Navratri 9th Colour:  Sakal
लाइफस्टाइल

Navratri 9th Colour: आज नवरात्रीचा शुभ रंग जांभळा, मराठमोळा लूक हवा असेल तर मराठी अभिनेत्रींकडून घ्या आउटफिटची आयडिया

पुजा बोनकिले

Navratri 9th Colour: आज शारदीय नवरात्रीचा शेवटा दिवस आहे. देशभरात नवरात्रीचा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला आहे. सर्वत्र भक्तीमय आणि मंगलमय वातावरण आहे. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी खास रंग निवडण्यात आला आहे. नवरात्रीच्या नवव्या दिवशी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. गुलाबी रंग हा शांतात, आत्मविश्वासाचे प्रतिक आहे.

तुम्हाला आज जांभळ्या साडीत सुंदर, स्टायलिश आणि मराठमोळा लूक हवा असेल तर मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून कल्पना घेऊ शकता. तुम्हा हा लूक कॅरी करून ऑफिस किंवा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये जाऊ शकता. तुमचा लूक पाहून सर्वजण तुमचे खुप कौतुक करतील.

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून आउटफिटची आयडिया घेऊ शकता. ती या साडीत खुप सुंदर दिसत आहे. तिच्याप्रमाणे गळ्यात जाभळ्या रंगाचे गळ्यात आणि कानात सेट घालू शकता. तसेच पांढऱ्या ब्लाऊजसोबत ही साडी परिधान करू शकता. केस मोकळे किंवा हेअरस्टाइल करू शकता.

अमृता खानविलकरकडून आउटफिटची आयडिया घेऊ शकता. जांभळ्या रंगाच्या साडीवर मॅचिंग बांगड्या घालू शकता.तसेच पांढरे ब्लाऊज घालू शकता. कानात झुमके घालावे. यामुळे तुमचा लूक स्टायलिश आणि हटके दिसेल.

सई ताम्हणकर या साडीत खुप सुंदर दिसत आहे. तुम्ही नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी सईप्रमाणे तयारी करू शकता. गळ्यात सोनेरी दागिने गालू शकता. तसेच केसांमध्ये गजरा लावू शकता. नाकात नथ घालतल्यासअधिक सुंदर दिसाल. हातात हिरव्या बोंगड्या घालू शकता. कपाळावर लाल टिकली लावल्यास अधिक स्टायलिश दिसाल.

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी शुभ रंग जांभळा आहे. तुम्हाला देवीच्या दर्शाला जांभळ्या रंगाची साडी नेसायची असेल तर मुक्ता बर्वेसारखी तयारी करू शकता. हा लूक सिंपल असून सुंदर आहे. तुम्ही कानात आणि गळ्यात मोत्याचे दागिने घालू शकता. तसेच साधा आणि हलका मेकअप करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Mahadev Betting App'च्या मालकाला दुबईत अटक; वर्षभरापासून होता नजरकैदेत

Vaijapur Government hostel : विद्यार्थिनींच्या जेवणात निघाले किडे,वैजापुरातील शासकीय वसतिगृहातील मुलींच्या जिवाशी खेळ

Amitabh Bachchan Fitness: 'बिग बी' वयाच्या 81 व्या वर्षीही आहेत फिट, फिटनेससाठी 'या' गोष्टींना ठेवलं दूर, जाणन घ्या डाएट सीक्रेट

Ratan Tata : कुपवाडला Nano Car चं सूतोवाच; रतन टाटांचा तीन वेळा सांगली दौरा अन् 2008 मध्ये 'नॅनो' आली बाजारात

Latest Marathi News Updates : नवीन शैक्षणिक धोरणात महाराष्ट्र आघाडीवर - चंद्रकांत पाटील

SCROLL FOR NEXT