Over Sleeping Symptoms esakal
लाइफस्टाइल

Over Sleeping Symptoms : सतत आसळ, झोप येत असेल तर हे उपाय करा; शरीरात नवा उत्साह संचारेल

सतत झोप येऊ नये म्हणून या टिप्स फॉलो करा

Pooja Karande-Kadam

Over Sleeping Symptoms : निरोगी राहण्यासाठी ज्याप्रमाणे पौष्टिक आहाराची गरज असते, त्याचप्रमाणे पुरेशी झोप ही माणसासाठी खूप महत्त्वाची असते. प्रत्येक व्यक्तीला किमान 7-8 तास झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. पण काही लोकांना ही समस्या असते की रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतरही त्यांना दिवसभर आळस जाणवतो. म्हणजेच 8 तास झोपल्यानंतरही त्यांना सतत झोप येते.

जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल, ज्यांना 10 ते 12 तास झोपल्यानंतरही थकवा किंवा झोप येत असेल, तर तुम्हाला काही गोष्टी बदलल्या पाहिजेत.

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. पण काहींना रात्री झोपल्यानंतरही दिवसभर झोप येत राहते. तथापि, जर तुम्ही जास्त प्रमाणात झोपत असाल तर ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. चला जाणून घेऊया अतिरिक्त झोपेपासून कशी सुटका मिळवायची.

रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतरही दिवसभर झोप आणि आळस का येतो हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. याची अनेक कारणे असू शकतात. काही कामामुळे रात्री उशिरा झोपल्यास. 8 तास झोप मिळत नाही. लवकर झोप न लागण्याची समस्या असू शकते. जास्त ताण घेणे, जास्त चहा किंवा कॉफी पिणे, शारीरिक हालचाली न करणे होय. (Over Sleeping Symptoms : Do you also have the problem of falling asleep all the time? Get rid of over sleeping in these ways)

तुमची झोपेची वेळ सेट करा

अनेक लोकांच्या झोपेची वेळ ठरलेली नाहीय. ते झोप आल्यावर झोपतात. त्यासाठी वेळेचीही पर्वा त्यांना नसते. त्यामुळेच दिवसभर सतत आळस अन् झोप येत राहते. तज्ज्ञांच्या मते, रात्रभराची ८ तास झोप घेणे गरजेचे आहे. पण, तुम्ही तितकीही झोप घेऊ शकत नसाल तर मात्र काळजी घेण्याची गरज आहे.

झोप येण्यासाठी लवकर जेवण करून थोडी शतपावली करा. हवं तर थंड मोकळ्या वाऱ्यात फिरल्यानंतरही शांत झोप येते. तसेच, झोपेची विशिष्ट वेळ निश्चित करा, ज्यामुळे तुम्हाला वेळेवर झोप घेता येईल.

अंधाऱ्या खोलीत झोपा

झोप येण्याचा हा फंडा अनेक माता आपल्या बाळासाठी राबवतात. बाळाने लवकर आणि शांत झोपावं यासाठी कमी प्रकाशात त्याला झोपवल्यास तो पटकन झोपतो. हा प्रयोग तुम्हीही करून पहा. तसेच, रूममधील तापमानही अती थंड आणि अतीउष्ण नको. ज्यामुळे तुम्हाला पटकन झोप येईल.

रात्री हलका आहार घ्या

सकाळचे जेवण राजासारखे तर रात्रीचे भिकाऱ्यासारखे असावे असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. याचे कारण आपण रात्री घेत असलेला आहार आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करणारा ठरतो. त्यामुळेच रात्रीच्यावेळी हलका आहार घेतल्यास तुम्हाला पटकन झोप येईल.

रात्री कधीही उपाशी झोपू नका

काही लोकांवर उपाशी झोपण्याची वेळ येते. ते पाणी पिऊन तरी रात्र ढकलतात. पण, अनेक लोकांना अन्न मिळत असूनही उपाशी झोपावं लागतं. तूम्ही कधीही उपाशी झोपू नका. ज्यामुळे तुम्हाला शांत झोप मिळणं कठीण होईल. त्यामुळे थोडफार खाऊन मगच झोपण्याचा प्रयत्न करा. (Healthy food)

रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचा

रात्रीच्यावेळी झोप येण्यासाठी लोक अनेक प्रयोग करतात. काहींना वाचनाचा कंटाळा येतो, अशा लोकांनी झोप येण्यासाठी रात्रीच्यावेळी पुस्तक वाचावे. पुस्तक डोळ्यासमोर धरल्यास शांत झोप लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT