World AIDS Day 2023 esakal
लाइफस्टाइल

World AIDS Day 2023 : बाई आणि डिंपलताईंनी HIV बाधितांच्या आयुष्यात फुलवलीय 'पालवी'

बाईंनी सांगितलेला तो भयावह प्रसंग वाचून अंगावर काटा येईल...

Pooja Karande-Kadam

World AIDS Day 2023 :

आपण समाजाचे काही देणं लागतो, हे आजची लोकं विसरून गेली आहेत. लोकांना समाजातील HIV बाधित रुग्ण, रस्त्यावर फिरणारे मनोरुग्ण महिला हे म्हणजे मनोरंज करण्याचे साधन वाटते. खरच आजच्या समाजातील लोकांना कोणाविषयी काही काळजी आहे का, हे सगळे प्रश्न आहेत एका आईचे. जी अनेक निराधार मुलांची आई झालीय. जिला समाजाप्रति काहीतरी वाटत, जी समाजातील HIV बाधित अनेक अनाथ मुलांची आई आणि दुर्गा झालीय अशा डिंपल घाटगे यांना कार्यालयात असताना अचानक एक फोन आला.

एक महिला रस्त्यावर पडली होती असे समजलं. तिला मदतीची गरज होती म्हणून गेले. असे फोन नेहमीच येतात त्यामुळं त्यात काही नवल नव्हतं. तिथं पोहोचलो तर समोरच चित्र पाहून काळजात चर्रर्रर्रर्र झालं. पस्तिशीची एक मनोरुग्ण महिला. रस्त्यावर प्रसूत झाली होती. तिची कोणीही मदत केली नव्हती. तिने स्वतःच आपलं बाळ प्रसूती मार्गातून ओढून बाहेर काढलं होत.

पोटातून बाहेर आलेल तान्ह बाळ किती वेळ तसंच होत कुणास ठाऊक. पण आम्ही पोहोचलो तेव्हा ते बाळ अर्धवट होत. तिथल्याच कचरा कुंडीतील एका डुकराचे ते खाद्य बनलं होत. आजही तो क्षण आठवला की अंगावर काटा येतो.आम्ही त्या महिलेला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे तिची वार साफ केली. तिला जागेजगी जखमा होत्या. त्यावर औषध केलं. आणि तिला संस्थेत घेऊन आलो. आज ती महिला बरी होण्याकडे वाटचाल करतेय.

ही संस्था माझी आई मंगला शहा ऊर्फ बाईंनी २००१ मध्ये सुरू केली. ६० ओलांडलेल्या बाई सर्वांचं हसून स्वागत करतात. इतर मुलांप्रमाणे मीही आईला बाईच म्हणू लागले. मी इयत्ता चौथीत असल्यापासूनच आईला तिच्या कामात सोबत करतेय. त्यामुळे ती बाईंच्या कामाची साक्षीदारच नव्हे तर साथीदारही बनले.

बाई पंढरपुरातल्या गरीब वस्तीतल्या मुलांना शिकवायला गोळा करायच्या. त्यांना खाऊ, कपडे अशी जमेल तशी मदत करायचो. मध्येच कधीतरी एखादं टाकून दिलेलं मूल कुणीतरी आणून दिलं. त्याचा सांभाळ आम्ही करू लागल्या. त्यातूनच बाईंना एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांच्या समस्यांची जाणीव झाली आणि ‘पालवी’चा जन्म झाला.

HIV बाधित मुलांना रेल्वेस्थानकावर, एसटी डेपोत, कचराकुंडीत वा अगदी स्मशानातही टाकून दिले जाते. अशा बालकांना ‘पालवी’त आणून, त्याच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून, त्यांची काळजी घेतली जाते. बाई आणि आमच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आजच्या घडीला तब्बल १५० एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलं ‘पालवी’त आहेत.

या मुलांना सांभाळणे अतिशय कठीण असते. कारण त्यांना कोणताही संसर्ग होऊन चालत नाही. फार कमी प्रतिकारशक्ती असल्याने त्यांना सतत निरोगी ठेवावे लागते.या मुलांचा आयुर्वेदिक औषधोपचार, निसर्गोपचार सकारात्मक वातावरण, यामुळे ती मुलं आयुष्याला सुंदर समजू लागली आहेत.

आम्ही केवळ संस्थेवरच थांबलो नाही तर शाळाही सुरू केली आहे. कारण या मुलांना शाळेत घ्यायला कोणी तयार नव्हते. पण, आम्ही सुरू केलेल्या शाळेत बाहेरचे विद्यार्थीही शिकतात. समाजाने जरी या मुलांना नाकारलं असंल तरी या मुलांनी इतर मुलांना आपल्यात सामावून घेतले आहे. आमच्या शाळेला सरकारची दहावीसाठी मान्यता मिळाली आहे. त्यांच्यासाठी अत्याधुनिक संगणकांचीही सोय संस्थेत आहे.

माझ्या संस्थेतील मुलं लाकडी खेळणी बनवतात. त्या संस्थेबाहेरच स्टॉल मांडून ते विकतात. असेच एकदिवस मी संस्थेबाहेरून जाताना मला स्टॉलवर असलेल्या 2 मुली घाबरलेल्या दिसल्या. मी त्यांना विचारलं असता त्यानी, एक इसम तिच्या स्तनाना हात लावून पळून गेल्याचे तिने मला सांगितले. हे माझ्यासाठी वेदनादायी होत. एकीकडे मी या मुलांचा आत्मविश्वास परत यावा म्हणून झटतेय तर दुसरीकडे काही समाज कंटक त्या मुलींना उपभोगाची वस्तू समजतात.

पालवी संस्थेतील मुलं

मी त्या मुलीला घेऊन त्या इसमाला शोधायला बाहेर पडले. तासभर शोधल्यावर त्या तरुणीने मला तो इसम दाखवला. ती व्यक्ती तीच असल्याची खात्री करून मी त्याला जाब विचारला तर त्याने माझ्याच कानशिलात लगावली. मी जे काम करतेय ते चुकीचे असून ही अशी मुलं जगण्याच्या लायक नाहीत असं त्याच म्हणणं होतं.

मी त्यावेळी इतर लोकांकडे मदत मागितली पण लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. थोड्यावेळाने त्याला तसेच पकडून ठेऊन मी माझ्या संस्थेतील कर्मचारी आणि मुलींना बोलावले. इतर मुलींना हा प्रकार समजल्यावर त्यांनी त्याला अशी अद्दल घडवली की तो पुन्हा कधी कुठल्याच स्त्रीकडे पाहणार नाही.

एका 9 वर्षीय HIV बाधित मुलीच्या हृदयाला छिद्र होते. तिचे ऑपरेशन करणे गरजेचे होते.मुंबईतील एका डॉक्टरांनी तशी तयारीही दर्शवली. पण ओपन हार्ट सर्जरी यशस्वी होण्याची शक्यता कमी असते.. तरीही त्या मुलीला तसेच मरायला सोडण्यापेक्षा तिच्या जगण्याला एक संधी देऊन बघूया म्हणून आम्ही तीच ऑपरेशन यशस्वी झाल आणि ती मुलगी आता हळूहळू ठिक होतेय.

काही दिवसांपूर्वी एक ‘एचआयव्ही’बाधित महिला संस्थेत दाखल झाली होती. तिच्या पतीचे पाच वर्षांपूर्वीच निधन झाले होते. दोन मुली असल्यामुळे पुढच्या आयुष्यासाठी तिला कोणाचा तरी आधार हवा होता. तिच्यासोबत लग्न करण्याचे आश्वासन दिलेल्या व्यक्तीने ते पाळले नाही आणि तोपर्यंत फार उशीर झाला होता. अखेर ती महिला पाचव्या महिन्यात ‘पालवी’त दाखल झाली. तिथेच तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. बाळ दोन महिन्यांचे झाल्यावर ती बाळाला सोडून निघून गेली.

पालवी हळूहळू बहरतेय,मोठी होतेय. तिला तुमच्या आधाराची गरज आहे. पालवितील मुलं , महिला तेही तुमच्या आमच्या सारखेच आहेत. त्यांनाही मोकळ्या मनाने स्वच्छंदी जगण्याचा हक्क आहे. ते तुमच्यात भेदभाव करत नाहीत तर तुम्हीही करू नका. आज माझ्या संस्थेतील अनेक मुलं शिकून नोकरीला लागलीत. त्यांनी लग्न केलीत. ती मूल मोठी होऊन संस्थेसाठी काम करत आहेत. त्यांचा पहिला पगार त्यांनी संस्थेसाठी दिलाय. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

बाई आपल्या मुलांप्रमाणेच यांची काळजी घेतात

समाज आमची मदत नक्कीच करतो. पण केवळ आर्थिक मदत गरजेची नाही तर या कामाला समजून घेण्याची या HIV बाधित महिला मुलांना स्वातंत्र्य देण्याची आणि पाठीवर एक थाप पाहिजे. जेणेकरून लोकांच्या मनातून HIV दूर जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

IND vs AUS, BGT: चेतेश्वर पुजारा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार; पण फलंदाज म्हणून नाही, तर...

Kalyan: प्रचार अर्धवट सोडून उमेदवार सुलभा गायकवाड धावल्या मदतीला..!

आता तो पूर्वीसारखा नाही राहिला! अंगावर जखमा, हातात सुरा; ‘बागी ४’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

SCROLL FOR NEXT