Navratri Diet Tips : नवरात्री उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. रविवारी घरोघरी घटस्थापना करून देवीचे आगमन झाले आहे. नवरात्रीला देवीवर असलेली श्रद्धा म्हणून लोक उपवास करतात. पण या उपवासात केलेल्या काही चुकांमुळे लोकांमुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहचू शकते.
नवरात्रीचा उपवास हा असा आहे की, ज्यात काही ठिकाणी लोक कडक म्हणजे केवळ पाणी पिऊन, फळ खाऊन काही लोक तर केवळ एक खारीक खाऊन उपवास करतात. तर काही ठिकाणी उपवासाचे सगळे पदार्थ चालतात. पण वर्षभर आपल्या शरीराला खाण्याची सवय लागलेली असते. आणि अचानक जेव्हा नऊ दिवस उपाशी राहण्याची वेळ येते तेव्हा शरीराचे हाल होतात.
तज्ज्ञ असे सांगतात की, तुम्ही नवरात्रीचा उपवास करत असाल तर याचा अर्थ असा नाही, की तुम्ही खाणे बंद केलं पाहिजे. जर तुम्ही खाणे बंद केले तर शरीरातील एनर्जी कमी होईल. उपवासा दरम्यान शरीराला किमान 1200 कॅलरीजची आवश्यकता असते. त्यामुळे कमी अंतराने काहीतरी खात राहिले पाहिजे.
तुम्हीही नवरात्रीचा उपवास केला असेल तर या चूका करू नका
व्यायाम करू नका
काही लोक जास्त फिटनेस प्रिय असतात. उपवासाच्या वेळी ते व्यायामही करतात. पण असे करणे आरोग्यासाठी चांगले नाही. उपवास केल्याने शरीरातील एनर्जी पूर्वीपेक्षा कमी राहते, ज्यामुळे चक्कर, विकनेस येऊ शकतो. त्यामुळे जमेल तसा व्यायाम करा. हट्टाला पेटून व्यायाम करू नका. (Fasting Recipe)
तेलकट पदार्थ खाऊ नका
दिवसभर उपाशी राहिल्यानंतर लगेच तेलकट पदार्थ खाल्ले तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. उपवासाचे तळण, फ्राय बटाटे, पुरी किंवा वडे सायंकाळच्यावेळी खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखर वाढते.
त्यामुळे पित्ताचाही त्रास होऊ शकतो. डोकेदुखीचाही सामना करावा लागतो. तसेच चिप्स, तळलेले पापड यामुळे वजन जास्त वाढू शकतं.
डिहायड्रेशन
उपवासादरम्यान बहुतेक लोक जास्त पाणी पीत नाहीत. ज्यामुळे त्यांना डिहायड्रेशनचा धोका असतो. त्यामुळे उपवासाच्या वेळी ही समस्या टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्या. याशिवाय चहा किंवा कॉफी पिणे टाळा. यामुळे अॅसिडीटी, छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. (Navratri 2023)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.