indian flag  esakal
लाइफस्टाइल

National Flag Day 2024 : भारताच्या तिरंग्याबदद्ल तुम्हाला या गोष्टी माहितीयेत का?

Facts About Indian Flag : नेहरू यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर प्रथम भारतीय राष्ट्रध्वज फडकावला. 15 ऑगस्ट 1947 रोजी ध्वजारोहण करण्यात आले.

सकाळ डिजिटल टीम

National Flag Day 2024 :

जगातील प्रत्येक स्वतंत्र देशाची ओळख ही त्याचा ध्वज असतो. स्वतःचा ध्वज असणं हे त्या देशाच्या स्वतंत्रतेच प्रतीक आहे. आज ‘नॅशनल फ्लॅग डे’ आहे तुम्हाला माहिती आहे का भारताच्या तिरंगा ध्वजाला कधी मान्यता देण्यात आली होती, आणि तो कोणी बनवला आहे?

आता आपण फडकवत असलेला आपला तिरंगा ध्वज सुरुवातीपासून असा नव्हता. त्याची डिझाईन, रंग आणि चिन्हे वेगळी होती. आज राष्ट्रीय ध्वज दिनानिमित्त आपण अशाच काही वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या ज्ञानात भर घालतील. (Indian Flag)

आज आपण जो ध्वज फडकावतो त्याची मूळ रचना आंध्र प्रदेशातील शिक्षणतज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक पिंगली व्यंकय्या यांनी केली होती. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेच्या बैठकीत भारतीय ध्वज अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आला.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर प्रथम भारतीय राष्ट्रध्वज फडकावला. 15 ऑगस्ट 1947 रोजी ध्वजारोहण करण्यात आले.

7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकाता येथील पारसी बागान चौकात प्रथमच भारतीय ध्वज फडकवण्यात आला. या ध्वजावर 3 पट्टे आहेत - शीर्षस्थानी हिरवा, त्यानंतर पिवळा आणि तळाशी लाल असे रंग त्यावर होते. त्यावर इतर धार्मिक चिन्हांसह वंदे मातरम्ही कोरले होते.

आपल्या तिरंगा ध्वजावरील सर्व घटकांना दिलेला विशिष्ट अर्थ आहे - तीन रंग धैर्य आणि त्यागाचा भगवा रंग, सत्य, शांती आणि पवित्रतेचा पांढरा रंग, आणि समृद्धी, भरभराटीचा हिरवा होय.

तिरंग्याच्या मध्यभागी 24 रेषा असलेले एक वर्तूळ आहे. त्याला अशोक चक्र म्हणतात. निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. 

राष्ट्रध्वज, लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 2:3 मानले जाते. हे प्रत्येक रंगाचे तीन पट्टे लांबी आणि रुंदीमध्ये समान असावेत.

भारतीय राष्ट्रध्वजाने राष्ट्रगीतांप्रमाणेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्य काळातही भारतीयांना प्रेरणा दिली आहे. विविध साहित्यात आणि राष्ट्रभक्ती गीतांमध्येही भारतीय राष्ट्रध्वजाचा गौरवला गेल्याचे दिसून येते.

हिंदी कवी श्यामलाल गुप्त 'पार्षद' ह्यांनी लिहिलेल्या "विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा।" ह्या गीतास १९३८ मध्ये 'झेंडा गीत' म्हणून स्वीकारले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT