National Brother's Day 2024 : भावासोबतचे नाते जितके स्नेहाचे आणि प्रेमाचे असते, तितकेच ते मैत्रीपूर्ण असते. भावा-बहिणीचे नाते प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे असते. या अतूट नात्यात जितकी मैत्री असते, तितकीच त्यांच्यात भांडणे देखील होतात.
मज्जा-मस्ती करणे, आई वडिलांपासून चुका लपवणे, शिक्षा टाळणे, खोडकरपणा करणे असे अनेक प्रकार या भावंडांमध्ये घडताना दिसतात. भावा-बहिणीचे हे प्रेमळ नाते हिंदू धर्मात भाऊबीज आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात साजरे केले जाते.
परंतु, तुम्हाला माहित आहे का? की जसा ‘सिस्टर्स डे’ साजरा केला जातो, तसाच राष्ट्रीय स्तरावर ‘ब्रदर्स डे’ देखील साजरा केला जातो. आज देशभरात ब्रदर्स डे साजरा केला जात आहे. खरे तर २००५ मध्ये अमेरिकेत ब्रदर्स डे साजरा करण्यास सुरूवात करण्यात आली.
त्यानंतर, अनेक देशांमध्ये २४ मे हा दिवस ब्रदर्स डे म्हणून साजरा केला जाऊ लागला. हा दिवस साजरा करण्यासाठी तुम्ही तुमच्या भावासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. तसेच, बालपणीच्या आठवणींना उजाळा देखील देऊ शकता. यासाठी तुम्ही भारतातील काही ठिकाणांना नक्कीच भेट देऊ शकता. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.
सिंधूदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली समुद्रकिनारा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. हे ठिकाण वॉटर स्पोर्ट्स आणि स्कूबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे. ब्रदर्स डे च्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. स्कूबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट्ससोबतच येथील प्रेक्षणीय स्थळांना देखील तुम्ही भेट देऊ शकता.
या सिझनमध्ये रिव्हर राफ्टिंग करण्याची मजा काही औरच असते. जर तुम्हाला आणि तुमच्या भावंडांना रिव्हर राफ्टिंग करायची आवड असेल, तर तुम्ही नक्कीच ऋषिकेशला जाण्याचा प्लॅन करू शकता. हा एक भन्नाट आणि थ्रिलिंग अनुभव असेल यात काही शंका नाही.
शिवाय, या ठिकाणी तुम्ही बजेटमध्ये रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता. तुमच्या भावडांसोबत किंवा चुलत भावांसोबत ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंगला जाणे खूप मजेशीर अनुभव असेल. यामुळे, तुमचे ब्रदर्स डे चे सेलिब्रेशन खास होईल.
सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यातील उकाड्यापासून दूर जाण्यासाठी या ठिकाणी फिरायला जाणे, हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही तुमच्या भावंडांसोबत या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. येथील पंचगंगा मंदिर, कृष्णाबाई मंदिर, मंकी पॉईंट, इको पॉईंट, वेण्णा लेक, आर्थर सीट पॉईंट, इत्यादी अनेक ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.