Navratri 2023 : नवरात्री म्हणजेच नव्याने केलेली सुरूवात होय. म्हणून तर या दिवसात घटस्थापना अन् धान्य पेरण्याची परंपरा आहे. पृथ्वीवरील चराचरातून जे काही नव्याने जन्म घेत ते माता पार्वतीमुळेच. आई अंबाबाई, रेणूका माता, अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली तुळजाभवानी ही सुद्धा देवीचीच रूपे होय.
याशिवाय माता पार्वतीचीच काही रूपे प्रचलित आहेत. त्यांना पौराणिक महत्त्व आहे. यामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. ती रूपे कोणती हे पाहुयात. (Navratri 2023)
नवरात्री पहिला दिवस - माता शैलपुत्री
देवीचे प्रथम रूप म्हणजे शैलपुत्री. शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या. हिमालयात जन्म झाल्याने तिला शैलपुत्री म्हटले जाते. देवीच्या या रूपाची आराधना केल्याने तुमचे भरटकणारे मन देवीप्रमाणेच खंबीर, निडर आणि शांत होण्यास मदत होते.
दुसरा दिवस- ब्रम्हचारिणी देवी
देवीच्या या दुसऱ्या रूपाची आराधना करताना तुमच्यामध्ये ब्रम्हचर्याचे म्हणजे अलिप्तपणाचे भाव निर्माण होतात. तुमचा मुळ स्वभाव जाणून तुम्ही सामर्थ्यशाली, पराक्रमी होण्याकडे वाटचाल करू शकता.
तिसरा दिवस- चंद्रघंटा देवी
नवरात्राच्या तिसर्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते. यामुळे तुमचे मन सजग होऊन भावनांवर नियंत्रण मिळवता येते. खंबीरपणा ही वाढीस लागतो. आपले व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत होते.
चौथा दिवस- कृष्मांडा देवी
देवीचे हे चौथे रूप. कृष्मांड म्हणजे कोहळा. कोहळ्यात असलेल्या असंख्य बियांमध्ये पुन्हा कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. म्हणजेच बीजनिर्मिती, पुनरूप्तादनासाठी तीची आराधना केल्या नवनिर्मिती होण्यास मदत होते.
पाचवा दिवस- स्कंदमाता देवी
स्कंदमाता हे देवीचे पाचवे रूप आहे. ही कार्तिकेयची आई असून शौर्य आणि करूणा तिच्यात सामावलेली आहे. देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्य, निरागसपणा, शौर्य, करूणा हे गुण वाढीस लागतात.
सहावा दिवस- कात्यायनी देवी
देवीचे हे सहावे रूप तिच्यातील मातृत्वाचे वैशिष्ट्य दाखवते. संगोपन कसे करावे हेही शिकता येते. अनुरूप जोडीदार मिळण्यासाठी या देवीची आराधना करतात. तसेच नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्यासाठी मदत होऊ शकते.
सातवा दिवस- कालरात्री देवी
देवीचे हे सातवे रूप. या काल म्हणजे वेळ. हा वेळ सार्थकी लावण्यासाठी आायुष्यात योग्य ध्येय मिळवविण्यासाठी आपण शारिरिक, मानसिक धडपड करत असतो. मात्र ही धडपड करताना योग्य विश्रांती मिळणेही गरजेचे आहे. त्यामुळे कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळालेली विश्रांती.
आठवा दिवस- महागौरी देवी
हे देवीचे आठवे रूप. नवरात्रात आठव्या दिवशी महागौरीची आराधना केली जाते. तिच्यामुळे विद्वताप्राप्ती होते. त्यामुळे तुम्हाला सर्व विषयांचे योग्य आणि उत्तम शिक्षण मिळण्यासाठी महागौरीच्या आराधनेचा उपयोग होतो.
नववा दिवस- सिद्धिदात्री देवी
देवीचे हे नववे रूप. आयुष्य चांगले जगण्यासाठी जे जे उत्तम आहे ते प्राप्त करण्यासाठी या देवीची आराधना केली जाते. प्राविण्य आणि मुक्ती या देणग्या सिद्धीदात्रीने दिलेल्या आहेत.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.