लग्नात नवरीला पहायला तर सगळेच आलेले असतात. पण, करवली मात्र जरा दुर्लक्षितच होते. याचं कारण आहे ती नवरी इतके सजलेली नसते. पण तूम्हालाही तूमच्या मैत्रिणीचे, भावाचे, बहिणीचे लग्न अटेंड करावं लागणार आहे का?. त्या लग्नात सर्वांनी तूमच्याकडेच पहावे, असे वाटते का? मग आम्ही सांगतोय तेवढं करा.
लग्न सराईत मोठी उलाढाल कापड पेठांमध्ये होते. कारण, लग्नात सर्वांनाच कपडे, आहेर घेण्याची प्रथा आजही आपल्याकडे आहे. त्यामूळे करवली असलेल्या तूम्हीही स्वत:साठी खरेदी करताना परफेक्टच असं काहीतरी निवडा. ज्यामध्ये साडी हा बेस्ट ऑप्शन असू शकतो. त्यामूळे साडी घेताना पार्टीवेअर, डिझायनर घ्या. ज्यावर तूम्ही डिझायनर ब्लाऊज शिवू शकता.
जेव्हा विषय ब्लाऊजचा येतो. तेव्हा तरूणी पर्ल म्हणजेच मोती डिझाईन करायला जास्त मागणी करतात. कारण बॅकलेस ब्लाऊजवर मोत्यांची डिझाईन असलेले ब्लाऊज सध्या ट्रेंडमध्ये आहेत. अनेक अभिनेत्रींनीही हे डिझाईन ट्राय केलं आहे. या ब्लाऊजने दीपिका आणि काजोलचीही शोभा वाढवली आहे.
पर्ल बॅक ब्लाउजची डिझाईन अतिशय क्लासी दिसते. जर तुम्हाला तुमचा ब्लाउज परत अॅक्सेसरीजने सजवायचा असेल तर तो अशा प्रकारे मोत्यांनी सजवा.
ब्लाऊज धूत असताना त्यावर असलेली मोत्यांची माळ तूम्ही काढूनही ठेऊ शकता. कपडे धुल्यानंतर पुन्हा जोडू शकता.
तुम्ही पर्ल ब्लाउज क्वचितच पाहिले असतील. तुम्हाला स्टाइलमध्ये एक पाऊल पुढे राहायचे असेल तर या डिझाईन्सचा विचार करा.
या पॅटर्नची खासियत म्हणजे मोत्याने ब्लाउजच्या मागील भाग पूर्णपणे झाकलेला असतो. त्यामूळे बॅकलेस आवडत नसेल तर अशी डिझाईन तूम्ही करू शकता.
यासारख्या लहान मोत्यांनी तूमची कोमल पाठ अधिकच आकर्षक दिसेल. जर बॅक ब्लाउज डिझाईन डीप नेक असेल तर हे डिझाईन खूप सुंदर दिसेल. हे तुमच्या साडी नेसण्याच्या स्टाइललाही सुंदर लुक देईल.
स्वतंत्रपणे, मोत्यांसह साडी ब्लाउज अॅक्सेसरीज अगदी कमी किमतीत बाजारात ऑनलाइन शॉपिंगमध्ये उपलब्ध आहेत, जे तुम्ही कोणत्याही ब्लाउजसोबत घालू शकता. हे डिझाईन एकदा वापरून पाहिल्यावर खूप सुंदर दिसेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.