Transgender Ganga Kumari success story  esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023 : केवळ ट्रान्सजेंड आहे म्हणून पोलिसांनीच नापास केलं; न्यायालयीन लढाई जिंकली अन् गंगा कुमारी कॉन्स्टेबल झाली!

लेखी परीक्षा पास झाली पण मेडिकलमध्ये पोलिसांनीच थांबवलं, वाचा तिची कहानी

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 :  संघर्ष तर प्रत्येकाच्या जीवनात असतो. पण फार कमी लोक त्याचा सामना करू शकतात. काही लोक ध्येय मध्येच सोडून जातात. तर काही लोक शेवटपर्यंत टिकून राहतात. अशाच संघर्षांवर मात करून राजस्थानमधील एक तृतियपंथी पोलिस कॉन्स्टेबल बनल्या आहेत.

राजस्थानमधील जालोरमध्ये राहणाऱ्या गंगा कुमारी यांची ही कथा. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील रानीवाडा शहरातील तृतियपंथी गंगा कुमारी यांचे आयुष्य जन्मापासूनच अडचणींनी भरलेले होते.  

ट्रान्सजेंडर गंगा कुमारीने स्वाभिमानाने जगण्याचा निर्णय घेतला आणि 2012 मध्ये राजस्थान पोलीस भरती परीक्षा दिली. परीक्षेला बसलेल्या दिड लाख उमेदवारांपैकी ती एक होती. 2013 मध्ये लेखी परीक्षा दिली होती, तिचा निकाल 2014 मध्ये आला होता. ज्यामध्ये गंगा कुमारीसह 11 हजार 400 जण यशस्वी झाले.

पण, मेडिकलच्या चाचणीवेळी गंगा कुमारीला नियुक्ती नाकारण्यात आली. जो तिच्यासाठी मोठा धक्का होता. तृतियपंथी असल्यामुळे पोलीस विभागाने तिला नोकरी देण्यास नकार दिला होता. पोलिसांच्या निर्णयाविरोधात गंगा कुमारीने हायकोर्टात याचिका दाखल केली.

दोन वर्षे चाललेल्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर नोव्हेंबर 2017 मध्ये गंगा राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठातून जिंकल्या. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गंगा यांना 14 नोव्हेंबर 2017 रोजी पोलिसात नोकरी मिळाली.

देशात पहिली येण्याचा चान्स हुकला

पोलीस भरती परीक्षेचा निकाल आला खरा पण मध्येच माशी शिंकली. जर पोलिसांनी गंगा यांना थांबवलं नसतं तर देशातील पहिल्या तृतियपंथी पोलिस होण्याचा मान गंगा यांना मिळाला असता. पण, ज्या वेळी गंगा कायदेशीर लढाई लढत होती, त्या वेळी चेन्नईची ट्रान्सजेंडर प्रितिका याशिनी ही पहिली पोलिस उपनिरीक्षक बनली होती.

यशिनी यांनाही न्यायालयाच्या आदेशानंतरच नियुक्ती मिळाली. यानंतर तामिळनाडूच्या मदुराई येथील रहिवासी असलेल्या आर नसरिया यांची पोलीस हवालदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. पोलीस खात्यात नियुक्ती मिळवणारी गंगा या राजस्थानमधील पहिल्या आणि देशातील तिसऱ्या ट्रान्सजेंडर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT