New Year Party Makeup esakal
लाइफस्टाइल

New Year Party Makeup : 31 च्या पार्टीला कियारासारखा ग्लॅमरस लूक हवाय? ट्राय करा या टिप्स

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना पार्टीत सर्वांमध्ये उठून दिसण्यासाठी प्रयत्नही खास करावे लागतात. त्याच्या या टिप्स

सकाळ डिजिटल टीम

New Year Party Makeup : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना पार्टी होणारच. या पार्टीत सर्वांमध्ये उठून दिसावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. पण दिवसाची पार्टी आणि रात्रीच्या पार्टीचा मेकअप यात फरक असतो. त्यामुळे तशी काळजी घेत हा मेकअप व्हायला हवा. पण रात्रीचा मेकअप करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हेच माहीत नसतं.

New Year Party Makeup

रात्री डार्क असावा मेकअप

जर तुम्ही रात्री एखाद्या इव्हेंट किंवा पार्टीसाठी करत असाल तर मेकअफ डार्क करा. दिवसा प्रकाश अधिक असतो, ज्यामुळे लाईट मेकअफ फेडअप होत नाही. पण रात्री आर्टिफिशिअल प्रकाशामुळे मेकअप हलकं वाटायला लागतं. मेकअप असं करा ज्यात तुमच्या चेहऱ्याचे फीचर्स शार्प दिसतील.

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी

सर्वात पहिल्या चेहऱ्यावर मॉश्चराईज लावा. त्यानंतर प्रायमर लावा. असे केल्याने चेहऱ्यावर ताजेपणा आणि चमक येणार. डाग लपवण्यासाठी स्किन टोनसोबत मिळता जुळता कंसीलर लावा. रात्री मेकअपमध्ये स्किनपेक्षा गर्द टोन वापरला जातो.

New Year Party Makeup

रात्री डोळ्यांसाठी खास मेकअप

जर तुमचा फोकस तुमच्या डोळ्यांवर आहे तर शिमरिंग आयशॅडोचा वापर करा. मेकअपमध्ये डोळ्यांवर फोकस करताना हे बघा की, तुम्ही न्यूट्रल शेडचा लिप कलर वापरला आहे. सोबतच जर तुम्हाला मेकअप एखाद्या पार्टीसाठी करायचा असेल तर स्मोकी आय लूक फार चांगला पर्याय ठरेल. यासाठी डोळ्यांना हायलाईट करण्यासाठी हायलायटरचा वापर करा. पापण्यांवर ब्राउन पॅलेटचा कोल शॅडो लावा. वॉटर प्रूफ मस्काराचे दोन कोट लावा.

New Year Party Makeup

ओठांसाठी लिप लायनर

ओठांना अधिक आकर्षक करण्यासाठी लिपलायनरचा वापर केला जाऊ शकतो. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कोणत्याही लिपशेडचा वापरही करु शकता. सॅसी रेड किंवा डीप प्लम लिपशेड तुमच्या ओठांना अधिक सुंदर करेल. यावर हलका ग्लॉस टच द्यावा. जेव्हा फोकस तुमच्या ओठांवर असतो तेव्हा डोळ्यांचं मेकअप कमीत कमी करा. केवळ थोडं काजळ आणि साधा मस्कारा वापरा.

New Year Party Makeup

गालांचं मेकअप

तुमच्या गालांच्या अॅपल्सवर ब्लशचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्याची चमक वाढते. रंगांना एकरुप करण्यासाठी फाऊंडेशनचा वापर करा. मानेवर फाऊंडेशन लावणे विसरु नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT