Vladimir Putin esakal
लाइफस्टाइल

Vladimir Putin: जगातील सर्वात श्रीमंत नेता अशी ओळख असणाऱ्या पुतिन यांची एकूण संपत्ती किती? मोदींच्या तुलनेत किती पगार?

Vladimir Putin Total Wealth: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या चित्रपटासारखे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Vladimir Putin : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. मोदी रशियाची राजधीनी मॉस्कोमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना तिथे ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. मोठ्या उत्साहात पुतिन यांनी मोदींचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. महत्वाची बाब म्हणजे व्लादिमीर पुतिन यांचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या चित्रपटासारखे आहे.

पुतिन यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९५२ मध्ये झाला. त्यांना लहानपणापासूनच गुप्तेहरवर आधारित असलेले चित्रपट पाहण्याची आवड होती. पुतिन यांचे सुरूवातीचे शिक्षण हे लेनिनग्राडमध्ये झाले होते. त्यानंतर, त्यांनी कायद्याचा अभ्यास लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण केला.

काही रिपोर्ट्सनुसार, पुतिन यांचे येथील काम संशोधनाचे नव्हते तर हेरगिरीचे होते. असा दावा काही माध्यमांनी केला होता. पुतिन यांना जगातील सर्वात श्रीमंत राजकारणी म्हणून ही ओळखले जाते. आज आपण पुतिन यांची एकूण संपत्ती किती आहे? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

पुतिन यांची अलिशान हवेली

व्लादिमीर पुतिन यांचे एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले रशियाचे विरोधी पक्षनेते दिवंगत अलेक्सी नॅव्हल्नी (जे आता या जगात नाहीत.) त्यांनी एकदा दावा केला होता की, पुतिन यांची काळ्या समुद्राच्या किनारी अलिशान हवेली आहे. ही हवेली सुमारे १९,०००० चौरस फुटांवर उभी आहे. या हवेलीची किंमत जवळपास १ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी असल्याचे सांगितले जाते.

विशेष म्हणजे पुतिन यांच्या या राजेशाही हवेलीमध्ये एक भूमिगत बंकर आहे. याशिवाय, या हवेलीमध्ये स्विमिंग पूल, जिम, कॅसिनो, सिनेमा हॉल इत्यादी सोयीसुविधा आहेत. या व्यतिरिक्त पुतिन यांच्याकडे आणखी १९ अलिशान घरे आहेत. यासोबतच ७०० वाहने, डझनहून अधिक खासगी विमाने आणि हेलिकॉप्टर आहेत. परंतु, अधिकृतपणे पुतिन यांच्या नावावर केवळ ८०० चौरस फुटांचे अपार्टमेंट असून, एक ट्रेलर आणि ३ कार आहेत.

पुतिन यांची 'घोस्ट ट्रेन' काय आहे?

व्लादिमीर पुतिन यांना अनेकदा त्यांच्या खासगी रेल्वेने प्रवास करायला आवडते. त्यांच्या या ट्रेनचे नाव ‘घोस्ट ट्रेन’ असे आहे. २२ कोच उपलब्ध असलेली ही ट्रेन पूर्णपणे बुलेटप्रूफ आहे. विशेष म्हणजे या ट्रेनचे दरवाजे आणि खिडक्या देखील बुलेटप्रूफ आहेत. फायनान्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या ट्रेनमध्ये सेव्हन स्टार हॉटेलसारख्या आधुनिक सोयीसुविधा आहेत.

यामध्ये आधुनिक जिम, स्किन केअर, मसाज पार्लर, तुर्कीश बाथ आणि स्टीम रूम सारख्या सुविधा आहेत. यासोबतच अलिशान बेडरूम, डिनर रूम, सिनेमागृह अशा सुविधांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या ट्रेनच्या २ डब्ब्यांमध्ये एक हॉस्पिटल आहे. ज्यामध्ये ऑपरेशन थिएटरची देखील सोय आहे. महत्वाची बाब म्हणजे ही ट्रेन तयार करण्यासाठी तब्बल ७४ मिलियन डॉलर खर्च आला. या ट्रेनच्या देखभालीसाठी दरवर्षी सुमारे १५.८ दशलक्ष डॉलर्स खर्च केले जातात.

पुतिन यांची एकूण संपत्ती किती?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची गणना ही जगातील सर्वात श्रीमंत नेत्यांमध्ये आवर्जून केल जाते. पुतिन यांच्या पगाराबद्दल बोलायचे झाल्यास त्यांना दरवर्षी १४,०००० डॉलर (११.७ कोटी) पगार मिळतो.

पुतिन यांच्या तुलनेत मोदींच्या वार्षिक पगारावर नजर टाकल्यास मोदींना वर्षाला केवळ 19,92,000 लाख रूपये मिळतात. पुतिन आणि मोदी यांच्या एकूण संपत्तीमध्ये मोठी तफावत आहे. मोदींकडे एकूण ३.०२ कोटींची संपत्ती आहे तर पुतिन यांची एकूण संपत्ती ही २०० अब्ज डॉलर्स (१६ लाख कोटी रूपये) आहे.

पुतिन यांच्या संपत्तीबाबत २००७ मध्ये अमेरिकेच्या सिनेट न्यायपालिकेला एक अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालानुसार, पुतिन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून पुतिन यांच्याकडे २०० अब्ज डॉलर्सची संपत्ती असल्याचा दावा करण्यात आला होता.

परंतु, २०१५ मध्ये फोर्ब्स मासिकाने पुतिन यांच्या मालमत्तेची पडताळणी करता येत नाही. त्यामुळे, त्यांचे नाव श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट करणे कठीण असल्याचे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

Mumbai Local News: मुंबईकरांनो लक्ष द्या, आज तीन तासांचा ब्लॉक!

Maharashtra Winter Update: थंडीपासून जरा जपूनच, निच्चांकी तापमान 10 अंशांवर; राज्य गारठलं!

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

SCROLL FOR NEXT