Organza Suit  esakal
लाइफस्टाइल

Organza Suit : प्रोफेशनल ड्रेसेसचा कंटाळा आलाय? तर मग, ऑफिस वेअरसाठी ट्राय करा हे ऑर्गेंझा पॅटर्न सूट

जीन्स-शर्ट पेक्षा तरूणी सध्या अनारकली,पंजाबी, कुर्ता अशा कपड्यांकडे वळल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Organza Suit :

पूर्वी ऑफिसवेअरसाठी ड्रेस घ्यायचे म्हणजे प्रोफेशनल ड्रेसला पहिली पसंती दिली जायची. कारण, तरूणींची प्रोफेशनल वेअरसाठी पहिली पसंती ही जीन्स,फॉर्मल कपडे, ट्रेंडी शर्टना असते. पण, तुम्हाला माहितीय का, सध्या ऑफिशिअल कपड्यांचा ट्रेंड बदलला आहे.

जीन्स-शर्ट पेक्षा तरूणी सध्या अनारकली,पंजाबी, कुर्ता अशा कपड्यांकडे वळल्या आहेत. कारण, अशा कपड्यांमध्ये जास्त आरामदायक वाटतं. आणि एक रिच लुकही येतो. त्यामुळे आजकाल फॅशनेबल रिच लुक देणाऱ्या कपड्यांची फॅशन आहे.

तुम्हालाही दररोज ऑफिसला जावं लागत असेल. तर, तुम्ही ऑर्गेंझा कपड्यांचे काही खास पॅटर्न आणि स्टाइल नक्की करू शकता. यामुळे, तुम्हालाही काहीतरी वेगळं ट्राय केल्यासारखे वाटेल अन् चार चौघीत होईल तुमच्याच फॅशनची चर्चा होईल.  (Women's Fashion )   

फ्लोरल डिझाईन ऑर्गेंजा सलवार-सूट (Floral Organza Suit)

 क्लासी लुक देणारा हा सूट आहे. यामध्ये फ्लोरल पॅटर्न तरूणींच्या आवडतीचा आहे. साडी, ड्रेसवर असलेले फ्लोरल प्रिंट अनारकली ड्रेसवर देखील शोभून दिसते. त्यामुळे, तुम्ही हा पॅटर्न नक्की ट्राय करू शकता. अशा ड्रेसवर छोट्या आणि मोठ्या आकाराच्या फुलांचे डिझाईन आकर्षक वाटतात.  

फ्लोरल डिझाईन ऑर्गेंजा सलवार-सूट

प्लेन डिझाईन ऑर्गेंझा सलवार-सूट (Plain Organza Suit)

आजकाल प्लेन साडीवर भरगच्च डिझाईन असलेल्या ब्लाऊजचा ट्रेंड आला आहे. तसेच, प्लेन सूटवर हेवी वर्क असलेले दुपट्टे घेण्याची सध्या फॅशन आहे. त्यामुळे तुम्ही याचा नक्की विचार करा.  

प्लेन डिझाईन ऑर्गेंझा सलवार

स्ट्रेट डिझाईन ऑर्गेंझा सलवार-सूट (Straight Organza Suit)

अगदी साध्या वाटणाऱ्या ऑर्गेंझा कापडात अनेक प्रकारच्या डिझाईन्स आहेत. तुम्ही अशा प्रकारचे कापड विकत घेऊनही त्यापासून सूट शिवू शकता. यापासून तुम्ही अनारकली,लेगीन्स,प्लाझोवरील टॉप शिवू शकता.

स्ट्रेट डिझाईन ऑर्गेंझा सलवार-सूट

चिकनकरी ऑर्गेंझा सलवार सूट (Chikankari Organza Suit)

चिकनकरी वर्कचे अनेक व्हरायटी फॅशन वर्ल्डमध्ये उपलब्ध आहेत. ऑग्रेंजामध्येही चिकनकरी पॅडर्न तरूणींच्या पसंतीस पडत आहे. हा फ्रेश लुक देणारा ऑर्गेंजा पॅटर्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT