No Raw Diet esakal
लाइफस्टाइल

No Raw Diet : फिट राहण्यासाठी विद्या बालन फॉलो करतेय ते 'नो रॉ डाएट' नेमके काय आहे? जाणून घ्या फायदे

No Raw Diet : नुकतेच अभिनेत्री विद्या बालनने तिचे वजन कमी केल्याचे दिसून आले आहे. यासाठी तिने ‘नो रॉ डाएट प्लॅन’ फॉलो केले आहे.

Monika Lonkar –Kumbhar

No Raw Diet : आजकाल अनेक जण आरोग्याबद्दल चांगले जागरूक झाल्याचे दिसून येते. शारिरीक तंदूरूस्तीसाठी रोज व्यायाम, योगा करण्याला लोक प्राधान्य देत आहेत. यासोबतच वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी काही जण डाएट आणि वर्कआऊटची मदत घेतात.

आजकाल डाएट प्लॅनमध्ये विविध प्रकारचे ट्रेंड्स पाहायला मिळतात. त्यामुळे, दररोज एक किंवा आणखी एखादा वेगळा डाएट प्लॅन ट्रेंडमध्ये दिसतो. आपले बॉलिवूड सेलिब्रिटी देखील वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी विविध प्रकारचे डाएट प्लॅन्स फॉलो करताना दिसतात.

नुकतेच अभिनेत्री विद्या बालनने तिचे वजन कमी केल्याचे दिसून आले आहे. यासाठी तिने ‘नो रॉ डाएट प्लॅन’ फॉलो केल्याची माहिती तिने एका मुलाखतीमध्ये बोलताना दिली. तिने या डाएट प्लॅनबद्दल सांगितल्यानंतर सोशल मीडियावर या डाएट प्लॅनची भलतीच चर्चा होताना दिसत आहे. आज आपण हे ‘नो रॉ डाएट प्लॅन’ नेमके काय आहे? आणि त्याचे आरोग्याला कोणते फायदे होतात? ते जाणून घेणार आहोत.

नो रॉ डाएट प्लॅन काय आहे?

खर तर नावाप्रमाणेच हा ‘नो रॉ डाएट प्लॅन’ हा एक आहाराचाच प्रकार आहे. या डाएट प्लॅनमध्ये कच्च्या अन्नाचा समावेश केला जात नाही. साधारणपणे या डाएट प्लॅनमध्ये सर्व खाद्यपदार्थ चांगले शिजवलेले किंवा व्यवस्थित प्रक्रिया केलेले असतात. कधीकधी अशक्तपणा असलेल्या व्यक्तींना, गरोदर महिलांना आणि विशिष्ट अ‍ॅलर्जी असलेल्या लोकांना कच्चे अन्न प्रतिबंधित केले जाते.

नो रॉ डाएट प्लॅनचे आरोग्यदायी फायदे कोणते?

पचनक्षमता उत्तम राहते

जेव्हा विविध प्रकारचे खाद्यपदार्थ शिजवले जातात, तेव्हा ते खाद्यपदार्थांमध्ये स्थित असलेल्या कठीण पेशी आणि फायबर्सला तोडण्याचे काम करते. ज्यामुळे, आपल्या शरीराला अन्न पचवणे आणि पोषकतत्वे काढणे सोपे जाते. नो रॉ डाएट आपल्या शरीराची पचनक्षमता सुधारण्याचे काम करते. त्यामुळ, ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी हे डाएट फायदेशीर असू शकते.

पोषकतत्वांचे शोषण सुधारते

अनेकदा खाद्यपदार्थ शिजवल्यानंतर त्यात असलेल्या काही पोषकतत्वांची जैवउपलब्धता वाढू शकते. ज्यामुळे, ते शरीरात सहजपणे शोषले जाऊ शकतात. हे खास करून जीवनसत्वे आणि खनिजांसाठी उत्तम आहे, जे शिजवलेल्या स्वरूपात चांगल्या प्रकारे शोषले जाते.

वजन कमी होते

नो रॉ डाएट प्लॅन फॉलो केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. शिवाय, पोटाच्या समस्या जसे की, गॅसेस, पोट जड होणे, इत्यादी समस्यांपासून ही आराम मिळतो. या डाएटमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने पोट बराच काळ भरल्यासारखे राहते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे, वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT