Navratri 2023 : नवरात्रीचा सहावा दिवस देवी कात्यायनीला समर्पित आहे. या दिवशी दुर्गामातेच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाते. मातेचे हे रूप संयमाचे आणि साधनेचे प्रतीक आहे. माता कात्यायनीला सुर्याचे तेज आहे.
माता कात्यायनीची उपासना केल्याने भक्तांना अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष सहज प्राप्त होतो. तसेच त्यांची पूजा केल्याने लवकर विवाह, इच्छित जीवनसाथी मिळण्याचे वरदान प्राप्त होते.
माता कात्यायनी महर्षी कात्यायन यांची कन्या म्हणून ओळखली जाते. दुर्गामातेच्या या रूपाची पूजा करून काही उपाय केल्याने जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात. जाणून घेऊया त्या उपायांबद्दल. (Navratri 2023)
नवरात्रीच्या सहाव्या माळेला मनोकामना पूर्ण करण्यासाठी गायीचे शेणाच्या गोवऱ्या जाळून त्यावर लवंग व कापूर जाळावा. यानंतर देवीला मध अर्पण करा. असे केल्याने जीवनात येणारे अडथळे दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.
विवाह लवकर ठरण्यात अडथळे येत असतील. तर माता कात्यायनीची विधिवत पूजा करा. यासाठी दुर्गामातेच्या मंदिरात श्रृंगार आणि पूजेशी संबंधित वस्तूंचे दान करावे. तसेच लवकर लग्न होण्यासाठी मातेला साकडे घालावे. यानंतर पुढे दिलेल्या मंत्राचा जप करावा. असे केल्याने लग्नाची शक्यता निर्माण होऊ लागते.
चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना ।
कात्यायनी च शुभदा देवी दानवघातिनी ॥
धन प्राप्तीसाठी हे करा
आज दिवसभरात केव्हाही एक नारळ घ्या आणि सोबत लाल, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे फूल घेऊन मातेला अर्पण करा. यानंतर नवमीच्या संध्याकाळी ही फुले नदीत वाहून नारळावर लाल कापड गुंडाळून तिजोरीत किंवा कपाटात ठेवावे. असे केल्याने घरात धनवृद्धी होते.
नोकरीतील बढतीसाठी हा उपाय करा
ज्योतिषशास्त्रानुसार नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी मातीचे दोन दिवे घेऊन त्यामध्ये कापूर लावावा. यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून देवीची आरती करा. असे केल्याने प्रगतीचा मार्ग मोकळा होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.