Palak Omelette Recipe  esakal
लाइफस्टाइल

Palak Omelette Recipe : सांधेदुखीसारख्या गंभीर आजाराचीही होईल सुट्टी, जर कराल या ऑम्लेटशी गट्टी

हिवाळ्यात जास्त एनर्जी देईल हे ऑमलेट, फक्त द्या पालकचा तडका

Pooja Karande-Kadam

Palak Omelette Recipe :

हिवाळ्याच्या दिवसात सकाळचा स्वादिष्ट नाश्ता सर्वांनाच आवडतो. जर हा नाश्ता केवळ चवदारच नाही तर आरोग्यदायीही असेल तर तुमच्यासाठी ते दुप्पट फायदेशीर ठरेल. जरी आपण हिवाळ्यात बर्‍याच गोष्टी शिजवतो आणि खातो, परंतु आज आम्ही तुम्हाला ज्या रेसिपीबद्दल सांगणार आहे त्याचे नाव आहे पालक ऑम्लेट.

पालक ऑम्लेट खाल्ल्याने शरीराला प्रथिने आणि लोहासारखे पोषक तत्व मिळतात. पालक ऑम्लेटची रेसिपी खूप सोपी आहे आणि काही मिनिटांत तयार करता येते. जाणून घ्या पालक ऑम्लेट बनवण्याची रेसिपी आणि फायदे. पालक ऑम्लेटमध्ये भरपूर प्रोटीन असते. त्यात कॅलरीज आणि कर्बोदकांचे प्रमाण कमी असते.

पालक ऑमलेटचे फायदे आणि पोषक घटक

  • या पालक ऑम्लेटमध्ये सुमारे 150 कॅलरीज असू शकतात.

  • पालक ऑम्लेटमध्ये ग्लूटेन नसते.

  • पालक ऑम्लेटचे सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो.

  • पालकामध्ये लठ्ठपणा विरोधी गुणधर्म असतात. याचे सेवन केल्याने लठ्ठपणाची समस्या दूर होते.

  • पालक ऑम्लेटचे सेवन केल्याने मधुमेह, हृदयविकार आणि मधुमेहाच्या समस्यांपासून आराम मिळतो. 

  • पालकामध्ये व्हिटॅमिन सी सारखे अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

  • पालक ऑम्लेटचे सेवन केल्याने सांधेदुखीची सूज कमी होण्यास मदत होते.

पालक ऑम्लेट रेसिपी

साहित्य - पालक, अंडी, आले, लसूण, हिरवी मिरची, हळद, तेल आणि मीठ  

कृती

  • पालक ऑम्लेट बनवण्यासाठी कांदा, पालक आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या.

  • आता आले आणि लसूण देखील लहान तुकडे करा.

  • नॉनस्टिक पॅन घ्या आणि मंद आचेवर गरम करा.

  • तेल घालून चिरलेला कांदा, पालक, आले, लसूण घाला. हे चांगले एकजीव करा

  • यानंतर पॅनमध्ये बारीक चिरलेला पालक घालून मिक्स करून शिजवा.

  • पालक 2 मिनिटे शिजवा.

  • त्यात हळद व मीठ घालून परतून घ्या.

  • अंडी एका भांड्यात फोडून नीट फेटून घ्या.

  • कढईत एक चमचा तेल घाला आणि त्यात फेटलेले अंडे घालून शिजवा.

  • थोडा वेळ शिजल्यानंतर ऑम्लेट उलटा करून दुसऱ्या बाजूने शिजू द्या.

  • ऑम्लेट २ ते ३ मिनिटात शिजवून गॅस बंद करा.

  • पालक ऑम्लेट गरमागरम खा. यासोबत तुम्ही कोथंबीर चटणीचे सेवन करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

Pune Fake Voting: पुणे शहरातील सर्व ८ मतदारसंघांत फेक मतदान! कोथरुड अन् वडगावशेरीत सर्वाधिक

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

SCROLL FOR NEXT