Navratri 2023  esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023 : चौथी माळ, कुष्मांडा देवी देईल धन संपत्तीहून अधिक महत्त्वाचं दान; अशी करा तिची पूजा

कुष्मांडा मातेला कोणता नैवेद्य प्रिय आहे?

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 : देशभरात नवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आज नवरात्रीची चौथी माळ आहे. या दिवशी कुष्मांडा देवीच्या रूपाची पूजा केली जाते. माता कुष्मांडा सतीमातेचेच रूप आहे. ती नवदुर्गे पैकी चौथी दुर्गा आहे. ही देवी धन,संपत्तीचा आशीर्वाद देतेच. पण त्याचबरोबर मनुष्याला ज्याची सर्वात जास्त गरज असते अशा एका गोष्टीचेही दान ती आपल्याला देते.

कुष्मांडा देवीची कथा

या देवीची ठोस अशी कथा उपलब्ध नाही. पण, पुराणातील उल्लेखानुसार जेव्हा ब्रह्मांड अस्तित्वात नव्हतं. तेव्हा त्याच्या निर्मितीसाठी मातेचा जन्म झाला. देवीने सुर्य, ग्रहांनी बनणारी आकाशगंगा तयार केली. जगाची निर्मिती करणारी अशी ही कुष्मांडा देवी आहे.

कुष्मांडा देवी हे देवीचे मूळ स्वरूप आहे. विश्वाची निर्मिती करणार ती मूळ शक्ती आहे. ही देवी सूर्यमालेत निवास करते. सुर्यदेवांच्या जवळ जाण्याची शक्ती तर देवांमध्येही नाही. पण माता कुष्मांडाचे निवासस्थान हे सुर्यदेवच आहेत.

देवीचे रूप कसे आहे

या देवीला आठ हात आहेत, म्हणून तिला अष्टभुजा म्हणत. त्याच्या सात हातात कमंडल, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृताने भरलेले भांडे, चकती आणि गदा आहेत. आठव्या हातात एक नामजप जपमाळ आहे ज्यामुळे सर्व सिद्धी आणि संपत्ती मिळते. या देवीचे वाहन सिंह आहे. संस्कृतीत कुम्हाराला कुष्मांडा म्हणतात, म्हणून ही देवी कुष्मांडा आहे. (Navratri 2023)

पूजा विधी

नवरात्रीचा चौथा दिवस कुष्मांडा मातेला समर्पित आहे. आणि तिला पांढरा रंग खूप आवडतो. त्यामुळे सकाळी स्नान करून लाल रंगाचे वस्त्र परिधान करून हातात पाणी घेऊन उपवासाचा संकल्प करावा. यानंतर मंदिरात स्थापित कलशाची पूजा करून माता दुर्गा मूर्तीची पूजा करावी. पूजेनंतर माता कुष्मांडाची व्रत कथा व आरती अवश्य वाचा.

कुष्मांडा मातेला कोणता नैवेद्य प्रिय आहे

या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केल्यानंतर तिला मालपुवा अर्पण केला जातो. मंदिरात हा प्रसाद वाटणे देखील या दिवशी शुभ आहे. या दिवशी मातेला मालपुवा अर्पण केल्याने माता प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास होतो आणि त्याचबरोबर निर्णय घेण्याची क्षमता वाढते.

कुष्मांडा देवीचे आवडते फूल आणि रंग

माता कुष्मांडाला लाल रंग आवडतो, म्हणून तिला पूजेमध्ये जास्वंद, लाल गुलाब इत्यादी लाल रंगाची फुले अर्पण करता येतात, यामुळे देवी प्रसन्न होते.

कुष्मांडा देवीच्या उपासनेचे महत्त्व

कुष्मांडा देवी तिच्या भक्तांचे रक्षण करणारी आहे. ती रोगांपासून, दुःख आणि विनाशापासून मुक्त करणारी आहे. ज्या घराला आजारपणाचा विळखा असतो त्यातील सदस्यांनी कुष्मांडा देवीचे व्रत आणि पूजा करावी. ही देवी धन-संपत्तीपेक्षाही मोठे असलेल्या आरोग्याचे दान देते.

ती दिर्घायुष्य, कीर्ती, सामर्थ्य देते. ज्या व्यक्तीला आरोग्य, समाधान हवे असेल त्याने कुष्मांडा मातेची पूजा करावी. देवीच्या कृपेने तुम्हाला जगात कीर्ती प्राप्त होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT