद्र सरकारने ही योजना २०२३ मध्ये सुरू केली होती. या योजनेचे उद्दिष्ट देशातील १५ हजारांहून अधिक महिलांना ड्रोन दीदी बनवण्याचे आहे. यात निवड होण्यासाठी संबंधित महिला एखाद्या स्वयंसेवी समूहातील सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे. वयाची अट १८ ते ३७ वर्षे आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड

  • रहिवासी दाखला, पॅन कार्ड

  • स्वयंसेवी संस्थेचं ओळखपत्र पासपोर्ट साईज छायाचित्र मोबाईल नंबर, ईमेल आयडी

  • अर्ज कोठे करायचा?

  • संबंधित तालुका कृषी अधिकारी

  • (शब्दांकन : मीनाक्षी गुरव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT