Young Generation Sakal
लाइफस्टाइल

Young Generation : इंटरनेटमुळे तरुण पिढीचा पालकांशी बोलण्यास नकार; वेळीच आवर गरजेचा

किशोरवयीन मुलांच्या मनात अनेक संभ्रम असतात, आणि ते वेळीच खोडले नाही गेले तर ते वाढू शकतात.

सकाळ डिजिटल टीम

Technology Affect Parents And Child Relationship : पालकत्व हा जरा कठीण तरी एक सुंदर अनुभव आहे, सगळ्याच पालकांना आपल्या मुलांना एक बेस्ट आयुष्य देयच असत आणि त्यासाठी ते खूप कष्टही करतात. पण फक्त चांगले कपडे, जेवण, लाइफस्टाईल, शिक्षण हे देऊन काही हटके नाही तर, त्याबरोबरीने मुलांना शिकवावे लागतात ते चांगले संस्कार. शिवाय त्यांच्या वयानुसार त्यांच्यात होणाऱ्या प्रत्येका छोट्यातल्या छोट्या बदलांचीही त्यांना ओळख करून द्यावी लागते. तसेच त्यांच्या मनातल्या प्रश्नांना न संकोचता उत्तर द्याव लागतं.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

किशोरवयीन मुलांच्या मनात अनेक संभ्रम असतात, आणि ते वेळीच खोडले नाही गेले तर ते वाढू शकतात. पालकांसाठी सर्वात मोठा टास्क सुरू होतो तो मुलं पौगंडावस्थेत पोहोचनंतर. पूर्वीच्या काळी असे कोणतेही स्त्रोत नव्हते. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांना या गोष्टी समजावून सांगाव्या लागायच्या, पण आता इंटरनेटमुळे आणि शाळेतल्या शिक्षणामुळे मुलांना काहीही सांगाव लागत नाही.

child

मूल 12-13 वर्षांची झाली की त्यांच्या शरीरात आणि वैचारीकतेत भरपूर बदल होता. मुलीला मासिक पाळी येते. मुलांचा आवाज बदलून करकरीत होतो. दोघांच्याही शरीरात आमूलाग्र बदल घडतात. या सगळ्यांची चर्चा पालकांनीही न घाबरता केली पाहिजे. पण सध्या इंटरनेट, मित्र आणि शाळेत शिकवला जाणारा अभ्यासक्रम यामुळे हे सगळं पालकांनी बोलण्याआधीच मुलांना माहिती असतं.

मुलांशी बोलायच म्हंटल तर, त्यांना आपण सांगणारी गोष्ट आधीच माहिती असते उलट अनेकदा मुलंच आपल्याला समजवतात की, हे असं नाही असं आहे. काही जण म्हणतात की, यामुळे आमच्यात एक दरी निर्माण झालेली आहे. काहीही बोलायच म्हटलं की मूल विषय टाळतात; इंटेरनेटच्या अति वापरामुळे मुलं थोडेसे संभ्रमतही दिसत असल्याची तक्रार आज अनेक पालकांची आहे.

girl

मासिक पाळी, सेक्स, ड्रग्ज सारख्या गोष्टींवर बोलण्यास कचरणे?

किशोरवयीन मुलांसाठी त्याच्या भावना रोलर कोस्टर सारख्या असू शकतात, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या त्या सतत बदलत असतात. याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे समाज, अशा विषयांवर बोलण्यासाठी समाजात एक विचित्र संकल्पना आहे. मुल संवेदनशील असतात आणि लैंगिक संबंध आणि मासिक पाळी यांना "अशुद्ध", "गलिच्छ" किंवा "अयोग्य" असे केलेले लेबल त्यांना गोंधळात टाकते आणि ते या सामान्य आणि अपेक्षित शारीरिक आणि भावनिक बदलांना ते लाजतात.

अनेक डॉक्टर सूचवतात की, पालक आणि पाल्यातल नातं घट्ट करायच असेल तर, आधी आपल्या मनातले काही गैरसमज काढून टाकले पाहिजे. आपल्या मनात असलेले बंधन काढून मैत्रीपूर्ण पद्धतीने हे सगळ सांगितलं समजवल तर मूल आपल्या पासून दूर जाणार नाहीत.

अशी करा चर्चेला सुरूवात

1. तुमच्या मुलाला आधीच काय माहित आहे ते शोधा. उदाहरणार्थ, तुमच्या मुलीला हे माहीत आहे का की मासिक पाळी साधारणपणे ८ ते १५ वयोगटात सुरू होते? तर ,मग तिच्याशी मासिक पाळी नक्की का शरीराशी गुंतलेली असते हे सांगून पहा.

2. तुमच्या मुलाला जी काही माहिती आहे ती खरी आहे का? हे शोधून काढा आणि त्यांना योग्य ते सल्ले द्या. तुमच्या मुलाशी प्रामाणिक राहा आणि त्याला/तिला सांगा की त्यांच्या प्रत्येका प्रश्नच उत्तर तुमच्याकडे आहे.

3. आपल्या मुलीला शाळेत अचानक पाळी आली तर काय कराव किंवा योग्य ब्रा आकार कसा शोधावा यासारख्या उपयुक्त टिप द्या.

4. तुमचे स्वतःचे अनुभव शेअर करा. किशोरवयात तुमच्या स्वतःच्या अनुभवांबद्दल आणि तुम्ही या बदलांना कसे सामोरे गेले याबद्दल तुमच्या मुलांना सांगा.

5. आपल्या मुलांचा आपल्यासाठी एक मोकळेपणा असला पाहिजे. आपल्या मुलाच्या भावनिक निर्णयांचा आदर करा.

फक्त तुमचे मूल थेट विचारत नाही किंवा ते तुमच्यासमोर आणत नाही याचा अर्थ असा नाही की त्यांना आधीच उत्तरे माहित आहेत. त्यामुळे पालकांनीदेखील वेळ आणि परिस्थितनुसार मुलांशी संवाद साधून या समस्येपासून मार्ग काढल्यास पालक आणि मुलांमधील नात बिघडण्याऐवजी ते अधिक दृढ होण्यास नक्कीच मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT