Portable Washing Machine : अवघ्या काही मिनिटांमध्ये मळालेले कपडे धुण्यासाठी प्रत्येक घरात वॉशिंग मशीन असतेच. पण जे लोक एकटे राहतात किंवा इतर शहरात नोकरी करतात, ते वॉशिंग मशीनऐवजी हाताने कपडे धुतात. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामुळे सिंगल लोकांचं काम सोपं होण्यास मदत होणार आहे.
आज आम्ही तुम्हाला एका पोर्टेबल वॉशिंग मशीनबद्दल सांगणार आहोत, जे बादलीच्या आकारात येते. विशेष म्हणजे हे वॉशिंग मशिन स्वस्त असून, बादलीच्या आकाराचे आहे. त्यामुळे हे घरातील कोणत्याही कोपऱ्यात अगदी सहज बसते.
हे सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन 3 किलो क्षमतेचे असून तुम्ही एकावेळी पाच ते सहा कपडे धुवू शकता. यामध्ये तुम्हाला स्पेशल स्पिनर अटॅचमेंटदेखील देण्यात आली आहे. ज्याचा वापर तुम्ही कपडे सुकवण्यासाठी करू शकता.
हे मशीन प्लग इन करून सहजपणे वापरले जाऊ शकते, यामध्ये ऑटोमॅटिक पॉवर बंदचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. त्यामुळे विजेची बचतही होते. ड्रायर बास्केटसह येणार्या या वॉशिंग मशिनची किंमत 5,999 रुपये आहे. परंतु. डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरसह तुम्ही हे मशीन Amazon वरून 4,590 रुपयांना खरेदी करू शकता.
फोल्डेबल वॉशिंग मशिन टिफिनसारखे होते छोटे
वरील मशीनशिवाय Amazon वर आणखी एक अनोखी वॉशिंग मशीन आहे. जी तुम्ही वापरल्यानंतर फोल्ड करून ठेवू शकता. ओपनजा मिनी फोल्डेबल पोर्टेबल वॉशिंग मशीन फोल्ड केल्यानंतर टिफिनसारखे लहान करून कपाटात ठेवता येते. हे यूएसबी पॉवर्ड, टॉप लोड ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे जे 10 मिनिटांत कपडे धुते. त्यामुळे वीज आणि पाणी दोन्हीची बचत होते. Amazon वर असे अनेक पोर्टेबल वॉशिंग मशीनचे पर्याय उपलब्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.