National Mango Day 2024  esakal
लाइफस्टाइल

National Mango Day 2024 : सिंधरी आणि हापूस नव्हे, हा आहे जगातील सर्वात महागडा आंबा?

World Most Expensive Mango : भारतातला सर्वात महाग आंबा कुठला तुम्हाला माहितीय का?

सकाळ डिजिटल टीम

World most expensive mango:

आपल्याला आंबा म्हटलं की, हापूस डोळ्यासमोर येतो. भारताचा आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. हापूसची सुरूवात झाल्यानंतर तो काही हजारात विकला जातो. अन् सिझन संपत आल्यानंतर आंब्याची किंमत शेकडोच्या घरात येते. जगातला सर्वात महागडा आंबा कुठला आहे तुम्हाला माहितीय का?

भारतात आंब्याला फळांचा राजा मानला जातो. कारण, जिभेवर रेंघाळणारी त्याची चव आपण कधीही विसरू शकत नाही. भारतात असलेले आंबे महाग आहेत असे कधीतरी तुम्हाला वाटते. पण, जगातील सर्वात महागडा आंबा भारतात मिळत नाही, तर तो जपानमध्ये मिळतो.  (Expensive Mango)

जगातील सर्वात महागड्या आंब्याचे नाव मियाझाकी असे आहे. हा आंबा जपानमध्ये पिकवला जातो. या आंब्याची अप्रतिम चव, देखावा आणि सुगंधामुळे खूप पसंत केली जात आहे. पिकल्यावर या आंब्याचा रंग गडद लाल होतो. आंब्याच्या या जातीचे उत्पादन प्रामुख्याने जपानच्या क्युशू प्रांतात असलेल्या मियाझाकी शहरात केले जाते, त्यामुळे या जातीला मियाझाकी हे नाव पडले.

जपानी भाषेत याला 'तायो-नो-टोमागो' म्हणजेच 'सूर्याचे अंडे' असे म्हणतात. या आंब्याची किंमत तीन लाख रूपये आहे. हा आंबा इतका महाग का आहे याबद्दल जाणून घेऊयात.

जपानमधील ३ लाख किलोने विकला जाणारा मियाझाकी आंबा

उत्कृष्ट चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या मियाझाकी आंब्याची बाजारातील किंमत 3 लाख रुपये प्रति किलो आहे. आणि त्यामुळे हा जगातील सर्वात महागडा आंबा असल्याचे सिद्ध होते. मोठ्या आकाराचा मियाझाकी आंबा पाहताच लोकांना आकर्षित करतो. त्याचे वजन सुमारे 350 इतके असते.

मियाझाकी प्रांत, जिथे हा आंबा पिकवला जातो, लिची आणि कुमकाट यांसारख्या लिंबूवर्गीय फळांच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. येथील हवामान तसेच माती, मुबलक पाऊस आणि उष्ण तापमान यामुळे मियाझाकी आंब्यासाठी उत्कृष्ट वातावरण तयार होते. मियाझाकी आंबा भारतातही पिकवला जातो.

मियाझाकी आंबा मूळचा जपानचा असला तरी तो भारतात पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातही पिकवला जातो. एएनआयच्या वृत्तानुसार, बीरभूम जिल्ह्यातील दुबराजपूरमध्ये मियाजाकी आंब्याचे झाड लावण्यात आले आहे. गेल्या वर्षी हा आंबा सिलीगुडी आंबा महोत्सवात प्रदर्शनात ठेवण्यात आला होता.

सिंधरी जातीचा आंबा

हा भारतातील सर्वात महागडा आंबा आहे

भारतातील आंब्याची सर्वात महाग जात सिंधरी आहे. ज्याची प्रति नगाची किंमत 3000 रुपये प्रति किलो आहे. मूळचा पाकिस्तानातील सिंध प्रदेशातील हा आंबा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये खूप पसंत केला जातो.

भारतीय मूळ असलेला हापूसच आहे महाग

भारतात आढळणारी आंब्याची एक प्रसिद्ध जात म्हणजे हापूस. हा आंबा सामान्यतः रत्नागिरी, देवगडसह पश्चिम भारतातील कोकण विभागातील किनारी भागात पिकवला जातो. जर आपण मूळ भारतात पिकवलेल्या आंब्याबद्दल बोललो तर हापूस हाच सर्वात महाग आंबा आहे.

जगातभारी कितीही आबे असले तरी हापूसची चव निराळीच आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्रच नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

SCROLL FOR NEXT