Non Veg Restaurants In Pune : पुणे म्हटलं की, शनिवार वाडा, पेशवेकालिन वाडे, पुणेरी पाटी आणि तोऱ्यात बोलणारी प्रेमळ माणंस डोळ्यासमोर येतात. पुण्यात जेव्हा काही खाण्याचा विषय येतो. तेव्हा वरण भात वरून तुपाची धार हेच लक्षात येतं. पण, तसं नाहीय, पुण्यात जितका गोडवा आहे. तसाच पुणेरी तडका असलेले झणझणीत मटणावर ताव मारणारी माणसंही आहेत.
मटण, तर्रीचा विषय आला की मग पुण्यातील अनेक हॉटेल्सची नावं डोळ्यासमोर येतात. यामध्ये स्वागत, हवेली अशा हॉटेल्सची नावे डोळ्यासमोर येतात. आज आपण अशाच काही हॉटेल्सची माहिती घेऊयात.
बारामती थाळी
एमजी रस्त्याच्या मागच्या गल्लीतील ताबुत रस्त्यावर आहे. या छोट्याशा भोजनालयात तुम्हाला स्वादिष्ट शाकाहारी, अंडी, मासे, मटण, चिकन आणि पाय थाळी मिळेल. ते नदीतील माश्यांचा वापर करतात आणि परफेक्टली शिजवलेले असतात. त्यांच्याकडील फ्राईड फिश बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ असतो. पाया थाळी सोडून इतर प्रत्येक थाळीमध्ये दोन प्रकारच्या ग्रेव्ही, चपाती किंवा भाकरी आणि भात असतो. येथे 130 रुपयांपासून पुढे थाळी सुरू होते.
रेसिपी नॉन व्हेज
पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे रेसिपी नॉन व्हेज हे हॉटेल आहे. मटण थाळीमध्ये साजूक तुपातील बनविलेले मटण फ्राय खायला रेसिपी नॉन व्हेजला भेट द्यायला पाहिजे. या थाळीत आळनी, एक वाटी खीमा आणि दोन प्रकारचे रस्से बनलेले असतात. थाळीमध्ये ते चपाती किंवा ज्वारीचीभाकरी आणि इंद्रायणी भात देतात. यांचे वैशिष्ट्य म्हणजे, कुरकुरीत तळलेले पॉपकॉर्न दिले जातात . इथे एका थाळीची किंमत 250 पासून सुरू होते.
सत्कार राईस प्लेट हाऊस
पुण्यातील सिंहगड रोड येथील सत्कार राईस प्लेट हाऊस आहे. सन 1963 मध्ये मुंबईत सत्कार राईस प्लेटची सुरवात झाली. येथील खिमा थाली आणि पापलेट थाळी कमाल आहे. खीमा थाळीमध्ये खीमा, चवदार ग्रेव्ही आणि सोलकढी असते. पापलेट थालीमध्ये एक आख्खा फ्राईट पापलेट आणि करी सोबत दिली जाते. दोन्ही थाळींमध्ये दोन ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरी असतात किंवा तीन चपात्या आणि एक वाटी भातही दिला जातो. येथील थाळीची किंमत210 पासून पुढे आहे.
मासा
मासा हे छोटेसा 7 टेबल असलेले ढाबा स्टाईल हॉटेल आहे. मुंढव्यामध्ये असेलेल्या या हॉटेलमध्ये विविध थाळी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे. येथील चिकन स्पेशल थाली सुरमई रवा फ्राय थाली एकदम झक्कास आहे. दख्खन प्रदेशात जशी चुलीतल्या जळत्या लाकडावर ठेवून भाजल्या जातात तशाप्रमाणे भाजलेल्या भाकरी इथे दिल्या जातात. तुम्हाला जर छोट्या जागी खायला आवडत असेल तर हा उत्तम पर्याय आहे. 170 पासून पुढे थाळी सुरू होते.
सुर्वेज प्युअर नॉनव्हेज
मटणप्रेमींसाठी हे रेस्टॉरंट स्वर्ग आहे असे म्हटले जाते. हे रेस्टॉरंट म्हणजे रेफ्रिजरेटर कम किचन आहे असे समजले जाते. दररोज ताजे फ्रेश मटण आणले जाते. मटण थाळीमध्ये घडीची चपाती किंवा ज्वारीची भाकरी, मटन फ्राय, मटण रस्सा, खिम्मा, पांढरा रस्सा आणि पुलाव दिला जातो. थाळीची किंमत 200 पासून पुढे आहे.
हॉटेल स्वराज
सोलापुरी मटण थाळी खायची असेल तर पुण्यात एकमेव हॉटेल स्वराज. चविष्ट मटण थाळीमध्ये फ्राईड मटण पासून ते मटणाच्या रस्सा आणि स्वादिष्ट मटण बिर्याणीसह 7 मटण डिशेस असतात. या थाळीची किंमच 280 रुपयांपासून पुढे आहे.
आवारे मराठा खानावळ
सदाशिव पेठेतील ही एक खानावळ मटण, चिकनसाठी फेमस आहे. चिकन हंडी, चिकन मसाला थाळी, मटण मसाला थाळी, आळणी मटण करी थाळी, आळणी मटण थाळी इथं फेमस आहे. कोल्हापूर पद्धतीने बनविण्यात येणारा तांबडा, पांढरा रस्सा थाळी सोबत देण्यात येतो. ५०० रुपयांमध्ये इथं दोघांचा मटण-चिकन खाऊन होत. या हॉटेलमध्ये २५० रूपयाला थाळी मिळते.
हॉटेल संदीप
अहमदनगर येथील हॉटेल संदीप हे उकडलेलं सुक्क मटण आणि काळ्या मसाल्यात बनविण्यात येणाऱ्या मटनामुळे प्रसिद्ध आहे. संदीप हॉटेलच्या मेन्यूवरील चिकन उकड, चिकन हंडी, चिकन फ्राय, चिकन रोस्ट, मटण हंडी, मटण उकड, मटण फ्राय हे पदार्थ फेमस आहे. येथे २५० पासून थाळी मिळते.
जय भवानी मटण भाकरी हॉटेल
मटण भाकरी नवा कोरा ट्रेंड आलाय. त्यासाठी ५० किलोमीटरचा प्रवास करावं लागला तर अनेकांची ना नसते. खेड शिवापूर येथे जगदंब प्रमाणे मटण भाकरीसाठी जय भवानी हॉटेल फेमस आहे. मटण मसाला, मटण आळणी, मटण सुक्का, मालवणी चिकन हंडी हे पदार्थ हॉटेल भवानीचे फेमस आहेत. येथे २३० रूपयांपासून थाळी सिस्टीम आहे.
हॉटेल नागपूर
नावाप्रमाणे नागपूर भागात वापरण्यात येणाऱ्या सावजी मसाला वापरून हॉटेल नागपूर मध्ये चिकन, मटण बनविण्यात येते. चुलीवर जुन्या पद्धतीने हे चिकन, मटण शिजविण्यात येते.इथे मटण करी, मटण फ्राय, मटण पुलाव, भेजा फ्राय, चिकन फ्राय चिकन पुलाव हॉटेल नागपूरचे या गोष्टी फेमस आहे. येथे १८० रूपये थाळी सुरू होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.