मोबाईलमधून फोटो Esakal
लाइफस्टाइल

Photography मोबाईलमधून काढा DSLR कॅमेऱ्यासारखे फोटो, या टिप्स करा फॉलो

चांगले फोटो काढायचे म्हणजे आपल्याकडे चांगला कॅमेरा Camera हवा असा अनेकांचा समज असतो. मात्र तुम्ही तुमच्या मोबाईलमधुनही अगदी DSLR कॅमेरासारखे फोटो काढू शकता

Kirti Wadkar

सोशल मीडियाच्या सध्याच्या युगात प्रत्येकाला फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर आपले आकर्षक आणि सुंदर फोटो टाकावेसे वाटतात. सोशल मिडियावर Social Media आपण दररोज अनेकांचे हटके आणि लक्षवेधी फोटो पाहत असतो. Photography Tips In Marathi How to use your mobile Camera as DSLR

चांगले फोटो काढायचे म्हणजे आपल्याकडे चांगला कॅमेरा Camera हवा असा अनेकांचा समज असतो. मात्र तुम्ही तुमच्या मोबाईलमधुनही अगदी DSLR कॅमेरासारखे फोटो काढू शकता. खरं तर चांगली फोटोग्राफी जमणं किंवा व्हिडिओग्राफी जमणं ही एक कला आहे.

यासाठी लागणारं कौशल्य जर तुम्ही आत्मसात केलंत. तर मोबाईलच्या Mobile मदतीने देखील तुम्ही जबरदस्त फोटो काढू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईलच्या कॅमेऱ्याचा Mobile Camera वापर कसा करावा यासोबत काही टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे.

मोबाईलमधून DSLR कॅमेऱ्याप्रमाणे फोटो काढण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं याच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सेटिंग आणि मोड समजून घेणं- अलिकडे अनेक मोबाईल फोनमध्ये कॅमेराच्या नवंनव्या सेटिंग आणि फिचर्स देण्यात येतात. मोबाईल खरेदी केल्यानंतर अनेकदा आपल्याला यातील सर्व मोड किंवा फिचर्सची कल्पना नसते. यासाठीच फोनच्या कॅमेरातील सर्व फंक्शन, मोड आणि बटणं समजून घ्या.

तुम्हाला चांगले फोटो काढायचे असतील तर कॅमेऱ्याचा वापर ऑटो मोड ऐवजी मॅन्युअल मोडवर करा. यामुळे तुम्हाला लाइट, फोकस, सबजेक्ट अनेक गोष्टी अॅडजस्ट करता येतील. यासाठी तुम्ही ऑनलाइन व्हिडिओची मदत घेऊ शकता.

हे देखिल वाचा-

कॅमेऱ्याचा फोकस- फोटो काढण्यापूर्वी कॅमेराचा फोकस तपासून पहा. जर तुम्ही मॅन्युअली फोटो काढत असाल तर तुम्हाला फोकस सेट करावा लागेल. अलिकडे फोकसचे देखील कॅमेरामध्ये अनेक ऑटोमोड उपलब्ध असतात. यात बॅग्राउंड डिफोकस करणं किंवा एखादा ठराविक ऑब्जेक्ट डिफोकस तुम्ही करू शकता.

शटर स्पीड- फोनमधील कॅमेरातील शटर स्पीड सेट करून तुम्ही वेगवेगळे फोटो घेऊ शकता. शटर स्पीड वाढल्यास तुम्हाला चालणाऱ्या व्यक्तींचा किंवा प्रवासात एखाद्या सुंदर दृश्याचा फोटो कॅमेरामध्ये कैद करणं सहज शक्य होईल.

तर जर तुम्ही एका जागी स्थिर असलेल्या वस्तूंचे किंवा व्यक्तींचे फोटो काढत असाल तर तुम्ही शटर स्पीड कमी ठेवू शकता.

लाईट- फोटो आणि व्हिडीओसाठी महत्वाची गोष्ट असले ती म्हणजे लाईट. जर कमी उजेड असेल तर तुम्हाला इनडोर फोटोग्राफीसाठी एक्स्ट्रा लाइट वापरल्यास चांगला रिझल्ट मिळू शकतो. तर आउटडोर फोटोग्राफी करताना लाईटची दिशा पाहून फोटो क्लिक करणं गरजेचं आहे.

एडिटिंग- चांगला फोटो काढण्यासोबत तुम्हाला फोटो एडिटिंगचं थोडं ज्ञान असणं गरजेचं आहे. काही सॉफ्टवेअर वापरून तुम्ही फोटोमधील काही कमतरता दूर करू शकता. Adobe Photoshop किंवा Lightroom सारख्या सॉफ्टवेअरची तुम्ही मदत घेऊ शकता.

याशिवाय काही सामान्य गोष्टी किंवा टिप्स तुम्ही वापरणं गरजेचं आहेत. यात-

- फोटो काढताचा तो कॅमेरा स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी मोबाईल दोन्ही हातांनी पकडा किंवा तुम्ही स्डॅण्डचा वापर करू शकता.

- एखाद्या मायक्रो फायबरने मोबाईलच्या कॅमेऱ्याची लेन्स स्वच्छ पुसून घ्या.

- फोटो काढताना ते जास्त झूम करून काढू नका. यामुळे क्वालिटी कमी होऊ शकते.

अशा प्रकारे काही ट्रिक्स वापरून तुम्ही मोबाईलमध्येही चांगले फोटो काढू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: ‘सकाळ’च्या डिजिटल पानाचा गैरवापर; एकावर गुन्हा दाखल, निवडणूक प्रचाराबाबतच्या खोडसाळपणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश! इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या १३४ कर्मचाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे; ‘या’ ८ मतदारसंघातील आहेत कर्मचारी

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

SCROLL FOR NEXT