pineapple esakal
लाइफस्टाइल

DIY face pack:स्‍किन ग्‍लो करण्यासाठी अननस पासून बनवा 4 प्रकारचे फेस मास्क

अर्चना बनगे

कोल्हापूर: अननस हे सर्वांचेच आवडते फळ आहे. सर्व गटातील लोक या फळाला पसंत करतात. गोड आंबट चवीचे हे फळ अनेक गुणामुळे सर्वांना पसंद आहे. रसाच्या स्वादासाठी प्रसिद्ध असलेले हे फळ आपल्या साठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. त्वचेच्या काळजीसाठी अननस चा वापर करणे चांगले असते. त्वचेच्या काळजीसाठी अननस चा वापर केल्यानंतर आपली त्वचा सुंदर चमकदार होते कारण यामध्ये व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी मॅंगनीज पोटॅशियम आणि फॉलिक ऍसिड असे अनेक गुण अननस मध्ये असतात.

त्वचेच्या काळजीसाठी नेहमीच अननस चा वापर केला जातो अननस हा एक असा घटक आहे की जो अनेक फेस पॅक तयार करण्यासाठी वापरला जातो जे लोक मोठ्या प्रमाणात वापर करतात. परंतु मार्केटमध्ये खरेदी केलेल्या या उत्पादनापेक्षा घरात तयार केलेले फेसपॅक अत्यंत प्रभावी असते. याचा उपयोग आपल्या फक्त त्वचेच्या सुंदरतेसाठी नाही तर तोंडावरील फुटकुळ्या डार्क स्पॉट आणि सुरकुत्या अशा समस्या साठी याचा वापर होतो.आपण या ठिकाणी अननस वापर कशा पद्धतीने घरात फेस पॅक करण्यासाठी केला जातो हे पाहूया.

दमदार त्वचा..

अननस हे औषधी फळ आहे. जे आपल्या चेहऱ्यावरील मृत पेशी बाजूला करण्यासाठी अत्यंत मदत करते. यामुळे आपली त्वचा फक्त स्वच्छ होत नाही तर अधिक चमकदार आणि त्याचा रंगही उजळतो. त्वचा उजळण्यासाठी जर फेस पॅक तयार करत असाल तर अननस बरोबर बेसनचे पीठ ही वापरू शकता. कारण बेसन हे डार्क स्पॉट आणि तोंडावरील पुटकुळ्या दूर करण्यासाठी तसेच चमक वाढवण्यासाठी मदत करते.

असे तयार करा फेस पॅक....

एका बाउल मध्ये अननस पल्प घाला आणि त्यामध्ये दोन चमचा बेसन पीठ मिक्स करा. आता ह्या दोन्ही वस्तू चांगल्या पद्धतीने मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. तयार झालेले मिश्रण आपण फेसपॅक म्हणून वापरू शकतो. चेहऱ्यावर आणि मानेवर लावून ते सुकू द्या जेव्हा फेस पॅक सुकेल त्यावेळी साध्या पाण्याने धुऊन घ्या. हे फेसपॅक आठवड्यातून दोन वेळा आपण लावू शकतो. यामुळे आपल्या चेहर्‍यावरील फरक सहजपणे लक्षात येईल.

चमकदार करेल आपली त्वचा...

अननस हे फक्त चेहऱ्यावरील मृत पेशी बाजूला करत नाही तर त्वचेला आतुन मॉस्चरायझर हि करते. तसेच हे मध कॉस्मेटिक गुणांनी भरपूर समृद्ध असते. त्यामुळे आपली त्वचा अत्यंत चमकदार होते. फेस पॅक तयार करण्यासाठी या घटकांबरोबरच पपई सुद्धा मिक्स करतात. कारण हे आपल्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन दूर करते.

फेस पॅक बनवण्याची पद्धत

फेस पॅक तयार करण्यासाठी चार चमचे अननस आणि पपईचे पल्प घ्या आणि ते चांगल्या पद्धतीने मिक्स करा. तुम्ही हे मिक्सर मध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. पेस्ट तयार झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मधाचा वापर करा आणि तयार झालेले हे पेस्ट आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. वीस मिनिटानंतर पाण्याने धुवा.

चेहऱ्यावरील मुरुम करा दूर

अननसच्या माध्यमातून आपण पुढच्या एक्सफुलीएट करू शकतो. याच्या बरोबर आपण ग्रीन टी चा ही वापर करू शकतो. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरुम सहजपणे दूर होतात. तुम्हाला वाटले तर यामध्ये तुम्ही मधाचा थेंबसुद्धा वापरू शकता. या तिन्ही घटकांमुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरुम दूर होतात त्याचबरोबर आपली त्वचा चमकदार होते.

घरामध्ये तयार करा अशा पद्धतीने फेस पॅक

अननस पल्प घ्या त्यामध्ये एक चमचा ग्रीन टी आणि मध मिक्स करा. हे तिन्ही घटक चांगल्या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आपला चेहरा स्वच्छ करा आणि चेहऱ्यावर हे पेस्ट लावा. लावल्यानंतर गोलाकार आकारांनी त्वचेला मसाज करा आणि त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.

अँटी एजिंगची समस्या..

अननस मध्ये खोबरेल तेल वापरल्यानंतर त्याचे गुण आणखीन वाढतात. त्याचबरोबर नारळाचे दूध चांगल्या पद्धतीने मॉस्चरायझर रूपामध्ये ओळखले जातात. आपल्या त्वचेला कोरडे आणि सुस्त होण्यापासून वाचवतात. त्याचबरोबर अनेक समस्याही दूर करतात.

फेस पॅक तयार करण्यासाठी वापर करा हे घटक...

अननसाचे दोन छोटे तुकडे घ्या आणि त्यामध्ये दोन चमचा दूध टाका. चांगल्या पद्धतीने मिक्सरवर हे मिश्रण फिरवल्यानंतर आपण फेसपॅक म्हणून वापर करू शकतो. आपली त्वचा स्वच्छ पाण्याने चांगले धुतल्यानंतर ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तासानंतर कोमट पाण्याने धुऊन घ्या. आपण हे फेसपॅक आठवड्यातून दोन वेळा वापरू शकतो.

डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale LIVE Updates - ते ट्वीट खरं ठरलं! हे स्पर्धक ठरले 'बिग बॉस मराठी ५' चे टॉप ३ स्पर्धक

Sports Bulletin 6th October 2024: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर विजय ते रोहित शर्माला पत्नीसमोर तरुणीनं केलेलं प्रपोज

Bopdev Ghat Rape Case : बोपदेव घाट आत्याचार प्रकरणातील नरधम अद्यापही फरार; पोलिसांकडून २०० संशयितांची कसून चौकशी

Nashik Fraud Crime : वर्क फ्रॉम होम, शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष भोवले; सायबर भामट्याने घातला 37 लाखांना गंडा

Latest Maharashtra News Updates: : पुणे- मुंबई मार्गावर खासगी बसला आग

SCROLL FOR NEXT