Perfume Wear Tips esakal
लाइफस्टाइल

Perfume Wear Tips : कितीबी चांगला Perfume घ्या लगेचच होतोय फुस्स्स? या टिप्सनी मिळवा लाँग लास्टींग fragrance!

परफ्यूम लावण्याची योग्य पद्धत कोणती

Pooja Karande-Kadam

Perfume Wear Tips : उन्हाळ्यात घाम येणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. अर्थात जास्त पाणी प्यायल्याने घाम येण्याचे प्रमाण कमी होतं. पण, घाम येणं थांबवण्यासाठी कायमस्वरूपी उपाय नाही किंवा तसं काही करणं प्रकृतीच्या विरुद्ध होईल.

उन्हात तुम्ही जास्त वेळ घराबाहेर असाल तर परफ्यूमचा सुगंध जास्त काळ टिकला पाहिजे. मात्र, उन्हाळ्यात कित्येक लोक सांगतात की, त्यांच्या परफ्यूमचा प्रभाव कमी वेळात संपतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला परफ्यूम वापरण्याच्या योग्य पद्धतींबद्दल सांगणार आहोत.


उन्हाळ्याच्या ऋतूत ताजेतवाने राहण्यासाठी लोक परफ्यूमचा वापर करायला आवडतात. नेहमी चांगल्या परफ्यूम वासासाठी ओळखल्या जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल ही तुम्हाला माहिती असावी. पण लोकांचे परफ्यूम इतके दिवस कसे टिकू शकतात, असा प्रश्न तुम्हाला नेहमीच पडला असेल.

परफ्यूम लावण्याची योग्य पद्धत कोणती हे आज पाहुयात. ज्यामुळे तुमच्या परफ्युमचा योग्य वापर होईल आणि सुगंधही दरवळत राहील.

आंघोळीनंतर परफ्यूम

ब्युटी रूटीनच्या स्टेप्समध्ये शेवटी येतो तो म्हणजे परफ्यूम. पण तुम्हाला माहित आहे का की परफ्यूम लावण्याची ही चुकीची पद्धत आहे. परफ्यूम लावण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आंघोळ केल्यानंतर ते थेट लावणे. अंघोळ केल्यानंतर शरीर व्यवस्थित स्वच्छ करा. यानंतर तुम्ही परफ्यूम लावा. यामुळे परफ्यूमचा वास बराच काळ राहतो.

आधी क्रीम, मग परफ्यूम.

कोरडी त्वचा वास लवकर दूर करते. परफ्यूमचा वास बराच काळ टिकवून ठेवण्यासाठी क्रीम लावा. सर्वप्रथम त्वचेवर बॉडी लोशन किंवा क्रीम लावा. आपण मान, मनगट वळण आणि इयरलोबवर क्रीम लावू शकता. त्यानंतर पल्स पॉईंटवर परफ्यूम ची फवारणी करावी. या ठिकाणी शरीरातील उष्णता अधिक पसरते, ज्यामुळे स्मेल तीव्र होते.

'या' ठिकाणी लावा परफ्यूम

अनेकदा परफ्यूम फवारल्यावर शरीरातील कोणत्या बिंदूंवर सुगंध जास्त काळ टिकतो याची आपल्याला माहिती नसते. आपल्या पल्स पॉईंटमध्ये एक बेली बटन देखील आहे. तिथे परफ्यूमचा वास येथे बराच वेळ राहतो.

मनगटावर

एखाद्याशी हस्तांदोलन करण्यापासून ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हातांचा सर्वाधिक वापर केला जातो. म्हणून मनगटावर परफ्यूम लावल्याने तुमच्या परफ्यूमचा सुगंध आपोआप सर्वत्र पसरू लागतो. तसेच परफ्यूम मनगटावर जास्त काळ टिकतो.

मानेवर स्प्रे करा

गळ्यावर परफ्यूम लावल्याने बराच वेळ सुगंध तर राहतोच, शिवाय तुमच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनाही तुमच्या परफ्यूमचा सुगंध सहज येतो. तुमच्या जवळ उभ्या असलेल्या लोकांनाही खूप फ्रेश आणि रिलॅक्स वाटू लागतं.

कपड्यांवर लावा

सुगंध दीर्घकाळ टिकण्यासाठी शरीराच्या भागाव्यतिरिक्त कपड्यांवर तुमचा आवडता परफ्यूम स्प्रे करा. अनेकवेळा कपडे धुतल्यानंतरही परफ्युमचा वास जात नाही. त्यामुळे कपड्यांवर परफ्यूम लावल्याने तुम्हाला घामाची चिंता न करता दिवसभर सुगंध येत राहतो आणि फ्रेश वाटतं.

केसांना स्प्रे लावू नका

काही लोकांना केसांना परफ्यूम लावायला आवडतं. त्याचा असा विश्वास आहे की जेव्हा जेव्हा त्याचे केस वाऱ्यात उडत असतात. तेव्हा परफ्यूम आपल्याला फ्रेश बनवतो.

परफ्यूममध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्याने केस लवकर कोरडे होतात, त्यामुळे सुगंध जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे केसांवर परफ्यूमचा वापर करू नये. मात्र, आता काही परफ्यूम्स पौष्टिक तेलघेऊन येत आहेत, ज्यामुळे चमक मिळते तसेच वास ही बराच काळ टिकून राहतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT