Hardik pandya Natasha divorce esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : पालकांच्या घटस्फोटाचा मुलांच्या मनावर होतो मोठा परिणाम, मुलांना ही गोष्ट कशी सांगायची?

Hardik pandya Natasha divorce : जर तुम्ही पालक असाल आणि तुम्ही जोडीदारापासून विभक्त होणार असाल. तर मुलांना या गोष्टींची कल्पना आधी द्या

सकाळ डिजिटल टीम

Hardik pandya Natasha divorce :

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे. या बातमीनंतर आज सकाळी जेव्हा मोबाईल हातात घेतला तेव्हा एक व्हिडिओ व्हायरल होताना. दिसला तो म्हणजे हार्दिक आणि नकाशाचा मुलगा विमानतळावरती कोणाच्या तरी गळ्यात पडून ढसा ढसा रडत होता.

त्या मुलाचं ते हुंदके देत रडणं सर्वांच्या जीवाला लागलं आहे. आई-वडील एकत्र येतात लग्न करतात, त्यानंतर बाळाचा जन्म होतो, बाळ जेव्हा जन्माला येतात त्यातच आनंद व्यक्त केला जातो. आणि जेव्हा विभक्त होण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा मात्र बाळाचा विचार कोणीही करत नाही.

आता हार्दिक आणि नताशाने त्यांच्या मुलाचे को-पॅरेंटिंग करणार असल्याचे सांगितले आहे. पण पैशा शिवाय मुलांना आई-वडिलांचे प्रेम देखील गरज असते. आज आपण आई-वडिलांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर मुलांच्या मानसिकतेवर आणि मनावर काय परिणाम होतो हे जाणून घेणार आहोत.

मुलं रागीट होतात

ज्या मुलांना कळतं की त्यांना आई आणि वडील या दोघांपैकी कोणातरी एकाची निवड करायची आहे. तेव्हा ते गोंधळून जातात आणि त्यांचा स्वभाव चिडचिडा होतो. मुलं आपल्या आई आणि वडील या दोघांनाही दोषी मानतात. आणि दोघांचेही असलेल्या नातं तोडू पाहतात. त्यामुळे मुलं या काळात चिडचिड करतात.

पालकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात

ज्या मुलाच्या पालकांच्या घटस्फोटाच्या केसेस कोर्टात चालू असतात. किंवा त्यांना कळतं की आपल्या आई वडील विभक्त होणार आहेत. तेव्हा ती मुलं आपल्या आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागतात. आई-वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी ते ऐकणं सोडून देतात. आणि स्वतःच्या मनाचाच कारभार करत बसतात.

खरंतर पालकांवरचा रागच ते त्या प्रत्येक गोष्टीवर काढत असतात. पण ते उघडपणे बोलू शकत नाहीत. त्यामुळे मनातल्या मनात ते पालकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्याच गोष्टी करत असतात.

समाजापासून दूर होणे

आई-वडील विभक्त झाल्यानंतर जास्त बोलणे मुलांना ऐकावे लागते. कारण शाळेत मुलांना सिंपथी मिळते. आणि पाहुणे मंडळींमध्ये या मुलांकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते. त्यामुळे मुलं समाजात मिसळणं रुळनं बंद करतात. अशाने त्यांच्यात हळूहळू सामाजिक भान ही हरपून जातं. आणि ते एकटे पडू लागतात.

मुलांच्या आवडीनिवडी संपतात

जगात मुलांना सर्वात जास्त प्रिय कोण असेल तर ते आई वडील असतात. पण आई वडीलच वेगळी होणार म्हटल्यावर ते इतर कोणतेही गोष्टीत रस घेत नाहीत. त्यांना इतर कुठलीही गोष्ट जी त्यांना आवडते ते ती करत नाहीत. त्यांच्या आवडीनिवडी जपत नाहीत. याचा त्यांच्या मानसिकतेवर खूप गंभीर परिणाम होतो.

मुलं डिप्रेशन मध्ये जातात

काही मुलांच्या बाबतीत असेही घडू शकत की आई-वडिलांच्या दुराव्यामुळे ती मुलं एकटी पडू शकतात. ती डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतात. यामुळे मुलांचा मानसिकतेवर आणि शारीरिक वाढीवरही परिणाम होतो. तसेच मुलं एकटेच राहणे, इतरांमध्ये मिक्स न होणे असे वागू लागतात.

मुलांची बौद्धिक वाढ थांबते

एखाद्या जोडप्याने आज ठरवलं की त्यांना घटस्फोट घ्यायचा आहे. आणि उद्या तो पूर्णही झाला असं होत नाही. घटस्फोट ही खूपच लांब चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे घटस्फोटाच्या आधीपासून होणारी मानसिक घुसमट वाद आणि शारीरिक मारहाण याचाही मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेवरही परिणाम होतो मुलं अभ्यासात कमी इंटरेस्ट दाखवू लागतात.

मुलांना घटस्फोटाबद्दल सांगण्याआधी हा विचार नक्की करा 

जर तुम्ही पालक असाल आणि तुम्ही जोडीदारापासून विभक्त होणार असाल. तर मुलांना या गोष्टींची कल्पना आधी द्या. मुलगा किंवा मुलगी कोणाकडे राहणार असल्याचे कोर्ट ठरवते. पण मुलांना जोडीदाराबद्दल सत्य गोष्टी सांगून मगच या गोष्टीसाठी तयार करा.

मुलांशी खोटं बोलून त्यांना त्यांची कस्टडी मिळावी म्हणून जोडीदाराबद्दल खोट्या गोष्टी सांगून त्यांना फितवू नका. कारण मुलांचं मन खूप नाजूक असतं. ते आयुष्यभर त्या गोष्टी लक्षात ठेवू शकतात. आणि त्या व्यक्तीचा द्वेष करू शकतात.

सोडून गेलेले आई किंवा वडील या दोघांशीही मुलांनी मैत्रीपूर्ण नाते ठेवावे यासाठी तुम्हीही प्रयत्न करा.

घटस्फोटाबद्दल जेव्हा तुम्ही निर्णय घेता. तेव्हा तो नक्कीच एकदा तुमच्या मुलांच्या दृष्टीने विचार करून बघा, की तुमची मुलं ही गोष्ट मान्य करतील का? मुलं तितकी समजूतदार आहेत का? जर मुलं तितकी समजूतदार असतील, तर ती नक्कीच तुम्हाला समजून घेतात. त्यामुळे शांतपणे बसून मुलांशी या गोष्टीवर चर्चा करा आणि मगच निर्णय घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT