- पृथा वीर
आत्ताची फॅशन फॉलो करायची, की आपल्या मनाने फॅशन करायची हा गोंधळ मनात असतो. ‘मी अगदी वेगळी तर नाही ना दिसत?’, किंवा ‘ही तर जुनी फॅशन असे तर कुणी म्हणणार नाही ना?’... असा टॅबू घेऊन वावरताना कधी कधी बंड करावे वाटते. मग मिक्स अँड मॅचचा ट्रेंड सुरू होतो. खरेतर हा ट्रेंड नाही. उलट आपण फॅशनचे अपसायकलिंग करतो. मग कपड्यांचे हे फ्युजन बघताच समोरचा विचारात पडतो, अरे ही कोणती फॅशन?
मिक्स अँड मॅचमध्ये वेस्टर्न व ट्रॅडिशनल अशी फ्युजन कलेक्शन्स बघायला मिळतात. अगदी भरजरी वस्त्र नको असले, तर जयपुरी कुर्ते, चंदेरी सिल्क, इंडिगो कलेक्शन, प्लाझो, खादी कुर्ते खूप छान दिसतात. उन्हाळ्यात तर खादी कुर्त्यांना मागणी अगदी ठरलेली. नव्या डिझाइन लक्ष वेधतात येता. खादीच्या कापडावर कलमकारी वर्क खूप सुंदर वाटतात. कॉमन बेस कलर आणि हॅँड एम्ब्रायडरी असलेल्या बॉर्डरने कुर्त्यांना खूपच कूल व फ्रेश लूक मिळतो.
याशिवाय चौकडीचे खादी कुर्ते जीन्स, पँटवर खुलून दिसतात. खादी म्हणजे रफ अँड टफ प्रकार. त्यामुळे खादी कुर्ते वापरणे आणि हाताळणे सोपे. यासोबत इकत व दाबू पॅटर्न हे पारंपरिक फॅब्रिकचे कुर्तेही समर कलेक्शनची शोभा वाढवतात. जयपूर कलेक्शनमध्ये लाँग पॅटर्न, स्ट्रेट कटमध्ये बांधणी प्रकारातील इंडिगो पॅटर्न छान दिसतो.
टाय अँड डाय प्रकारातील हे कुर्तेसुद्धा आर्वजून खरेदी केली जातात.. अप अँड डाऊन प्रकारातील शिबुरी नावाने प्रसिद्ध असलेला टॉप तर एकदम हटके ठरतो. टाय अँड डाय प्रकारातील शिबुरीमध्ये लोकरीचे थ्रेड या नाजूक कुर्त्यांना अजूनच उठावदार करतात.
कुर्त्यावर सलवार किंवा चुडीदारपेक्षा स्ट्रेट पँटचा ट्रेंड आलाय. प्लाझोचीही चलती आहे आणि फुलांपासून, ग्राफिक्सपर्यंत सगळ्या प्रिंटचीही सध्या चलती आहे. या कापडात साड्या, कुर्ते, अनारकली, टॉप्स, स्कर्ट काय वाट्टेल ते उपलब्ध आहे. प्लेन साडीवर प्रिंटेड ब्लाऊज किंवा पिवळ्या साडीवर लाल ब्लाउज असा कॉन्ट्रास्ट ट्रेंड डोकावतोच. नुसत्या कॉटन टॉपऐवजी जरी कॉटनचा पर्याय छान आहे. जरीचा काठ किंवा ‘योक’ अर्थात समोरून आलेला जरीचा पॅच असलेले कुर्ते स्ट्रेट पँटवर शोभून दिसतात.
‘नो मेकअप’ लूक
मिक्स अँड मॅचमध्ये भडक किंवा लक्षात येईल अशा मेकअपऐवजी ‘नो मेकअप लूक’ गाजतोय. सुरूवातीला हॉलिवूड आणि आता बॉलिवूड सेलिब्रिटींनी लोकप्रिय केलेला हा न्यूड मेकअप म्हणजे असा मेकअप जो चेहऱ्यावर केला आहे, असे दिसून येत नाही. म्हणूनच मुलींमध्ये हा ट्रेंड प्रचंड लोकप्रिय झाला असून, तज्ज्ञ अवघ्या ४५ मिनिटांत हा मेकअप करून देतात. मिक्स अँड मॅचला पसंती देताना ‘नो मेकअप’चा ब्युटी ट्रेंड एकदम शोभून दिसतो.
‘नो मेकअप’ लूक अगदी सौम्य स्वरुपातील असल्याने हा मेकअप असल्याने कोणत्याही कार्यक्रमात छान दिसतो आणि कुठेही कधीही करता येतो. हा मेकअप ब्रायडल मेकअप म्हणून जास्तच लोकप्रिय आहे. तो फार दिसत नसल्यामुळेच याला नो मेकअप म्हटले जाते. या मेकअपसाठी वापरल्या जाणाऱ्या लिपस्टिक, ब्लशरच्या शेड्सदेखील वेगळ्या असतात.
या मेकअपचे साहित्य फारच ट्रेंडमध्ये आहे. या मेकअपसोबत डोळ्याला आल्हाददायक वाटणाऱ्या आऊटफिटची निवड होते. सध्या लाइट पिंक, लाइट पर्पल, लाइट पीच असे सौम्य रंग जास्त घेतले जातात. या मेकअपवरची हेअरस्टाईल सोपी, सुटसुटीत आणि सहज खुलावी अशीच असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.