मुलांना बनवा मास्टर शेफ Esakal
लाइफस्टाइल

तुमच्या मुलांनाही बनू द्या छोटे Master Chef

या काही हटके रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांना सोबत घेऊन करू शकता. ज्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत क्वालिटी टाइम घालवण्यासोबतच त्यांच्या कल्पकतेला देखील ते फायद्याचं ठरू शकतं

Kirti Wadkar

आईच्या मागे किचनमध्ये लुटबूड करणं अनेक लहान मुलांना आवडतं. लहान वयात त्यांना आईला स्वयंपाकात Cooking मदत करण्याची खूप इच्छा देखील असते आणि त्यासाठी त्यांची धडपड देखील पाहायला मिळते. Parenting Smart Tips Let your Children cook for creativity in kitchen

केक, पेस्ट्री, पिझ्झा असे पदार्थ लहान मुलांना खायला जेवढे आवडतात तितकेच ते बनवताना आईला मदत करण्यची मजा त्यांना येते. खरं तर बेकिंगच्या Baking अशा काही सोप्या रेसिपी आहेत, ज्यामुळे मुलांची कल्पनाशक्ती आणि त्यांची क्रिएटीव्हिटी Creativity वाढण्यास मदत होवू शकते.

या काही हटके रेसिपी Recipe तुम्ही तुमच्या मुलांना सोबत घेऊन करू शकता. ज्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत क्वालिटी टाइम घालवण्यासोबतच त्यांच्या कल्पकतेला देखील ते फायद्याचं ठरू शकतं. अशाच काही मोजक्या सामग्रीच्या मदतीने तयार होणाऱ्या रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पिनट बटर ओट्स कुकिज- लहान मुलांना डब्यातही देता येतील अशी ही हेल्दी आणि टेस्टी कुकिजची रेसिपी आहे.

साहित्य- या कुकिजसाठी तुम्हाला १ कप ओट्स, अर्धा कप गव्हाचं पीठ, १ कप पिटन बटर, अर्धा कप बटर, १ कप साखर, अर्धा टी स्पून बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, पाव चमचा मीठ आणि पाव कप चॉकलेट चिप्स, वेनिला इसेंस पाव टीस्पून

कृती- पिनट बटर कुकिज तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका मिस्किंग बाऊलमध्ये बटर आणि साखर टाकून ती चांगली विस्क म्हणजेच एकजीव करून घ्यावी. त्यानंतर त्यात पिनट बटर टाकून पुन्हा मिक्स करावं

एका चाळणीच्या मदतीने गव्हाचं पीठ, बेकिंग पावडर. बेकिंग सोडा आणि मीठ चाळून मिश्रणात टाकावं. त्यानंतर यात भरड वाटलेले ओट्स टाकावे.

वेनिला इसेन्स आणि चाॅको चिप्स टाकून सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यावं. तयार पीठाचा गोळा हलक्या हाताने मळून १० मिनिटांसाठी बाजूला ठेवावा

त्यानंतर ओव्हन 375°F वर प्रिहीट करावा. तोवर पिठाचे लहान गोळे करून ते हलक्या हाताने दाबून त्याच्या कुकिज तयार कराव्या.

या कुकिज प्रिहिटेड ओव्हनमध्ये १५-१८ मिनिटांसाठी बेक कराव्या,

कुकिज बाहेर काढून थोड्यावेळ गार होवू द्याव्या.

तयार कुकिज तुम्ही एखादया हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता.

हे देखिल वाचा-

फ्रूट पिझ्झा- नेहमीच्या वेजी पिझ्झाला पर्याय म्हणून तुम्ही तुमच्या मुलांसाठी त्यांच्यासोबतच फ्रूट पिझ्झा Pizza म्हणजेच फळांचा वापर करून तयार करण्यात आलेला पिझ्झा बनवू शकता. एखाद्या सुट्टीच्या दिवशी मुलांसोबत तुम्ही त्यांनादेखील या पिझ्झाची रेसिपी शिकवू शकता. झटपट होणारा हा फ्रूट पिझ्झा तितकाच हेल्दी देखील आहे.

फ्रूट पिझ्झा तयार करण्यासाठी बाजारात मिळणारा पिझ्झा बेस तुम्ही वापरू शकता. ज्यामुळे मुलांना पिझ्झा तयार करणं सोप जाईल.

हा पिझ्झा नंतर बेक करायचा नसल्याने सर्व प्रथम एका पॅनवर थोड बटर टाकून पिझ्झा बेस दोन्ही बाजूंनी २ मिनिटांसाठी चांगला शेकून घ्या.

बेस गार झाल्यानंतर पिझ्झाच्या बेसला पिझ्झा सॉस ऐवजी मिक्स फ्रूट जॅम पसरवून घ्यावा.

यावर थोडं क्रिम चिझ टाकून चांगलं पसरवावं.

यावर अननस, सफरसंचद, स्ट्रॉबेरी, चेरी, केळ, आंबा, किवी अशी तुमच्या आवडी प्रमाणे तुम्ही फळं टाकू शकता.

त्यानंतर या फळांवरून व्हाईट चॉकलेट किसून टाका. यावर मनुका, ड्राईव्ह बेरीज तसचं बदाम आणि पिस्त्याचे काप टाका

अशा प्रकारे तुमचा फ्रूट पिझ्झा तयार होईल. हा पिझ्झा तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल.

बनाना ब्रेड Banana bread with chocolate chips - बनाना ब्रेड विथ चॉकलेट चिप्स हा पदार्थ लहान मुलांना नाश्त्यासाठी एक टेस्टी पर्याय आहे. दुधासोबत हा ब्रेड मुलं नक्की एन्जॉय करतील. मुलांच्या मदतीने हा ब्रेड तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकता.

बनाना चॉकलेट चिप्स ब्रेड तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका वाडग्यात २ पिकलेली केळी चांगली कुस्करून घ्या. तुम्ही ब्लेंडरच्या मदतीने देखील केळी कुस्करू शकता.

कुस्करलेल्या केळ्यामध्ये १ अंड आणि अर्धा वाटी साखर घालून चांगलं मिक्स करा.

यात १ कप मैदा, एक टी स्पून बेकिंग पावडर. अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि अर्धा टीस्पून मीठ आणि १ टीस्पून दालचिनी पावडर टाका.

सर्व साहित्य चांगलं एकजीव करा. त्यानंतर याच अर्धा कप चॉकलेट चिप्स टाका आणि अलगद मिस्क करा.

आता एका बेकिंग ट्रेला आतून बटर लावून घ्या. यामध्ये सर्व मिश्रण ओता.

ओव्हनमध्ये हा ब्रेड ४५-५० मिनिटांसाठी बेक करा.

अशा प्रकारे बनाना चॉकलेट चिप्स ब्रेड तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळी तसचं टिफिनमध्येही मुलांना देऊ शकता.

ब्रेड पिझ्झा- ब्रेड पिझ्झा ही देखील एक झटपट होणारी रेसिपी आहे. यासाठी ब्रेडला सर्वप्रथम थोड बटर लावून घ्या, त्यानंतर त्यावर पिझ्झा सॉस लावा. यानंतर ब्रेड स्लाइसवर टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, उकडलेले स्विट कॉर्न पसरवा. यावर थोडं चिझ किसून टाका. वरुन थोडं ओरिगॅनो टाका.

हे ब्रेड स्लाइस तुम्ही बेक करू शकता. किंवा गरम पॅनवर मंद आचेवर ३-५ मिनिटांसाठी झाकण ठेवूनही बेक करू शकता. अशा प्रकारे तुमची मुलं ब्रेड पिझ्झा एन्जॉय करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT