Navratri Health Care Sakal
लाइफस्टाइल

Navratri Health Care: नवरात्रीचा उपवास करणाऱ्या 'या' 5 लोकांनी राहावे साधव, अन्यथा समस्या वाढू शकतात

Navratri Health Care: नवरात्रीत नऊ दिवस अनेक लोक उपवास करतात. त्यामुळे शरीरात अनेक पोषक घटकांची कमतरता जाणवते. अशावेळी कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते हे जाणून घेऊया.

पुजा बोनकिले

Navratri Health Care: शारदीय नवरात्रीला हिंदू धर्मात खास महत्त्व आहे. यंदा शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. यानिमित्ताने देवीचे भक्त नऊ दिवस उपवास करतात. प्रत्येक व्यक्तीची उपवास करण्याची पद्धत वेगळी असते. कोणी नऊ दिवस पाणी न पिता उपवास करतो. त्याचबरोबर काही लोक फक्त पाणी पिऊन उपवास करतात.

अशावेळी शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे उपवास करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ज्यामुळे उपवास करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

थकवा किंवा अशक्तपणा

नवरात्री दरम्यान उपवास केल्याने शरीरात अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची कमतरता जाणवते. त्यामुळे उपवास करणाऱ्यांना थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. त्यामुळे उपवासाच्या वेळी बदाम, काजू, पिस्ता यासारख्या सुका मेवा आणि फळांचा आहारात समावेश करावा. यामुळे तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही. तसेच दिवसभर ऊत्साही राहाल.

कमी रक्तदाब

उपवासा दरम्यान अनेक लोक मीठ खाणे बंद करतात. यामुळे त्या लोकांना कमी रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मीठ न खाल्ल्याने शरीरात सोडियमची कमतरता जाणवते. त्यामुळे रक्तदाब कमी होण्याचा धोका असतो.

निर्जलीकरण

नवरात्रीत उपवासा दरम्यान भरपुर पणी न प्यायल्यास निर्जलीकरणाची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे नऊ दिवस भरपुर पाणी प्यावे. तसेच फळांचा रस देखील प्यावा.

शुगर

जर तुम्हाला मधुमेह असेल तर अशावेळी उपवास करणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. कारण उपवासाच्या वेळी एखादी व्यक्ती जास्त काळ उपाशी राहते, ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढू शकते. तसेच बहुतेक लोक उपवासात गोड पदार्थ खातात, ज्यामुळे शुगर वाढू शकते.

बद्धकोष्ठता

नवरात्रीच्या उपवासात अनेक लोक बटाटे किंवा तेलापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करतात. तसेच आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश कमी असतो. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाचा धोका असतो. म्हणूनच, जर तुम्ही उपवास करत असाल तर वेळोवेळी तुमच्या आहारात फायबरचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT