Parenting Tips: these 13 bad habits spoil your children's life  esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips: भारतीय पालकांनी टाळाव्या या १३ वाईट सवयी, मुलांचं आयुष्य होईल उद्ध्वस्त

पालकांच्या 'या' काही सवयी मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात.

सकाळ डिजिटल टीम

Parenting Tips: मुलांचे पहिले शिक्षक त्यांचे आईवडीलच असतात. घरी पालक मुलांना जशी वागणूक देतात किंवा ज्या प्रकारचं अनुकरण करतात त्याप्रमाणेच मुले त्यांचं अनुकरण करत असतात. त्यांच्या रोजच्या वागण्यात त्याचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे पालकांची चांगली वागणूक महत्वाची ठरते. मात्र पालकांच्या या काही सवयी मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. (Parenting Tips: these 13 bad habits spoil your children's life)

चांगल्या सवयींसह मुलांना योग्य वळण देत वाढवणे पालकांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असतं. अनेकदा मुलांसाठी काय चांगलं आणि काय वाईट हे ठरवणं पालकांना कठीण वाटतं. आणि अशा वेळी पालकांच्या काही चुकांमुळे मुले बिघडतात. आज आपण भारतीय पालकांच्या अशा काही सवयींबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं.

बाहेर खेळू न देता हातात मोबाईल टिकवणे

बरीच मुलं हल्ली मैदानात जाऊन खेळण्याएवजी स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉपमध्ये गेम खेळत असतात. असे केल्याने तुमची मुलं टेक्नीकली तर स्मार्ट होतील पण त्यांच्या सर्वांगिण विकासावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. सतत अनेक तास स्क्रीनसमोर बसल्याने डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो. यासोबतच त्यांच्या शारिरीक आणि मेंटल हेल्थवर वाईट परिणाम होतो.

मुलांच्या विनाकारण हट्ट पूर्ण करू नका - रेच पालक त्यांची एनर्जी आणि वेळ वाचवण्यासाठी मुलांचा हट्ट प्रेम म्हणत पूर्ण करतात. यामुळे मुले त्यांच्या हट्टावर नियंत्रण ठेवायला विसरतात. मुलांचे प्रत्येक हट्ट पूर्ण झाल्यामुळे त्यांना चूक आणि बरोबर यातील फरक कळत नाही.

सतत जिंकण्याची सवय - आजच्या काळात मुलांमध्ये स्पर्धा खूप वाढली आहे. अशामध्ये प्रत्येक पालक त्यांच्या मुलांना प्रोत्साहित करतात. या सगळ्यांमध्ये पालक मुलांना हरल्यानंतर डील कसं करायचं ते शिकवणं विसरून जातात. मात्र हरल्यास त्यांना खंबीरपणे उभे राहाण्यास शिकवणं फार महत्वाचं असतं. त्यांमुळे मुलांचा सर्वांगिण विकास होतो.

तुलना करणं - सगळी मुलं एकसारखी नसतात. प्रत्येकात काही चांगल्या आणि काही वाईट सवई असतात. अशात असं होऊ शकतं की इतर मुले ज्या गोष्टींत निपूण आहेत त्यात तुमचं मुल कमजोर असेल. आणि तुमचं मुल ज्या गोष्टींत हुशार आहे त्या गोष्टींत इतर मुले तेवढी नसू शकतील. म्हणून इतरांचं यश बघून तुमच्या मुलांची तुलना इतरांशी करू नका.

शिकवणं सोडून रागवणं - अनेकदा मुलांना एखादी गोष्ट न समजल्यास पालक त्यांना रागवतात. त्यामुळे मुले पालकांना घाबरतात. त्यांची वृत्ती चिडचिडी होत असते.

पालकांनी त्यांच्या काही सवयी बदलाव्या- मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी पालकांनी त्यांच्या काही सवयी बदलाव्या. जर तुमचं मुल जंक फुड खात असेल तर त्यांच्या या सवई तोडण्यासाठी आधी तुम्हाला स्वत: जंक फुड खाणं टाळावं लागेल.

मुलांना ऑप्शन देऊ नका- अनेकदा पालक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मुलांना ऑप्शन देतात. असे केल्यास मुलांमध्ये एका अर्थाने समंजसपणा वाढतो तर दुसरीकडे ते परिस्थितीचा सामना करणं सोडूत त्यातून पळ काढण्याचा प्रयत्न करतात.

मागण्याआधीच मुलांच्या ईच्छा पूर्ण करणे - अनेकदा मुलांना न मागताच पालकांकडून त्यांना हव्या असलेल्या गोष्टी मिळत असतात. त्यामुळे त्यांचा हट्टीपणा वाढत जातो.

मुलांसमोर खोटं बोलणं - पालकांनी मुलांसमोर खोटं बोलू नये. त्यामुळे मुलं चूकीच्या मार्गाला लागतात.

मोठ्यांच्या बोलण्यात मुलांनाही सहभागी करणे - जेव्हा तुम्ही मोठ्यांसमोर काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करत असता तेव्हा मुलांना त्यात सहभागी न करणे फार महत्वाचे ठरते. त्यामुळे मुले गोष्टींना जज करायला सुरूवात करतात.

धैर्य - आजच्या पिढीत धैर्याची कमतरता आहे असे म्हणायला हरकत नाही. प्रत्येक पालकाने त्यांच्या मुलांना धैर्याने राहायला शिकवले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या मनात चूकीचे विचार येणार नाहीत.

मुले अपयशी झाल्यास त्यांना दोष देणे - तुमच्या मुलांची वागणुक चुकीचा वाटल्यास त्यांना समजवून सांगा. त्यांना दोष देत बसवू नका.

विनाकारण खर्च- पालकांना निरर्थक खर्च करण्याची सवय असली तर त्यांच्या मुलांनाही त्याच सवयी लागतात. त्यांचा विनाकारण हट्ट पूरवत त्यांना वाईट सवयी लावू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT