Weight Loss Athletes: पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश फोगट अपात्र ठरवल्यानंतर वजनाशी संबंधित नियमांची बरीच चर्चा होत आहे. विनेश फोगटचे कॅटेगरीनुसार १०० ग्रॅमने जास्त भरल्याने अपात्र ठरवण्यात आले. यानंतर आता वजन कमी करता आले असते आणि असे अनेक वेळा घडले आहे की, खेळाडूंनी कमी वेळेत वजन कमी करून विशिष्ट श्रेणीत स्थानही मिळवले, अशाप्रकारची चर्चा केली जात आहे. भारतीय बॉक्सर मेरी कोमने कमी वेळेत वजन कमी केले होते. त्यामुळे खेळाडू कमी वेळेत वजन कमी करण्यासाठी नेमकं कोणत्या पद्धतींचा वापर करू शकतात, हे जाणून घेऊयात.
मेरी कोमला एकदा पोलँडमधील सिलेशियन ओपन बॉक्सिंग स्पर्धेत खेळायचे होते आणि तिला ४८ किलो वजनी गटात खेळायचे होते. पण त्यानुसार तिचे वजन खुपच जास्त होते. त्यावेळी मेरीने कॅटेगरीत पात्र ठरण्यासाठी चार तासात दोन किलो वजन कमी केले होते. तिने वजन कमी करण्यासाठी एक तास स्किपिंग केले होते.
खेळाडू कमी वेळेत वजन कमी करण्यासाठी खुप वर्कआउट करतात आणि त्यासाठी खास कपडे देखील परिधान करतात. त्यामुळे शरीरात खुप घाम येतो आणि वजन काही तासांतच कमी होते.
खेळाडू वजन कमी करण्यासाठी एफबीटी सूटचा वापर करतात. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि सोना बाथ घेतात. असे केल्याने शरीराला खूप घाम येतो. यामुळे वारंवार लघवीला जावे लागते. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि वजन लवकर कमी होते.
अनेक खेळाडू स्वयं प्रवृत्त उलटी या पद्धतीचा वापर करतात. यामुळे पोटातील अतिरिक्त घाण बाहेर पडते. पोट हलके होते. यामुळे कमी वेळेत वजन कमी करण्यास मदत मिळते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.