Navratri 2023 esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023 : हिमालयाच्या कुशीत निसर्गदत्त सौंदर्याने नटलेल्या या शहरात वसलंय बिंध्यबासिनी मंदिर

दुसरी मंदिराची कहाणी अशी सांगितली जाते की, कास्कीच्या राजाने स्वप्नामध्ये देवी विंध्यवासिनी मंदिराची स्थापना पाहिली

सकाळ ऑनलाईन टीम

बिंध्यबासिनी मंदिर

Navratri 2023 : मंडळी, मागे एकदा आपण नेपाळचा ‘पोखरा’ फिरलो होतो. नवरात्रोत्सव जवळ आला असताना आज आपण पुन्हा एकदा या पोखराला जाऊयात का? तर, तिथल्या नयनरम्य वातावरणात वसलेलं, बिंध्यबासिनी किंवा विंध्यवासिनी हे देवी मंदिर पाहण्यासाठी! हा परिसर छान मोठा आहे. या मंदिराच्या अनेक आख्यायिका आहेत. त्यापैकी एक म्हणजे, भारतातील वाराणसी येथील एका ब्राह्मण पुजाऱ्याने पोखरामध्ये दुर्गा देवीची मूर्ती आणून मंदिराची स्थापना केली.

दुसरी मंदिराची कहाणी अशी सांगितली जाते की, कास्कीच्या राजाने स्वप्नामध्ये देवी विंध्यवासिनी मंदिराची स्थापना पाहिली. मग त्याने आपल्या काही माणसांना भारतातील उत्तर प्रदेशातून देवीची मूर्ती आणण्यासाठी पाठवले. त्या माणसांनी ही मूर्ती आणली, पण ते दमले होते, म्हणून त्यांनी ही मूर्ती खाली ठेवली; पण नंतर ती मूर्ती त्यांना तिथून उचलताच येईना, मग तिथेच मंदिर बांधले गेले.

या मंदिराचे अनेकवेळा नूतनीकरण आणि जीर्णोद्धार केले गेले आहेत. नेपाळमधल्या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे सुंदर लाकडी कोरीव काम, ते तुम्हाला इथे पण दिसेल. मंदिराच्या गेटजवळ दोन सोनेरी, धातूचे सिंह ताठ उभे आहेत. बिंध्यबासिनी म्हणजे सामर्थ्य आणि बुद्धी यांचं प्रतीक असलेलं हे भगवती, दुर्गा मंदिर आहे. उत्कृष्ट कारागिरी असलेल्या या मंदिराला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे.

स्थापत्यशास्त्रीय भव्यता, वास्तुकला, प्रसन्न वातावरण आणि आध्यात्मिक महत्त्व, यामुळे इथे दूरवरून भक्त आणि पर्यटक येत असतात. इथे लक्ष्मी-नारायण, राम-सीता, राधा-कृष्ण, सरस्वती, शिव, हनुमान आणि गणपती या देवतांचीही मंदिरं आहेत. ‘दशैन’ या मोठ्या सणाला खूप लोक या मंदिराला भेट देतात. दशैनच्या काळात हे मंदिर दिवे आणि सजावटीने सजलेले असते.

इथे धार्मिक प्रवचने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सवांसह विविध कार्यक्रम साजरे होतात. इथलं वातावरण एकदम शांत आहे. हे मंदिर केवळ प्रार्थनास्थळच नाही तर स्थानिकांसाठी शुभेच्छांची देवाण-घेवाण करण्यासाठी आणि सामाजिक बंधने मजबूत करण्यासाठी, सण साजरे करण्यासाठी एकत्र येण्याचं ठिकाण होऊन गेलं आहे.

मंदिर परिसरात एका कोपऱ्यात असलेल्या खुल्या प्रांगणात हार्मोनियम, तबला, डफली अशी बरीचशी वाद्यं वाजवत भक्तवर्ग बसलेला असतो. हार्मोनियम वरचा माणूस भजन म्हणत असतो. समोरच्या मोकळ्या भागात लहान थोर मंडळी या भजनावर एक ताल धरून साधंसं नृत्य करत असतात.

शहरातील गजबजलेल्या जीवनापासून दूर, मंदिराच्या परिसरातील शांततेचा आनंद आपल्याला इथे मिळतो. हे मंदिर म्हणजे या प्रदेशात राहणाऱ्या विविध समुदायांमध्ये एकता आणि सौहार्दाचे प्रतीक म्हणून काम करते आहे. तसेच, हे एक लोकप्रिय पर्यटक आकर्षण बनत चालले आहे. या मंदिरात फोटो काढण्यास मनाई आहे बरं का. मंदिराच्या बाहेरून तुम्ही फोटो काढू शकता. मंदिराच्या मोठ्या परिसरातून आपल्याला पोखराचे विहंगम दृश्य दिसते. अन्नपूर्णा आणि माच्छापुचरे यांच्या आकर्षक पर्वतरांगा इथून दिसतात.

पोखरामध्ये पाहण्यासारखं खूप आहे. इथला रूपा ताल तलाव त्याच्या गोड्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. बेगनास तलाव हा ही एक शांत, सुंदर, स्वच्छ तलाव आहे. पोखरा येथील शांती स्तूप हे जागतिक शांततेचे प्रतीक म्हणून बांधले गेले आहेत. अनाडू टेकडीवर ११०० मीटर उंचीवर वसलेले हे स्तूप ११५ फूट उंच आणि ३४४ फूट व्यासाचे आहे. जपान, श्रीलंका, थायलंड आणि शिवाय लुम्बिनी या गौतम बुद्धाच्या जन्मस्थानातील मूर्ती इथे आहेत.

जाता जाता, महिला वर्ग खूश होऊन जाईल अशी एक गोष्ट सांगून टाकते. पोखरा आणि काठमांडूमध्ये छोट्या, मोठ्या सुती पर्स, सुती कपडे आणि मण्यांच्या माळा खूप छान आणि स्वस्त मिळतात बरं का. तुलनेने पोखरामध्ये स्वस्त मिळतात. पोखरा ही नेपाळची पर्यटन राजधानी मानली जाते. नेपाळी शब्द “पोखरी” म्हणजे “तलाव”. यावरूनच या शहराचे ‘पोखरा’ नामकरण झालं आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेलं, निसर्गदत्त सौन्दर्याने नटलेलं हे पोखरा शहर जगभरातील प्रवाशांचे मन मोहून टाकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT