Office Manners  esakal
लाइफस्टाइल

Office Manners : तुमच्या या सवयींमुळेच ऑफिसमध्ये होतेय तुमचं हसू, वेळीच स्वत:ला बदला,प्रगती कराल

सकाळ डिजिटल टीम

Office Behavior :

शाळा कॉलेजात बेताल वागणारी मुलं ऑफिसला गेल्यानंतर टापटीप होतात. कारण ऑफिसमध्ये इम्प्रेशन चांगलं पडावं यासाठी पहिल्या दिवसापासून काळजी घेतली जाते. ऑफिसमध्ये कसं वागाव कसं बोलावं याचे क्लासेस ही घेतले जातात.

ऑफिसमध्ये कुठल्याही गोष्टीवरून आपली चर्चा होऊ नये, आपण ऑफिसचे सहकारी आणि बॉसच्या नजरेत चांगली व्यक्ती म्हणून गणली जावी, असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे ऑफिसमध्ये प्रत्येकजण जपून पाऊल टाकत असतो. (Office Behavior)

ऑफिसमध्ये काम चांगलं करूनही काही लोक बॉसच्या नेगेटिव्ह लिस्टमध्ये येत असतात. कारण त्यांचं वागणं-बोलणं तसंच असतं. त्यांना परिस्थितीचे भान नसते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये ‘Star Employee’ व्हायचं असेल तर तुम्ही काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. कळत नकळत तुम्ही या चुका करत आहात त्यामुळेच तुम्हाला लोकांची बोलणी खावी लागत आहे, हे लक्षात घ्या.

ऑफिसमध्ये काम न करणे

तुम्ही ऑफिसमध्ये आठ तास दहा तास घालवत असाल आणि तुमचा परफॉर्मन्स दिसत नसेल तर तुम्ही बॉसच्या निगेटिव्ह लोकांच्या लिस्ट मध्ये जाऊ शकता. कारण कंपनीला असेच लोक हवे असतात जे त्यांच्यासाठी जीव तोडून मेहनत करतील.

तुम्ही आठ तासांपैकी चार तास फक्त टाईमपास करत असाल तर तुमचा परफॉर्मन्स दिसणार नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये कामासाठी जात आहात तर कामाच्या वेळी कामच करा. प्रामाणिक काम करत राहिला तर तुम्हाला कंपनी कधीच घालवणार नाही.

सतत बडबड नका करू

काही लोकांचा स्वभाव असा असतो की, त्यांना बोलायला खूप आवडतं. सतत बडबड करत असतात. एकीकडे लॅपटॉप वर काम चालू असताना ते मित्राशी फोनवरती बोलत असतात. किंवा जवळ बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीशी गप्पा मारत असतात. तुम्ही तुमच्या बॉसला काम करताना कमी आणि गप्पा मारताना जास्त दिसलात तर तुमच्या नोकरीवरती गदा येईल हे नक्की. (Some habits that can reduce your prestige at the workplace) 

पर्सनल गोष्टी शेअर करणे

तुमच्या ऑफिसमध्ये कोणी नवीन व्यक्ती आली. तर लगेचच तिला तुमच्याबद्दलच्या सर्व गोष्टी शेअर करू नका. कारण पुढे तो व्यक्ती तुमच्या विरोधात गेला आणि त्याने त्या गोष्टी ऑफिसभर केल्या तर याचा तुम्हाला खूप त्रास होईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल प्रत्येकाला शेअर करत बसू नका.

फुकटचा सल्ला देणे

तुम्ही आयुष्य जगताना अनेक मित्रांना सल्ला दिला असेल. असताना तो सल्ला पटलाही असेल कारण तुम्ही त्यांचे मित्र आहात. तुम्हाला माहिती आहे का ऑफिसमध्ये असं फुकटचा सल्ला देणं एखाद्याला तुम्ही त्यांच्या जीवनात ढवळाढवळ करत आहात असं वाटू शकतं. त्यामुळे ती व्यक्ती तुमच्यापासून अंतर घेईल. तसेच तुम्हाला इतरही लोक ग्रुपमध्ये घेणार नाहीत. त्यामुळे हा स्वभाव नक्कीच बदला.

सतत इतरांना वाईट म्हणणं

एखादी व्यक्ती किती चांगली असली तरी तिला वाईट म्हणणं आहे एखाद्याचा गुणधर्म असू शकतो. कारण एखाद्या व्यक्तीतील सकारात्मक गुणधर्म न बघता नकारात्मक बाबी बघून त्याला टोचून बोलणं. सतत त्याला त्याच्यावर टीका करणं हे तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.

कंपनीला अशाच लोकांची गरज असते जे प्रामाणिकपणे काम करतील आणि जे इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाहीत. तुम्ही दहा तास काम करत असाल तर नऊ तास करा पण ते परफेक्टच करा.

स्वत:मधील या गोष्टी टाळून तुम्ही हे नक्की करा

  • स्वत:चे स्कील डेव्हलप करा

  • ऑफिसमधील PPT प्रेझेंटेशन कसे बनवायचे हे शिकून घ्या

  • ऑफिसमध्ये कामाव्यतिरिक्त होणाऱ्या ऍक्टीव्हिटीमध्ये भाग घ्या

  • काम वेळेच्याआधी संपवण्याचा प्रयत्न करा, यासाठी स्मार्ट वर्क शिकून घ्या

  • येणारी आव्हानांकडे संधी म्हणून पहा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT