Positive Thoughts esakal
लाइफस्टाइल

Positive Thoughts : तुमच्यातली Super Power अनुभवायचीये? फॉलो करा या टिप्स

कोणत्याही सकारात्मकतेला अनुभवण्यासाठी पहिले नकारात्मकता काढून टाकणं आवश्यक आहे.

सकाळ डिजिटल टीम

Remove Negativity To Feel Your Super Power : प्रत्येकच माणसात एक सुपर पॉवर असते. पण आपलं आयुष्य एवढ्या नकारात्म वातावरणाने, विचारांनी भरलेलं असतं की, त्यामुळे या सकारात्मक उर्जेवर त्या नकारात्मक विचारांचं आवरण चढलेलं असतं. त्यामुळे आपलं मन आणि मेंदू सतत नकारात्मक विचारांनी भरलेलं असतं असं जाणवतं. त्यामुळे सतत नकारात्मक विचार डोक्यात घोळत राहतात. याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि कार्यक्षमतेवर होत असतो.

मनातली ही नकारात्मकता काढून टाकत सुपरपॉवर अनुवभण्यासाठी पुढील उपाय नक्की करून बघा.

नकारात्मक विचारांचे दुष्परिणाम

  • या विचारांनी तुमचं मानसिक आरोग्य तर बिघडतच पण शारीरिक आरोग्यावरही वाईट परिणाम दिसतात.

  • प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार केल्याने आत्मविश्वास कमी होतो.

  • स्ट्रेस, डिप्रेशन, निद्रानाश अशा आजारांना सामोरे जावे लागते.

  • कार्यक्षमता कमी होते.

  • अपयशाशी सतत सामना करावा लागतो.

नकारात्मक विचार कसे दूर करावे?

मोडिटेशन - दमलेलं मन सकारात्मक विचार करण्यास असक्षम ठरतं. झोपेतही मनाला आराम मिळत नाही. अशावेळी मनाला आराम देण्यासाठी मेडिटेशन (ध्यान) हाच उत्तम पर्याय ठरू शकतो सकाळी उठल्यावर किमान १०-१५ मिनीटं शांत बसून, डोळे मिटून सकाळची शांतता, सकारात्मकता अनुभवा. श्वासाबरोबर सकारात्मकता आत घ्या आणि नकारात्मकता बाहेर टाका. याचा परिणाम तुम्हाला अगदी लगेच अनुभवता येईल. एक नवी उर्जा जाणवेल.

नकारात्मक बोलणाऱ्यांपासून लांब रहा - काही लोक असे असतात जे स्वतः फार नकारात्मक विचार करतात आणि आपल्या बोलण्याने इतरांनाही नकारात्मक करतात. अशा लोकांसोबत रहाल तर तुमचेपण विचार तसेच होतील. प्रयत्न करा की, खुश, हसमुख, सकारात्मक स्वभावाच्या लोकांमध्ये राहाल.

प्रेरणादायक पुस्तकं वाचा - चांगली पुस्तकं वाचूनही तुम्ही नकारात्मकता दूर करू शकतात. अशी पुस्तकं जी पॉझिटिव्ह विचार देतात, आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा देतात, तुमचा ताण दूर करतात, कमतरतांना कसं पार करावं याचे विचार देतात अशी पुस्तकं वाचा.

भरपूर हसा - दिवसभर उदास राहण्याऐवजी हसायला, हसमुख रहायला शिका. जगाला तुमच्या दुःखाशी देणं-घेणं नसतं. त्यामुळे दिवसभर उदास राहून स्वतःला त्रास करून घेण्याऐवजी, हसत राहत त् दुःख, टेन्शन विसरण्याचा प्रयत्न करत रहा. यासाठी सकाळी उठून ५ मिनीटं जोरजोरात हसा. दिवसभरात कॉमेडी सिरीयल बघा, जोक्स वाचा.

छंद जोपासा - एकांतात बऱ्याचदा नकारात्मक विचार जास्त असतात. त्यामुळे अशावेळी मुद्दाम असं काहीतरी करणं सुरु करा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तो छंद जोपासायला सुरू करा. डांसिंग, सिंगींग, स्विमिंग, ट्रॅव्हलिंग जे काही आवडत असेल ते करा. यामुळे तुम्ही स्वतःला आणि मनालाही व्यस्त ठेवू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT