Pets For Mental Health : esakal
लाइफस्टाइल

Pets For Mental Health : घरात पाळीव प्राणी पाळल्याने मुलांचे मानसिक आरोग्य राहते मजबूत, जाणून घ्या 'हे' फायदे

Pets For Mental Health : आजकाल अनेक घरांमध्ये पाळीव प्राणी आवर्जून पाळले जातात.

Monika Lonkar –Kumbhar

Pets For Mental Health : आजकाल अनेक घरांमध्ये पाळीव प्राणी आवर्जून पाळले जातात. या पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा, मांजर यांचा समावेश असतो. हे पाळीव प्राणी पाळण्यामागे सगळ्यांची आवड तर असतेच, परंतु, हे पाळीव प्राणी पाळल्याने आपल्या मानसिक आरोग्याला अनेक फायदे होतात. हे तुम्हाला कदाचित माहित नसेल.

पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवल्याने लहान मुले आनंदी आणि हेल्दी राहतात. तसेच, पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवल्याने मुलांना जबाबदारीचे भान येते आणि त्यांचा तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते. लहान मुलांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने घरात पाळीव प्राणी पाळल्याने काय फायदे होतात? ते आपण जाणून घेणार आहोत.

ताण-तणाव कमी होतो

पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवल्याने, त्यांच्यासोबत खेळल्यामुळे मुलांचा ताण-तणाव आणि चिंता कमी होते. तसेच, यामुळे मुले आनंदी आणि हेल्दी राहतात.

जेव्हा लहान मुले पाळीव प्राण्यांना मिठी मारतात किंवा त्यांची काळजी घेतात तेव्हा त्यांना शांत वाटते. त्यांचे मन स्थिर राहते. शिवाय, पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवल्याने मुलांचे मन हलके होते आणि ते अधिक आनंदी राहतात

सामाजिक कौशल्ये

लहान मुले पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून इतरांना भेटतात आणि बोलतात. यामुळे त्यांचे सामाजिक कौशल्यही वाढते. त्यामुळे, घरात पाळीव प्राणी पाळणे हे मुलांच्या मानसिक आणि शारिरीक विकासाठी अतिशय चांगले आहे.

जर तुम्ही पाळीव प्राणी पाळण्याचा विचार करत असाल तर, ते तुमच्या मुलांच्या मानसिक, शारिरीक आणि भावनात्मक विकासासाठी फायदेशीर ठरू शकते.

जबाबदारीचे भान

घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घेणे, हे लहान मुलांना जबाबदारी शिकवते. ही जबाबदारी घेतल्याने मुलांना संवेदनशील आणि मित्र म्हणून प्राण्यांकडे पाहण्याची संधी देखील उपलब्ध होते.

जसे की, प्राण्यांना वेळेवर अन्न देणे, त्यांना स्वच्छ करणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे हे किती महत्वाचे आहे? अशा गोष्टी मुले शिकतात. यामुळे, त्यांना जबाबदारीचे भान येते आणि मुले प्राण्यांची नियमितपणे योग्य काळजी घेऊ लागतात.

भावनिक संबंध मजबूत होतात

घरातील पाळीव प्राणी हे मुलांचे चांगले सहकारी बनू शकतात. मुले त्यांच्याशी बोलू शकतात जसे ते आपल्या मित्रांशी बोलतात. लहान मुले प्राण्यांसोबत वेळ घालवून त्यांच्याशी छान गट्टी करू शकतात.

तसेच, प्राण्यांसोबत सूख-दु:ख शेअर करू शकतात. त्यामुळे, मुलांना कोणीतरी आपल्या जवळ आहे. कोणीतरी आपलं ऐकतयं अस वाटत. थोडक्यात पाळीव प्राण्यांसोबत राहून मुले प्रेम, काळजी आणि मैत्री शिकतात. त्यांचे भावनिक संबंध अधिक मजबूत होतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

CNG Price Hike: महागाईचा झटका! गॅस कंपनीकडून सीएनजीच्या दरात मोठी वाढ, काय आहेत नवीन दर?

Prakash Ambedkar: निकालानंतर मविआ की महायुती? वंचित कुणाशी युती करणार? प्रकाश आंबेडकरांनी ट्विटमधून सगळंच सांगितलं!

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Whatsapp Voice Note Transcription Feature : व्हॉट्सॲपवर जबरदस्त फीचरची एंट्री, पटकन बघून घ्या

SCROLL FOR NEXT