Padmini prakash first transgender women news anchor  esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023 : १३ व्या वर्षी घरच्यांनी बाहेर काढलं, आत्महत्येचा प्रयत्न केला आज आहे भारतातली पहिली ट्रान्सजेंडर न्युज अँकर

पद्मिनी म्हणते देशाच्या ६६ व्या स्वातंत्र्यदिनी मीही स्वाभिमानाने स्वातंत्र्य झाले

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 : माझा जन्म एक मुलगा म्हणून झाला. पण वयाच्या १२ व्या वर्षीच मला मी कोणीतरी वेगळी आहे याची जाणिव झाली. त्या वयापासूनच मी मुलींसोबत खेळायला लागले. जेव्हा घरच्यांना हे समजलं तेव्हा त्यांनी मला घरातून हाकलून दिलं.

मी बाहेर पडले अन् आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पण मला मिळालेल्या एका मदतीमुळे मी जगण्याचा निर्णय घेतला अन् आज मी देशातली पहिली ट्रान्स न्युज अँकर होण्याचा मान मिळवला.

नमस्कार मी पद्मिनी प्रकाश. २०१४ मध्ये देशाच्या स्वातंत्रदिनी मीही स्वंतत्र झाले. त्या दिवशी मला स्वाभिमानाने जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं. मी तामिळनाडूत राहते अन् मी सध्या एका न्युज चॅनलवर अँकर म्हणून काम करते.

माझा जन्म एका पुराणमतवादी विचारसरणीच्या तमिळ कुटुंबात झाला. मी तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे राहत होते. मी ट्रान्सजेंडर होते तिच्या घरच्यांना हे मान्य नव्हते. कुटुंबियांच्या पुराणमतवादी विचारसरणीला बळी पडून अवघ्या १३ व्या वर्षी मी घर सोडलं. आत्महत्येचा विचार करत मी बाहेर पडले पण नशिबात कदाचित काहीतरी वेगळंच होतं. (Transgenders)

माझ्याच काही ओळखीच्या लोकांनी मला वाचवलं आणि आसरा दिला. मग मी तिथे राहून शिक्षण पूर्ण केलं. मी दहावीपर्यंत शिकले आणि कॉलेजसाठी पुढे प्रवेश घेतला. वाणिज्य शाखेच्या पहिल्याच वर्षी मला समाजाचा द्वेष सहन करावा लागला.

माझ्याचसोबत शिक्षण घेणाऱ्या मुलांनी माझी छेड काढली, एक दिवस दोन दिवस असं कित्येक दिवस मी ते सहन केलं आणि शेवटी मी शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला.

२००४ मध्ये मी माझे ऑपरेशन केले आणि पूर्णत: मी स्त्री झाले. माझं खरं रूप जे होतं आता जगासमोर आलं होतं. इतके दिवस मी आतून स्त्री आणि बाहेरून पुरूष होते. पण ऑपरेशननंतर मी पुर्णत: महिला झाले.

माझं हे पालटलेलं रूप पाहून माझ्या मित्राने मला लग्नासाठी मागणी घातली. तेव्हा माझे मित्र नागराज प्रकाश याच्याशी लग्न झाले, नंतर दोघांनीही मुलगा दत्तक घेऊन आपला संसार पूर्ण केला. (Success Story)

समाजाने मला अनेक गोष्टी करण्यापासून रोखलं पण मी त्यांना जुमानलं नाही. मी केवळ शिक्षण नाहीतर शास्त्रीय नृत्यांचेही शिक्षण घेतलं आहे. मी अनेक लोकांना लोकांना भरतनाट्यमचे प्रशिक्षण दिले आहे.

काही तामिळ टीव्ही मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून काम करण्यासोबतच पद्मिनी २००७ मध्ये मिस ट्रान्सजेंडर तमिळनाडू आणि मिस ट्रान्सजेंडर इंडिया २००९ मध्ये देखील बनली आहे.

पद्मिनी, तिचे पती नागराज आणि दत्तक मुलगा

जेव्हा २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ट्रान्सजेंडरला तृतीय लिंग म्हणून मान्यता दिली तेव्हा ट्रान्सजेंडरना नोकऱ्या मिळू लागल्या. कोईम्बतूरमधील एका न्यूज चॅनलला संध्याकाळी ७ वाजताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी एका अँकरची गरज होती.

त्या काळात मलाही नोकरीची गरज होती. तेव्हा या अँकरच्या जॉबसाठी मी नोकरीसाठी अर्ज केला. सुरुवातीला मला भीती वाटत होती की समाज माझा आवाज आणि अस्तित्व स्वीकारेल की नाही, परंतु दोन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर मी सर्व भीती मागे टाकली आणि एक प्रशिक्षित अँकर बनले.

मी स्वातंत्र्यदिनी टेलिप्रॉम्प्टरवर पहिल्यांदा बातमी वाचली, त्यानंतर ती देशातील पहिली ट्रान्सजेंडर अँकर बनली. त्याच्या शोला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले ज्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला.

आता मी जिथे जाते तिथे लोक मला ओळखतात आणि ऑटोग्राफ मागतात. त्यामुळे मी खूप आनंदी आणि समाधानी वाटते. लहानपणी मला समाजाने, कुटुंबाने नाकारले पण आता माझ्यासारख्या अनेकांना मदत करण्याचे काम मी करत आहे. जे मी भोगलं ते माझ्यासारख्यांच्या वाट्याला येऊ नये यासाठी मी शेवट पर्यंत काम करत राहीन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT