couple  
लाइफस्टाइल

सिंगल मदर्सने डेट करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

कुटुंबाचा रहाटगाडा ओढत असताना तिलादेखील एखाद्या जोडीदाराची साथ हवी असते.

शर्वरी जोशी

आजच्या काळात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या एकटीने आपल्या कुटुंबाचा किंवा मुलांचा सांभाळ करत आहेत. अनेकदा घटस्फोट झाल्यावर किंवा पतीचं निधन झाल्यावर घरची सगळी जबाबदारी स्त्रियांवर येते. विशेष म्हणजे प्रत्येक स्त्री ही जबाबदारी लिलया पार पाडत असते. मात्र, कुटुंबाचा रहाटगाडा ओढत असताना तिलादेखील एखाद्या जोडीदाराची साथ हवी असते. त्यामुळे अनेक स्त्रिया दुसरं लग्न करण्याचा विचार करतात. यामध्येच जर तुम्ही सिंगल मदर असाल आणि दुसऱ्या लग्नाचा किंवा एखाद्या व्यक्तीला डेट करत असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. (parenting-tips-the-ultimate-dating-guide-for-single-mothers)

१. मोकळेपणाने व्यक्त व्हा-

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला डेट करत असाल तर काही गोष्टी किंवा हेतू क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे. कोणतंही नातं पुढे न्यायचं असेल तर त्यात पारदर्शकता असावी. त्यामुळेच तुम्ही डेट करत असलेल्या व्यक्तीला घरची परिस्थिती, मुलांविषयी आणि मुळात लग्न करण्यामागील तुमचा उद्देश स्पष्टपणे सांगा. त्यामुळे नंतर कोणत्याही प्रकारचे गैरसमज किंवा मतभेद निर्माण होणार नाहीत.

२. एकेटपणा जाणवतोय म्हणून नातं नको -

अनेक स्त्रिया त्यांचा एकटेपणा घालवण्यासाठी नव्या नात्यात बांधल्या जातात. मात्र, हे नातं फार काळ टिकत नाही. जर तुम्ही खरंच एखाद्यावर मनापासून प्रेम करत असाल तरच त्या नात्यात राहा. केवळ एकटेपणा घालवण्यासाठी दुसऱ्यांच्या भावनांशी खेळू नका. तसंच ज्या व्यक्तीला डेट करत आहात, ती व्यक्ती तुमच्या मुलांना, कुटुंबियांना समजून घेईल का याचाही विचार करा.

३. मुलांविषयी स्पष्टपणे सांगा -

अनेक सिंगल मदर किंवा फादर्स रिलेशनशीपमध्ये असताना आपल्या मुलांविषयी काही सांगत नाही. किंबहुना मुलं आहेत हे लपवून ठेवतात. परंतु, तसं करु नका. पहिल्याच डेटमध्ये तुमच्या मुलांविषयी सांगा. कारण, जर समोरच्या व्यक्तीचं तुमच्यावर खरंच प्रेम असेल तर तो तुमच्या मुलांसकट तुमचा स्वीकार करेल. उलटपक्षी जर मुलांविषयी त्यांना नंतर समजलं तर कदाचित पुन्हा तुमचं नवं नातं तुटू शकतं.

४. निर्णय घेताना विचार करा -

एखादी व्यक्ती आवडली,तिचा स्वभाव आवडला की लगेच लग्न करण्याचा निर्णय घेऊ नका. स्वत:ला थोडा वेळ द्या. तुम्ही जे काही करताय ते तुमच्या आणि कुटुंबाच्या दृष्टीने योग्य आहे का याचा नीट विचार करा आणि मगच पाऊल उचला. तसंच मुलांनादेखील तुमच्या नव्या पार्टनरविषयी सांगा.

५. मुलांना समजवा -

अनेकदा आईने किंवा वडिलांनी दुसऱ्या व्यक्तीला डेट केलं तर ते मुलांना आवडत नाही. ते चिडचिड करु लागतात किंवा तुमच्याविषयी त्यांच्या मनात राग निर्माण होतो. त्यामुळे अशा वेळी मुलांनी नीट समजावून सांगा. आणि, नेमकी परिस्थिती काय आहे, तुम्ही हा निर्णय का घेताय ते त्यांना सांगा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT