Paneer Water:  Sakal
लाइफस्टाइल

Paneer Water: त्वचेला हवी चकाकी? पनीरचं पाणी ठरेल फायदेशीर, असा करा वापर

Paneer Water For Glowing Skin: तुम्हाला चेहऱ्याची नैसर्गिक चमक टिकवून ठेवायची असेल तर पनीरच्या पाण्याचा वापर करू शकता.

पुजा बोनकिले

paneer water for glowing and healthy skin

चमकदार आणि नरोगी त्वचेसाठी बाजारात अनेक उत्पादने मिळतात. पण त्याचा वापर केल्याने चेहऱ्यावर काही फरक दिसत नाही. तसेच चेहऱ्यावरची नैसर्गिक चमक कमी होते. तुम्ही यापेक्षा घरगुती उपाय करू शकता. पण माहितीचा अभाव असल्याने आपण वापर करू शकत नाही.

तुम्ही पनीरच्या पाण्याचा वापर नैसर्गिक चमक टिकून ठेवण्यासाठी करू शकता. तसेच त्वचे संबंधित समस्या देखील दूर ठेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया पनीरच्या पाण्याचा वापर कसा करावा.

  • पनीरच्या पाण्याचे फायदे

नैसर्गिक चमक

चेहऱ्याची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी फक्त नैसर्गिक गोष्टींचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी तुम्ही पनीरच्या पाण्याचा वापर करू शकता. रासायनिक उत्पादने वापल्याने त्वचेवरील नैसर्गिक चमक कमी होऊ शकते. यामुळे नियमितपणे पनीरचे पाणी चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरची चमक कायम राहते.

वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात

आजकाल चुकीची जीवनशैली आणि खाण्याची अयोग्य वेळ यामुळे चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे दिसतात. पनीरच्या पाण्यामध्ये असलेले घटक वृद्धत्वची लक्षणे कमी करण्यास मदत करते. यामुळे त्वचा चमकदार दिसते.

त्वचा कोमल होते

आजकाल त्वचेवर कोरडेपणा येणे सामान्य आहे. त्यामुळे त्वचेची संबंधित इतर अनेक आजारही उद्भवतात. जर तुमची त्वचा खुप कोरडी असेल तर पनीरच्या पाण्याचा वापर करावा.

  • पनीरच पाणी कसे आणि कधी वापरावे?

पनीरच पाणी त्वचेसाठी जितके फायदेशीर आहे तितकेच ते वापरण्यासाठी देखील सोपे आहे. त्वचे संबंधित आजारांपासून मुक्त होण्यासाठी पनीर पाण्याचा वापर करावा. कापसाच्या मदतीने त्वचेवर पनीरचे पाणी लावावे. पनीरचे पाणी लावण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवावा आणि सुती कापड्याने पुसावे.

पनीरच्या पाण्याचा वापर सकाळी किंवा संध्याकाळी करणे उत्तम मानले जाते. तुम्ही रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्यावर पनीरचे पाणी लावून दोन तासानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.

टिप: ही बातमी माहिती देण्याच्या उद्देशाने केली असून कोणतीही कृती करण्यापुर्वी वैद्यकिय सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharshtra Politics: ...तर १००० कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील, मुख्यमंत्रीपदावरून BJPच्या बड्या नेत्याचं खळबळजनक ट्विट

WTC Points Table: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाकडून हिसकावला 'नंबर वन'चा मुकूट; पर्थमधील विजयानंतर कसे आहे फायनलचे समीकरण?

Maharashtra Cabinet: नव्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी लॉबिंगला सुरुवात; कोणते आमदार गेलेत नेत्यांच्या भेटीला? जाणून घ्या

Madhuri Misal : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार माधुरी मिसाळ यांचे मेट्रोमार्ग, रुग्‍णालयाच्‍या कामांना प्राधान्‍य

Share Market Closing: शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद; सेन्सेक्स 1000 अंकांच्यावर, निफ्टीने पार केला 24,200चा टप्पा

SCROLL FOR NEXT