लाइफस्टाइल

1 November: आजपासून होणारे असे बदल ज्याचा थेट तुमच्या आयुष्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळ डिजिटल टीम

Changes from November 1, 2021: आज नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस आहे. अवघ्या काही तासांवर असलेल्या दिवाळीच्या तयारीला लोक लागले आहेत. दिवाळीच्या आधी धनत्रयोदशीला लोक सोन्या-चांदीची खरेदी करतात. अनेक लोक इतरही वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करतात. मात्र, मार्केटमध्ये पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमतींचे परिणाम इतर सगळ्याच वस्तूंच्या दरांवर झालेले आहेत. आता एक नोव्हेंबरपासून पुन्हा काही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. असे बदल ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशाला कात्री लागण्यामध्ये होऊ शकतो. जाणून घेऊयात, असे पाच बदल ज्याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.

१. घरगुती गॅसचे वाढू शकतात भाव

घरगुती गॅस सिलींडरचे भाव दिवसेंदिवस वाढतच चाललेले दिसून येत आहेत. तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलींडरच्या किंमतींचा आढावा घेतात. अशा परिस्थितीत जर गॅस सिलींडरचे भाव वाढले तर त्याचा थेट परिणाम सामान्यांच्या घरखर्चावर होतो. अनेक महिन्यांपासून गॅस दरवाढ होत असल्याने या महिन्यात देखील भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२. सिलींडरसाठी लागेल OTP

घरगुती गॅस सिलींडरच्या बुकींग प्रक्रियेत देखील १ नोव्हेंबरपासून बदल होत आहेत. गॅस बुकींगनंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, ज्याचा वापर सिलींडरच्या खरेदीसाठी होणार आहे. जेंव्हा डिलीव्हरी बॉय सिलींडर घेऊन घरी येईल, तेंव्हा या OTP ची गरज लागेल. हा OTP जुळला तरच संबंधित ग्राहकाला गॅस सिलींडर दिला जाईल. जे लोक नोंदणीकृत पत्त्याऐवजी दुसऱ्याच पत्त्यांवर सिलींडर मागवतात, त्यांना काही अडचणी येऊ शकतात.

३. रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

भारत मोठ्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करतात. अशा पार्श्वभूमीवर जर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल झाला तर त्याचा परिणाम मोठ्या संख्येने लोकांवर होतो. १ नोव्हेंबरपासून रेल्वेच्या टाईम-टेबलमध्ये देखील बदल होणार आहे. यासंदर्भातील नवं वेळापत्रक आजपासून लागू करण्यात येणार आहे. हा बदल १३ हजार रेल्वेगाड्या आणि मालगाड्यांवर होणार आहे. राजधानी रेल्वेगाड्यांच्या वेळात देखील बदल होणार आहे.

४. गुंतवणूकदारांसाठी संधी

१ नोव्हेंबरपासून अशा लोकांसाठी देखील संधी उपलब्ध होणार आहे, जे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. IPO द्वारे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण आजच्याच दिवशी पॉलीसीबाझार आणि ८ नोव्हेंबर रोजी पेटीएमचा IPO खुला होणार आहे. इतर कंपन्यांचे देखील आयपीओ बाजारात येणार आहेत. जे अधिक चांगली कमाई करु इच्छितात, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

५. व्हाट्सऍप होईल बंद

व्हाट्सऍपसंदर्भात एक मोठा बदल होत आहे. १ नोव्हेंबरपासून व्हाट्सऍप अशा फोनमध्ये काम करणं बंद होणार आहे, जे आऊटडेटेड ऑपरेटींग सिस्टीमने चालतात. कोणत्याही जुन्या एँड्रॉईड व्हर्जनच्या फोनवर त्यांची सर्व्हीस १ नोंव्हेंबरपासून चालू शकणार नसल्याची घोषणा आधीच करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT